Protest led by Ramdas Tadas demanding Ajit Pawar’s resignation from Maharashtra Olympic Association. saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवार यांनी राजीनामा द्यावा; कोणी अन् का केली मागणी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ajit Pawar Resignation Demand: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतील भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारामुळे मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी मागणी ही मागणी केलीय.

Bharat Jadhav

  • अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जातेय.

  • रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

  • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतील भ्रष्टाचारावरून ही मागणी करण्यात येत आहे.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी, भ्रष्टाचारी कारभाराबाबत तक्रार केल्यानंतरही कारवाई केली जात नसल्यानं अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संघटनेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर राज्यभरातील २५ ते ३० क्रीडा संघटना आणि खेळाडू आक्रमक झाले. दरम्यान आज मंगळवारी रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

कुस्ती, कबड्डी, तायक्वांदो, बॉक्सिंग, हँडबॉल, स्विमिंग, कुराश अशा विविध २५ ते ३० संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारप्राप्त खेळाडू या निषेध आंदोलनात सहभागी झाले. नामदेव शिरगावकर यांनी तीन नॅशनल गेम्समध्ये केलेला भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत सर्व संलग्न ५० राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे आमरण उपोषणाला बसलेत. नामदेव शिरगावकर यांची ही मुजोरी असून त्यांचा भ्रष्ट कारभार खेळाडूंच्या आयुष्याशी खेळ करणारा आहे. खेळाडूंच्या कल्याणासाठी आमचे हे आंदोलन असल्याचं रामदास तडस यांनी केलीय.

'नामदेव हटाव' ही एकच सर्वांची मागणी असून त्यासाठी संदीप भोंडवे उपोषणाला बसलेत. यासह या दोन्ही गोष्टींवर त्यांनी हरकती नोंदवल्या आहेत. २५ तारखेपर्यंत याचा निकाल लागला नाही, तर २७ तारखेपासून माझ्यासह अन्य खेळाडू व पदाधिकारी महाराष्ट्रभर आमरण उपोषणाला बसतील." "गुजरात, गोवा, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्य शासनाने १२ कोटी रुपये दिले. मात्र, त्याचा हिशोब अद्यापही दिलेला नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना मागे खेचण्याचे काम संघटनेकडून सुरू आहे. अजित पवार केवळ नावापुरते पदावर आहेत की काय, अशी शंका येत असल्याचं तडस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अलख निरंजन! डार्क वेबवर कोड वापरून ड्रग्सची तस्करी करणारी टोळी, पुणे पोलिसांनी उघडकीस आणलं आंतरराष्ट्रीय नेक्सस

Heart Attack Risk: डायबेटीज, बीपी आणि इन्फेक्शनमुळं वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या?

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का? शिक्षा झाल्यास मंत्रीपद अन् आमदारकीचं काय होणार?

Krantijyoti Vidyalaya: 'मजा,मस्ती, धमाल… आणि आठवणींचे रियुनियन! 'क्रांतिज्योती विद्यालय–मराठी माध्यम'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

SCROLL FOR NEXT