ajit pawar, udayanraje bhosale, satara, political news saam tv
महाराष्ट्र

...म्हणून एमआयडीसीत एकही उद्याेग येत नाही; अजित पवारांचा उदयनराजेंवर राेख?

रविवारी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थित भाजप आणि काॅंग्रेसमधील कार्यकर्त्यांनी एनसीपीत प्रवेश केला.

ओंकार कदम

सातारा : लोकप्रतिनिधी चांगले असतील तर कामं चांगली होतात मात्र लोकप्रतिनिधी काँट्रक्टरला पाठिशी घालत असेल तर काम नीट होत नाही. सातारा (satara) एमआयडीसीचे उदाहरण समोर आहे. सातारा एमआयडीसीसाठी (satara midc) सगळ्या बाबी पोषक अताना सुद्धा एकही उद्योजक एमआयडीसीत नाही आज कोणताच उद्योग का आला नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे. (ajit pawar satara latest news)

सातारा जिल्ह्यातील माण- खटाव तालुक्यात असणाऱ्या 48 गावांना 2.5 टीएमसी पाणी आरक्षित केल्याबद्दल रविवारी वरकुटे मलवडी येथे कृतज्ञा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना जिल्ह्यातील माण, खटाव आणि सातारा तालुक्यात खंडणीखाेरांचे प्रमाण वाढले आहे असे माझ्या कानावर सातत्याने येत आहे. अपप्रवृत्तींचा बंदाेबस्त करा अशी सूचना एसपींना केल्याचे मंत्री पवार यांनी नमूद केले.साता-याच्या एमआयडीसी मधील खंडणीबाबत मंत्री पवार यांनी त्यांच्या भाषणात काेणाचा ही विशेष उल्लेख न करता समाचार घेतला. त्याचा धागा पकडत काही माध्यम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री पवार यांना साता-याच्या एमआयडीसीतील खंडणीखोर कोण असा प्रश्न केला. त्यावर मंत्री पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी तुम्हांला माहित नाही असे विचारताच प्रतिनिधींनी नाही म्हटले. त्यावर मंत्री पवार यांनी कधी तरी खरं बाेलायला शिका अशी टिप्पणी केली.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साता-याच्या एमआयडीसीतील खंडणीखोर कोण असा प्रश्न कार्यक्रमानंतर केला हाेता. त्यावर मंत्री पवार यांनी तुम्हांला माहित नाही का ? यावर माध्यम प्रतिनिधींनी नाही म्हटले. मंत्री पवार यांनी कधी तरी खरं बाेलायला शिका अशी टिप्पणी केली हाेती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राेख खासदार उदयनराजेंवर हाेता परंतु त्यांनी त्यांचा नामाेल्लेख टाळत प्रश्नाच्या उत्तर थेट देण्यास बगल दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT