Ajit Pawar Video Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: दुपारी वेळ काढून येतो सिमेंट लावायला..., रुग्णालयाच्या बांधकामावरून अजित पवार संतापले; अधिकाऱ्यांना झापलं, VIDEO

Ajit Pawar Video: अजित पवार यांनी बीड दौऱ्यादरम्यान रुग्णालयाच्या निकृष्ट बांधकामावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यांचा व्हिडीओ समोर आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • अजित पवारांनी बीड रुग्णालयातील निकृष्ट बांधकामावरून संताप व्यक्त केला.

  • कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा त्यांनी दिला.

  • त्यांनी स्वतः दुपारी वेळ काढून सिमेंट लावून देतो असे म्हणत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

  • अजित पवारांचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक आणि कॅथलॅब युनिटचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी इमारतीच्या बांधकामावरुन अजित पवारांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना चांगलच धारेवर धरलं. त्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिलाय. अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत असतानाचा अजित पवार यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

अजित पवार हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बीड जिल्हा रुग्णालाचा आढाव घेतला. यावेळी रुग्णालयामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या काही विभागांची अजित पवार यांनी पाहणी केली. या विभागांमध्ये व्यवस्थित झाले नाही यावरून अजित पवार चांगलेच संतापले. काही नियोजित कामं न झाल्यामुळे त्यांनी डॉक्टरांची शाळा तर घेतलीच. तसंच त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकारांवर देखील संताप व्यक्त केला.

मशीन व्यवस्थित लावली नाही, बेडवरील चांदर खराब झाली, दरवाजे- कमोड व्यवस्थित लावले नाहीत. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अजित पवार यांनी या सर्वांना झापलं. यावेळी पाहणी करताना अजित पवार डॉक्टरांना विचारतात एसीच्या खाली काय आहे. तर डॉक्टर सांगतात सिमेंट व्यवस्थित लावले नाही. त्यावर अजित पवार म्हणतात, 'मी लावायला येतो, आज दुपारी वेळ काढतो आणि टचअप करतो. हे काम तुमचं नाही पीडब्लयूडीचे आहे. त्यांना आपण पैसे देतो. इंजिनिअरला महिन्याच्या महिन्याला पगार देतो. बारीक सारीक गोष्टी राहिल्या आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या जिथल्या तिथे अॅक्युरेट केल्या पाहिजेत.'

दरम्यान, अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवार बीडमध्ये आहेत. अजित पवारांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलिस ग्राउंडकडे जात होता. त्यावेळी दोन तरुणांनी अचानक त्यांच्या ताफ्यासमोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.आत्महत्येचा प्रयत्न करणारे दोन्ही तरूण केज तालुक्यातील कुंभेफळ येथील आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा

Manoj Jarange : मोठी बातमी! मुंबईनंतर आता मराठे थेट दिल्ली गाठणार, मनोज जरांगे यांची घोषणा

Mumbai Tourism: विकेंड ट्रीपचा प्लान करताय? मुंबईतील 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट, दूर होईल कामाचा ताण

पैठण हादरलं! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या धमकीने शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं|VIDEO

Gorakhpur Student Case : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर; दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT