Speculation grows over internal conflict in Ajit Pawar’s NCP as claims emerge about MLAs being in contact with Shinde Sena leaders. Saam Tv
महाराष्ट्र

NCP Split: अजितदादांची राष्ट्रवादी फुटणार? 'राष्ट्रवादीचे आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात'

Political Turmoil In NCP: दादांच्या राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचं दावा करण्यात आलाय. राष्ट्रवादीत कशामुळे नाराजी पसरलीय? आमदार आधी पवारांच्या आणि आता शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा का रंगू लागलीय? पाहूयात हा रिपोर्ट..

Saam Tv

अजितदादांच्या पक्षातील 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच आता अजितदादांचा पक्ष फुटणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित झालाय. आधीच पक्षातील पटेल-तटकरे नाराज असल्याची चर्चा असतानाच आता शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीमधील काही आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय.. तसंच राष्ट्रवादीत कुणाच्या नेतृत्वात काम करायचं याबाबत त्यांच्याच पक्षात संभ्रम असल्याचंही त्यांनी म्हटलंय...तर

राष्ट्रवादीत पटेल आणि तटकरेंच्या पदांबाबत वाद निर्माण झालाय. त्यामुळे पटेल-तटकरेंचे समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील कार्यालयातल्या जबाबदारीवरूनही पक्षांर्तग वाद निर्माण झाल्याचं बोललं जातंय. यावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र ही बैठक दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे पक्षात संभ्रमाचं वातावरण वाढत चालल्याचं बोललं जातंय.

पक्षातली अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी आता 26 मे रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बैठक बोलावली आहे. ही बैठक तरी ठरल्यानुसार होणार आणि नाराजांची समजूत काढण्यात सुनेत्रा पवारांना यश येणार का? आणि काही आमदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा थांबणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT