भरत मोहळकर, साम टीव्ही
मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 20, शिंदे गटाला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळालेत. त्यापार्श्वभुमीवर अजित पवारांनी धक्कातंत्र वापरत खांदेपालट केलीय.. त्यात छगन भुजबळांसह 5 दिग्गजांचा पत्ता कापण्यात आलाय... तर त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय...मात्र नेमके कुणाचे पत्ते कापले आहेत? पाहूयात...
छगन भुजबळ- येवला
दिलीप वळसे पाटील- आंबेगाव
धर्मारावबाबा अत्राम- अहेरी
अनिल पाटील- अमळनेर
संजय बनसोडे- उदगीर
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी छगन भुजबळांचा पत्ता कापल्यानंतर भुजबळांनी पक्षाच्या मेळाव्याला दांडी मारत आपली नाराजी दाखवलीय.एवढचं नाही तर भुजबळ मंत्र्याच्या शपथविधी सोहळ्यालाही गैरहजर राहीले. मात्र भुजबळांची कारकीर्द कशी आहे? पाहूयात...
1985 मध्ये मुंबईचे महापौरपदी निवड
1986 माझगावमधून पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार
1991- शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश
1991- महसुल आणि बहुजन कल्याण मंत्रिपदावर संधी
1996- विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर निवड
1999-2008- तीन वेळा उपमुख्यमंत्रिपदी वर्णी
2019- अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची संधी
2023- महायुती सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद
छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांचा पत्ता कापल्याने आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गणितं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार भुजबळांची नाराजी कशी दूर करणार आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं करणार हेच पाहायचं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.