Satara Politics: उमेदवारीचा तिढा, महायुतीत मिठाचा खडा! अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिंदे गटाची फिल्डिंग

Maharashtra Assembly Election 2024: पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेला क्षेत्र महाबळेश्वर येथून सुरुवात झाली असून या यात्रेमुळे वाई विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये जोरदार वाद होण्याचे चिन्हे उपस्थित झाली आहेत.
Satara Politics
Ajit pawar vs Eknath ShindeSaamtv
Published On

Maharashtra Assembly Election 2024: सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून कुस्ती सुरू झाली आहे. वाई विधानसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. एकाच घरामध्ये सर्व पदे मग वाईमधील इतर कार्यकर्ते मेले आहेत का? असा सवाल करत शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेला क्षेत्र महाबळेश्वर येथून सुरुवात झाली असून या यात्रेमुळे वाई विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये जोरदार वाद होण्याचे चिन्हे उपस्थित झाली आहेत.

शरद पवारांना सोडून अजित पवार सत्तेत आले. मला मतदारसंघात बांधणी करायला सांगितली, मी काय करणार? वारसा नसल्यामुळे वेळोवेळी मला संघर्ष करावा लागला. आता आपले आमदार, त्यांचे भाऊ सरपंच, कारखाने, जिल्हा बँकेवर यांची सत्ता आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये दुसरे कार्यकर्ते आहेत की मेलेत? असा टोला यावेळी जाधव यांनी लगावला. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात पुरुषोत्तम जाधव यांनी शड्डू ठोकल्यामुळे आता वाई विधानसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार की महायुतीमध्येच कुस्ती रंगणार हे पहावं लागेल.

Satara Politics
Maharashtra Politics : शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

दुसरीकडे, गुहागर मतदारसंघाच्या जागेवरुनही महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. गुहागरची जागा भारतीय जनता पार्टीला की शिवसेनेला हा तिढा अद्याप सुटलेला नाही. ही जागा ही शिवसैनिकच लढवेल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर देखील केलं होते. मात्र रामदास कदम यांनी गुहागरच्या जागेचा इतिहास सांगत गुहागरची जागा ही भाजपची होती. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या काळात बीडची शिवसेनेची जागा भाजपला सोडवण्यात आली होती, असा दावा केला आहे.

Satara Politics
Mumbai Crime: तक्रार करायला गेला अन् परत आलाच नाही, तरुणासोबत पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com