Maharashtra Political Drama : राज्याच्या राजकारणात आज वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत.
तर आता अजित पवार यांना पक्षातील बहुतांश आमदारांचा देखील पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच आता अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो हटविला आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)
मी अजित दादा यांचे ट्विटर पाहिलेले नाही. मी तपासून सांगते, ४० आमदार कशाबद्दल नाराज आहेत? हे सगळं अगदीच काल्पनिक आहे. मी आणि जयंतराव २४ तास तुमच्यासाठी उपलब्ध असतो त्यामुळे मला असं काही ही कळले नाही. ४० लोकं कोण नाराजी आहेत यांच्याशी मी नक्कीच चर्चा करणार. अजित दादा माध्यमांशी कमी बोलत असतात असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
कुठल्या ही चर्चेबाबत मी सध्या सांगू शकत नाही. मी बारामतीत शेतकरी यांचे प्रश्न असतील ते पाहायला गेले होते. १५ मिनटात मी अजित पवार यांचे ट्विटर आणि फेसबुक चेक करून सांगते असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह फोटो असलेले बॅनर हटविला आहे. ते फोटो त्यांनी कायमस्वरूपी डिलिट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून बी प्लॅन तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)
भाजपचं राज्यात ऑपरेशन लोटस!
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप (BJP) राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राज्यात वज्रमूठ घेऊन पुढे जाणाऱ्या महविकास आघाडी खिंडार पाडण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.