Ajit Pawar On Electricity Bill Saam Digital
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'झालं गेलं गंगेला मिळालं! विधानसभेसाठी दादांनी जोडले हात; चुकांचा कबुलीनामा दादांना तारणार?

Vidhan Sabha Election : लोकसभेला फटका बसल्यानंतर अजित पवारांनी झालेल्या चुकांची कबुली द्यायला सुरुवात केलीय. नेमक्या कोणत्या चुकांची कबुली दादांनी दिलीय? त्याबरोबरच जनसन्मान यात्रेतून दादांनी काय आवाहन केलंय?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभेला फटका बसल्यानंतर अजित पवारांनी झालेल्या चुकांची कबुली द्यायला सुरुवात केलीय. नेमक्या कोणत्या चुकांची कबुली दादांनी दिलीय? त्याबरोबरच जनसन्मान यात्रेतून दादांनी काय आवाहन केलंय? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

ऐकलत....लोकसभेतल्या पराभवाचा चांगचाच धसका अजितदादांनी घेतलाय. आता विधानसभेतही मतदारराजानं कंबरडं मोडू नये यासाठी दादांनी जनसन्मान यात्रा सुरू केलीय. या यात्रेत दादा दिलखुलासपणे मतदारांशी संवाद साधत आहेत....चुकांची कबुली देत आहेत....लोकसभेत झालेल्या चुका टाळण्याचा निर्धार कऱणा-या अजितदादांनी आतापर्यंत कोणत्या चुकांची कबुली दिली ते पाहूयात..

दादांच्या कबुलीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंनी मात्र पुण्यात अमित शाहांनी भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणल्याची आठवण करून दिलीय.एकीकडे अजित पवार जाहीर सभांमधून चुकींची कबूली देत माफी मागत आहेत. तसंच झालेल्या चुकांवर आपण काय काळजी घेत आहोत, हे सांगताना थेट हात जोडून लोकसभेप्रमाणे फटका न बसू देण्याची विनंती करत आहेत.

अजितदादा कितीही म्हणत असले की झालं गेलं ते गंगेला मिळालं....मात्र गेल्या पाच वर्षांत झालेल्या बंडखो-या...बदलेली राजकीय समीकरणं...याचा सगळा हिशोब विधानसभा निवडणुकीत मतदारराजा करणार की तोही झालं गेलं ते गंगेला मिळालं म्हणणार याकडेच अजितदादांसह सा-या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT