महायुती Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेआधी मोठा राजकीय भूकंप होणार, महायुती तुटणार? भाजप नेत्याला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

Amol Mitkari News: विधानसभेआधी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विधानसभेआधी महायुती तुटणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप नेत्याच्या टीकेनंतर राष्ट्रवादीमं प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे अंदाज बांधले जात आहेत. या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे बडे नेते एकत्रित बैठकांचा सपाटा लावत आहेत. याचदरम्यान, महायुतीत भाजप नेत्याच्या वक्तव्याने खडा पडल्याचं बोललं जात आहे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवारांसोबत युती ही भाजपची चूक असल्याचं वक्तव्य केलं आहे. गणेश हाके यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राजकीय पक्षाकडून विविध मतदारसंघावर हेवेदावे केले जात आहेत. महायुतीमधील अनेक बड्या नेत्यांकडून विविध मतदारसंघावर दावे केले जात आहेत. यामुळे महायुतीमधील ताणतणाव वाढल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान, महायुतीत वाद निर्माण होणारं वक्तव्य भाजप नेते आणि प्रवक्ते गणेश हाके यांनी केलं आहे. अजित पवार गटासोबतची युती ही भाजपची चूक असल्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गणेश हाके यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.

अमोल मिटकरींकडून गणेश हाकेंना प्रत्युत्तर

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 'भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्या सज्जनतेला गांभार्याने का घेतलं नाही, हे माझ्या सारख्याला पडलेलं कोडं आहे. इतक्या वर्षांपासून उपेक्षित असलेले गणेश हाके चर्चेत येऊन विधानपरिषदेची संधी मिळेल, या आशेपोटी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. हे जरी खरं असलं तरी त्यांची पक्षातील अवस्था ही, बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे. त्यांनी नवीन उर्जा प्राप्त करण्यासाठी वक्तव्य केलं आहे. आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही. त्यांच्यासारख्या सज्जन माणसांचे हाल डोळ्यांना बघवत नाही. त्यामुळे पक्षाने गणेश विसर्जनापूर्वी त्यांचं विसर्जन करू नये, याची काळजी घ्यावी'

अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, भाजप प्रवक्ते गणेश हाके यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. 'आम्ही चर्चा केलेली आहे. आम्ही पंतप्रधान मोदी, अमित शहा , देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे. असं कोणी बोलत अशेल तर माझे कनिष्ठ कार्यकर्ते वेगवेगळं बोलू शकतात. जे बोलले आहेत की, त्यांना मी फार महत्व देत नाही. मी माझं काम चालू केलं आहे, असे अजित पवारांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Loss: अचानक केस गळती सुरु झालीये? सावध व्हा, हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं; पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार पाऊस

नेपाळ, फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये उद्रेक, लंडनमध्ये लाखो लोक रस्त्यावर, पोलिसांवर बाटल्या फेकल्या

Crime News: बॉयफ्रेंड घरी येत होता, आजीला खटकलं; संतापलेल्या नातीने काढला काटा, असा झाला भंडाफोड

Pune Crime News : ऑनलाइन गेमिंगमुळं 'गेम' झाला, मित्रासाठी पुण्याहून पश्चिम बंगालला गेली, मुलीसोबत भयंकर घडलं, वाचून थरकाप उडेल

SCROLL FOR NEXT