Prakash Ambedkar On Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेला एकत्र यावं', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे सर्वात मोठे विधान

Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादीसोबत बाळासाहेब आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हांला राहील, असेही ते म्हणालेत. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला

राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजितदादा आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केले आहे.

अकोल्यातून राजकीय क्षेत्रातून खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादा आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीसोबत बाळासाहेब आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हांला राहील, असेही ते म्हणालेत. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल त्यांनी आमच्या सोबत यावे. त्यांच्या काही अटीशर्ती असेल तर आपण मध्यस्थी म्हणून काम करू. आगामी निवडणुकीत शिवशाहू-फुले-आंबेडकरांच्या वारसदारांनी एकत्र यावं, अशी भावनाही अमोल मिटकरींनी बोलताना व्यक्त केली आहे. एकीकडे महायुतीमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच अमोल मिटकरी यांनी केलेल्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अजित पवार महायुतीमध्ये नाराज नाहीत, जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये खटका उडवल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खोट्या बातम्या पसरवण्याचे उगमस्थान तुतारी गट तसेच मविआतून आहे. जाणीवपूर्वक अजित पवार आणि महायुती सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही अमोल मिटकरींनी यावेळी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबईमध्ये आज तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवार नेमके काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT