अजित पवारांचा बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना सवाल

 

विनोद जिरे 

महाराष्ट्र

तुमचं घर असचं अस्वच्छ ठेवता का? अजित पवारांचा बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना सवाल

बीड शहरातील अस्वच्छते वरून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर बैठकीत बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना चांगलंच धारेवर धरलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे 

बीड : बीड शहरातील अस्वच्छते वरून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भर बैठकीत बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना चांगलंच धारेवर धरलं. बैठक सुरू होऊनही नगरपालिकेचे मुख्याधिकारी गुट्टे हे हजर न झाल्यानं, त्यांना तात्काळ उपस्थित राहण्याचं फर्मान अजितदादांनी सोडलं. Ajit Pawar gets angry on Beed municipality chief

त्यानंतर काही वेळाने मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे हे बैठक सभागृहात हजर झाले. गुट्टे हे सभागृहात येताच अजित पवार त्यांना चांगलंच धारेवर धरत म्हणाले, की तुम्हाला शहराची स्वच्छता करता येत नाही का ? शहरातील डिवायडर मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यात कचऱ्याचे ढिगारे आढळून आले असून सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.

एवढं असूनही तुम्हाला अजित पवार बीड मध्ये येत आहेत, हे माहीत नाही का ? तुम्हाला बैठकीला हजर राहण्यासाठी स्पेशल निमंत्रण द्यायचं होतं का ? असा सवाल देखील अजितदादांनी गुट्टे यांना भर बैठकीत केला.

तुम्ही डॉक्टर आहात, डॉक्टर असून देखील तुम्ही शहरात अशी अस्वच्छता ठेवता. असं म्हणत, 'तुम्ही तुमचं घर असंच अस्वच्छ ठेवता का' ? असा थेट सवाल केला. त्यामुळं उद्याच शहर स्वच्छ झालं पाहिजे, यापुढे जर शहरात अशी घाण आढळून आली, तर तुम्हाला थेट सस्पेंड केलं जाईल. असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांना दिला आहे.

अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, मुख्याधिकारी गुट्टे म्हणाले, की यापुढे असं कधीही होणार नाही. उद्याच शहरातील स्वच्छता करून घेतो. दरम्यान अजितदादांनी घेतलेल्या समाचारानंतर मुख्याधिकारी बीड शहर स्वच्छ करणार का हे पाहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT