Ajit Pawar  saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नॉट रिचेबल अजितदादा नेटवर्कमध्ये, २ दिवसानंतर ॲक्शनमध्ये,कार्यकर्त्यांची गर्दी

Ajit Pawar Latest News : दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार आज अखेर माध्यमांसमोर आले आहेत. गृह खात्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अजित पवार नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

Namdeo Kumbhar

Ajit pawar news : मागील दोन दिवसांपासून संपर्कात नसणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अखेर समोर आले. मागील दोन दिवसांपासून अजितदादांनी भेटी-गाठी टाळल्या होत्या. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार आराम करत होते. पण आता अजित पवार ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. आज मुंबईमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. अजित पवारांनी दोन दिवसांपासून भेट टाळली होती. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते.

मागील २ दिवस कोणालाही न भेटलेले अजित पवार आज कार्यकर्त्यांना भेटत आहेत. सकाळपासूनच विजयगड बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. नागपूरमधील थंडीमुळे त्यांना त्रास झाला असेल पण आता ते ठीक असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. आज अजितदादा विधी मंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती देखील आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

घशाच्या संसर्गामध्ये मागील दोन दिवसांपासून अजित पवार आराम करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी मीडियाला सांगितले होते. पण माध्यमात आणि राजकीय वर्तुळात अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्थ खाते न मिळाल्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे बोलले जात होते. अजितदादा नाराज असल्यामुळे खातेवाटप लांबणीवर पडल्याच्या राजकीय चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण बुधवारी अखेर अजितदादा कॅमेऱ्यासमोर आले, अन् चर्चेला ब्रेक लागला.

अर्थ खात्यामुळे अजितदादा नाराज?

भाजपकडून अर्थ खात्यावर दावा करण्यात आला, त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते सोडण्यास नकार दिला, त्यामुळे अजित पवार नाराज आहेत, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यात दोन दिवस अजितदादा कुणालाही भेटले नाहीत, त्यामुळे या चर्चेला आणखी वाव मिळाला. आज अजितदादा नागपूरला जाणार आहेत, ते अधिवेशनात सहभागी होतील.

सुरेश धस यांनी घेतली अजितदादांनी भेट -

आज बीड आणि परभणी प्रकरणी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी बीड प्रकरणात गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सुरेश धस यांनी ज्यांच्यावर आरोप केले, तो व्यक्ती अजित पवारांच्या पक्षातील एका मंत्र्यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर बीड प्रकरणात गंभीर आरोप केला होता.

भुजबळांची नाराजी, राष्ट्रवादीकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न -

ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही मात्र तिन्ही नेते नाशिक मधे जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT