Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे १५०० रूपये कधी येणार? अजित पवार यांनी तारीख सांगून टाकली

Ladki Bahini Yojana Maharashtra : राज्यातील लाडक्या बहिणींना अजित पवार यांनी खुशखबर दिली आहे. फेब्रुवारी महिन्याचे १५०० रूपये कधी जमा होणार? याची तारीख अजित पवार यांनी जालन्यात सांगितली आहे.

Namdeo Kumbhar

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : फेब्रुवारी महिन्याचे १५०० रूपये कधी येणार? याकडे लाडक्या बहि‍णींच्या नजरा लागल्या आहेत. काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे, त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? याबाबत साशंकता होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता कधी येणार याची तारीख अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार शनिवारी जालन्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील लाडक्या बहि‍णींना खुशखबर दिली. लाडक्या बहि‍णींचा हप्ता पुढच्या आठ दिवसांत खात्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहि‍णींना २५ फेब्रुवारीच्या आधी खात्यात १५०० रूपयांचा हप्ता जमा होण्यास सुरूवात होईल. पुढच्या महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, त्याआधी सरकार राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यत फेब्रुवारीचे १५०० रूपये जमा करेल, असी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२१०० रूपये कधीपासून?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहि‍णींना २१०० रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा होणार आहे. आगामी आर्थिक वर्षांपासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात दरमाह २१०० रूपये मिळण्याची शक्यता आहे.

या महिलांना फेब्रुवारीचे १५०० मिळणार नाहीत -

गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णींची पडताळणी केली जात आहे. अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. आतापर्यंत राज्यात सहा लाख महिल्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याचे समजतेय. त्या सर्व महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. अपात्र ठरणाऱ्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी घरात असणाऱ्या सर्व महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी युती करणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT