चेंबूर स्वस्तिक चौक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली आग
अग्निशमन दल आणि मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल
बिल्डींगमधील रहिवाशी यांना अग्निशामक दल काढत आहे बाहेर
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चारहून अधिक गाड्या दाखल
शहरातील उचलण्यात येणारे पाणी मर्यादीत असल्याने पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिकेकडून अखेर शहरात पाण्याची कपात करण्यास सुरूवात
दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरापासून ही सुरूवात करण्यात आली
या भागात आता आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे.
पुण्याच्या शिरुरमध्ये धर्मांतरासाठी आमीष व दबाव टाकत हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रयत्न केल्याने सात जणांवर शिरुर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे यावेळी चिमुकल्या मुलांनाही या धर्मांत्तरात सहभागी केलंय
महाबळेश्वर मध्ये आज पासून महाबळेश्वर महा पर्यटन उत्सव सुरू होतो आहे.याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.आज एकनाथ शिंदे महाबळेश्वर ला पोहचल्या नंतर त्यांनी ज्या वेगवगेळ्या ठिकाणी महोत्सवाच आयोजन कारण्यात आलं आहे त्याला भेट दिली
काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे सध्या लातूर मतदार संघातील अनेक गावांना भेटी देत आहेत.. दरम्यान लातूरच्या हरंगुळ येथे ग्रामस्थांच्या भेटीदरम्यान.. महिलेने गावात अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार आमदार अमित देशमुख यांना केली.. यावेळी अमित देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून अवैध दारू विक्री संदर्भात जाब विचारत, तात्काळ याचा बंदोबस्त करावा अशा सूचना देखील यावेळी अमित देशमुख यांनी दिल्या आहेत...
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील येवता गावातील गायरान जमिनीत दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे आणि गवत जळून खाक झाले. अग्निशमन विभागाने घटनास्थळी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गायरान क्षेत्रातील जैवसंपदा आणि नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध सुरू आहे.
रोहा नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता ओंकार भुरण यांच्यावर रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात लोखंडी रॉड ने आणि हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. रात्रीच्या सुमारास शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असताना भुरण तिथं देखरेख करीत होते.
यावेळी कन्हैया पडवळ आणि एक व्यक्ती तिथं आली आणि किरकोळ कारणावरून वाद घालत भुरण यांना मारहाण केली. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर नगर पालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी या मारहाणीचा निषेध केलाय. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपीवर कडक कारवाई झाली नाही तर सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय.
कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात पहाटेच्या सुमारास दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली. दुचाकी चोरताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दुचाकी मालक तौफीक शेख यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस सीसीटीव्ही व्हिडिओच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत आहेत गेले काही दिवसापासून कल्याण-डोंबिवली परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीती वातावरण आहे.
सोलापुरात पेट्रोल पंपावर थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीला अचानक लागली भीषण आग. पेट्रोल पंपावर थांबलेली स्कॉर्पिओ गाडी संपूर्ण जळून खाक मात्र कोणतीही अग्निशामक दलाची यंत्रणा घटनास्थळी दाखल नाही. स्कॉर्पिओला लागलेली भीषण आग ही पेट्रोल पंप परिसरातच असल्याने मोठा अनर्थ टळला. स्कॉर्पिओला नेमकी कशामुळे आग लागली याचे कारण अस्पष्ट आहे.
या अपघातात एक जण जागीच ठार झालाय. तर चार ते पाच जण जखमी असल्याची माहिती आहे. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावाजवळ हा अपघात झालाय. तुळजापूर वरून अक्कलकोटच्या दिशेने भाविक देवदर्शनासाठी येत असताना अपघात झाला. चपळगाव येथे आल्यानंतर कंटेनर अनियंत्रित झाले त्यानंतर दोन चारचाकी वाहनांना धडक दिली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवारांची माघार घेण्याची शेवटची तारीख आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानीमाता पॅनलच्या उमेदवारांची घोषणा सकाळी झालीय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वपक्षीय पॅनलमधून योग्य त्या जागा न मिळाल्याने आमची निवडणुकीतून माघार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी दिलीय.
पुण्यातील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला स्थानिक लोकांचा विरोध कायम असून आज सुरू झालेला ड्रोन सर्वे स्थानिक शेतकऱ्यांनी बंद पडलाय. सरकारच्यावतीने मोठा फौज फाटा मागविण्यात आला होता. मात्र तरी देखील स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध करत हा ड्रोन सर्वे बंद पडलाय. पोलीस आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला असून स्थानिक लोक ड्रोन्सर्वेला तीव्र विरोध करत आहेत.
स्थानिक लोकांचा तीव्र विरोध होत असून देखील सरकारकडून या ड्रोन सर्वेचा घाट घालण्यात आला आहे.. मागील महिनाभरात स्थानिक लोकांनी दोन आंदोलने केली होती. मात्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद या लोकांना मिळाला नव्हता. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळतेय
उष्णतेपासून बचावा साठी दुभत्या जनावरांना थंड पाण्याचे फवारे
नाशिकच्या ग्रामिण भागात सध्या तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे,माणसां सह दुभत्या जनावरांना त्याचा त्रास होत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे दुभत्या जनावरांच्या दुधावर काहीसा परिणाम झाला असून उष्णतेच्या परिणाम होऊ नये जनावरांना थंडावा मिळावा यासाठी या जनावरांना सकाळ-संध्याकाळ पाण्याच्या स्प्रे मारत त्यांना थंड ठेवण्याचा प्रयत्न करताय.
हिंगोली शहरात पालिकेच्या वतीने नागरिकांना नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होत नसल्याने शहरातील अनेक भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत आहेत.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर नागरीक दुचाकी वर पाण्याच्या कॅन घेऊन मिळेल त्या ठिकाणाहून पाणी उपलब्ध करत आहेत.
दरम्यान शहरात प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी पाण्यासाठी भटकंती करणारे नागरिक करत आहेत
नंदुरबार-
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात मालवाहक ट्रकचा भीषण अपघात
अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारी ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळली
वाहनावरील ताबा सुटल्याने संरक्षण भीत तोडून ट्रक थेट 100 फूट खोल दरीत
अपघातात सुदैवानं जीवित हानी टळली मात्र पोषण आहाराचं मोठ नुकसान
वादग्रस्त माजी आयएअस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी आज दिल्लीत माध्यमांसमोर त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले असले तरी सुद्धा त्यांची यातून सुटका होणार नाही असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केलाय.
आज पूजा खेडकर चौकशीसाठी दिल्ली पोलिसांकडे हजर राहिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितलं
यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, "आज जरी आरोप पूजा खेडकर ने फेटाळले असले तरी यातून ती सुटणार नाही.
जे जे लोकं या प्रकरणात सहभागी आहेत ते पण बाहेर येतील. मी स्वतः या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार आहे."
महामार्गावर निवळी घाटात सीएनजी टँकर झाला पलटी
जयगड वरुन मुंबईच्या दिशेने जात होता टँकर
महामार्गाच्या कडेला झाला टँकर पलटी
टँकर पलटल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांकडून विशेष काळजी
उन्हाळी सुट्ट्या काल पासून सुरु झाल्यानंतर अनेक युवा उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सज्ज झालेय मनमाड लगत असलेल्या एका खाजगी तरण तलावात तीव्र उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी तर पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी युवा वर्ग पोहण्याचा आनंद लूटत असून सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी युवा वर्ग पोहण्याचा आनंद लूटत असल्याच पहावयास मिळत आहे.
सांगली मध्ये भर दिवसा धूम स्टाईलने चोरट्यांनी 40 तोळे सोन्याची दागिने लुटले आहेत.
शहरातील पुष्पराज चौकातील कर्मवीर पाटील पतसंस्थेच्या समोर एका वृद्धाचे ४० तोळे सोन्याची दागिने असलेली बॅग लंपास केली आहे.
ध्यानचंद सगळे वृद्ध आपले 40 तोळे सोन्याचे दागिने कर्मवीर पाटील पतसंस्थेमधील लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा पाठलाग करत दुचाकीवरून आलेल्या दोघां अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ,घटनास्थळी विश्रामबाग पोलिसांनी धाव घेतली असून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
वाशिममध्ये आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चाची सुरुवात वाशीम कृषि उत्पन्न बाजार समितीपासून झाली. त्यानंतर मोर्चा हिंगोली नाका, पुसद नाका, पोस्ट ऑफिस चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या मोर्चात जिल्हा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ट्रॅक्टरच्या गजरात शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले
परभणीच्या पेडगाव येथे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते
मात्र अद्यापही पाणी मिळाले नसल्यामुळे गावकऱ्यांना सध्या मागील बऱ्याच दिवसापासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे .
गावकऱ्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करून याकडे कोणीही लक्ष न दिल्याने संतप्त गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
ही घटना कळताच गावातील नागरिक पोलीस ग्रामसेवक यांनी या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा लेखी आश्वासनदिले आहे. तेव्हा गणेश देशमुख टाकी वरून खाली उतरले
जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर समन्स
उद्या सकाळी 11 वाजता वडूज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश..
या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या.
खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेले काही कार्यकर्ते यांना नोटिसा बजावल्याची माहिती मिळत आहे.
पालक मंत्री ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्य मंत्र्यांना आहे .
संजय राऊत कोण, त्यांनी त्यांच्या आघाडीचं बघावं , आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं प्रत्युत्तर मंत्री भरत गोगावले यांनी दिलंय.
रायगडचे पालकमंत्री पद गाव गुंडांकडे नसावं , आदिती तटकरे यांच्याकडे आलं तर स्वागत करतो असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यावरवते बोलत होते.
त्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाहीत म्हणून भरतशेठ दिसतोय कोण साव आणि कोण गावगुंड हे जनता ठरवेल.
जनतेने सलग चार वेळा निवडून दिल, मंत्री केल त्याला संजय राऊत गावगुंड म्हणत असेलतर चांगली बाब आहे.
आम्ही जी काही गावगुंडगिरी करतो ती जनतेसाठी, त्यांच्या विकास कामांसाठी, त्यांच्या सारख स्वतःच्या स्वार्थासाठी नाही
त्यांनी आघाडीकडे पहाव आमच्या युतीकडे नाही असा सल्ला गोगावले यांनी संजय राऊत यांना दिलाय.
पहलगाम हल्ल्या संदर्भातील चुकीची माहिती विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आक्षेप
रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षिकेवर आक्षेप
महाविद्यालयाचा दरवाजा बंद करून काश्मीर मधल्या हल्ल्या संदर्भातील चुकीची माहिती विद्यार्थ्यांना दिल्याचा संशय
चुकीची माहिती शिकवणाऱ्या महिलेला जाब विचारण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना महाविद्यालयात
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील पोलीस देखील महाविद्यालयात दाखल
प्राचार्यांच्या केबिनमध्ये शिक्षिकेला बोलवून विचारला जातोय जाब
शहरातील कर्मवीर चौकात वृद्धाचे ४० तोळे केले लंपास
बँकेच्या लॉकर मध्ये ठेवण्यासाठी वृद्ध आले असता दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या एकाने केली बॅग पळवली.
घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल.
कल्याण खडकपाडा परिसरात विक्रीसाठी आणलेल्या आंब्याच्या एका पेटीत घोरपडीचे पिल्लू सापडल्याने विक्रेता सह ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली .
खडकपाडा परिसरातील निळकंठ इमारती लगत आंबा विक्रेता आंब्याच्या विक्रीसाठी लावत होता याच दरम्यान ग्राहक देखील त्या ठिकाणी जमले या एका आंब्याच्या पेटीत घोरपडीचे पिल्लू आढळलं .
घोरपडीचे पिल्लू पाहून विक्रेत्यासह ग्राहकांचे देखील धांदल उडाली तत्काळ याबाबत प्राणी मित्रांना संपर्क साधण्यात आलं प्राणिमित्रांनी घटनास्थळी धाव घेत घोरपडीच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली
केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जात निहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे भाजपच्या वतीने धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये फटाके फोडून त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करीत स्वागत करण्यात आले आहे,
भारतातील कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत सर्व नागरिकांची जात निहाय जनगणना करण्यात येणार असल्यामुळे याचा फायदा सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना होणार असल्याचे म्हणत, आमदार अनुप अग्रवाल यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे, ईतके वर्ष काँग्रेस सत्तेत असताना जातनिहाय जनगणना करण्याचे फक्त राजकारण काँग्रेस तर्फे करण्यात आले असून, मात्र भाजप तर्फे जातनिहाय जनगणना करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
बदलापूरात महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून 1200 चिमुकल्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा केला ,
यावेळी वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने छावा चित्रपटाचा खुला शो ही आयोजित केला होता,
छत्रपती संभाजी महाराजकी जय अशा घोषणा देत छत्रपती संभाजी राजांची छावा चित्रपटातील शौर्यगाथा या चिमुकल्यांनी अनुभवली ,
सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,
तसेच चिमुकल्यांसाठी पुढील सात दिवस उन्हाळी मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं असून त्यात जुन्या काळातील खेळ, चित्रकला, वृक्षारोपण, मैदानी खेळ, योगा, नृत्य नृत्यकला चिमुकल्यांना शिकवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक वरूण म्हात्रे यांनी दिली.
माझ्यावर झालेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असे पूजा खेडकर म्हणाली.
नाव बदलल्याचं पूजा खेडकरकडून लंगडं समर्थन
दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर यूपीएससी तत्काळ स्वीकारत नाही
प्रमाणपत्र खोटं असल्याचं यूपीएससीनं कधीही म्हटलेलं नाही
पुणे शहरातील लोहगाव खराडी या दोन्ही परिसरांना जोडणारा अवघ्या तीनशे मीटरचा रस्ता पूर्णपणे खचलाय.
या रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांनी.
आज सकाळी दहा वाजल्यापासून बापू पठारे हे त्यांच्या काही कार्यकर्ते आणि स्थानिकांसोबत या तीनशे मीटर रस्त्याजवळ आंदोलनाला बसले आहेत.
या रस्त्याबाबत तक्रार करायला गेलं की या विभागाचे अधिकारी बघू, करू असं म्हणतात पण आता जोपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत मी असाच बसून राहणार असा पावित्र्य पठारे यांनी घेतला आहे.
पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन...
ग्रामीण भागातून शेतकरी ट्रॅक्टरसह अमरावती शहरात आंदोलनाला येण्यास सुरुवात
काही वेळातच मोर्चाला होणार सुरुवात
अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चाने वाहतूक जाम होण्याची शक्यता
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी,पिक विमा,शेतमालाला भाव,शेतीला तार कंपाउंड,वीज बिला सह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी निघणार ट्रॅक्टर मोर्चे..
अमरावती,अकोला ,बुलढाणा, आणि वाशिम जिल्ह्यात ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच आयोजन..
अमरावतीत खासदार अरविंद सावंत,वाशीममध्ये खासदार संजय देशमुख, अकोल्यामध्ये आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात निघणार ट्रॅक्टर मोर्चे.
बीडच्या परळी येथे 45 वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा परळी येथे पार पडत आहे त्यानिमित्त पंकजा मुंडे यांना आमंत्रित केले आहे गेली 45 वर्षापासून चालू असलेला उपनयन संस्कार सोहळा आज परळी येथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे यानिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी हजर होते.
नांदेड मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मात्र याच बाजार समितीत शेतकऱ्याची पिळवणूक होत असल्याचे पुढे आले आहे.
हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले मात्र प्रत्यक्ष टोकन देऊनही शेतकऱ्यांची हळद खरेदी केली गेली नाही.
तर काही व्यापारी दुकानातच सकाळी भाव पाडून शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत असल्याचे पुढे आले आहे.
या विरोधात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास बाजार समितीला टाळे ठोकू असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कल्याण पश्चिम रोहिदास वाडा परिसरात रस्त्यालगत चेंबरचे काम सुरू आहे .
या कामासाठी ठेकेदाराने 15 दिवसांपूर्वी खड्डे खोदून ठेवलेत मात्र अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे त्याचप्रमाणे या कामाच्या आजूबाजूला कुठेही बॅरिगेटिंग केलेले नाही .
आज सकाळच्या सुमारास एक दुचाकीस्वार यारस्त्यावरून घसरला आणि तो थेट दुचाकीसह या खड्ड्यात पडला ..
सुदैवाने त्याला किरकोळ दुखापत झाली मात्र या घटनेमुळे ठेकेदाराचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून केडीएमसीने अशा बेजबाबदार ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनेक ठिकाणी रस्ते व चेंबरची काम सुरू असून या कामांसाठी अनेक ठिकाणी खोदकामे करण्यात आलेली आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून संबंध ठेकेदाराला खोदकामे करण्यात आलेल्या ठिकाणी कामे सुरू असलेल्या ठिकाणी सूरक्षिततेची काळजी घ्यावी अशी ताकीद देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ठेकेदाराचा बेजबाबदारपणा सुरूच असल्याचे आज दिसून आले.
आगीत दुकानातील विक्रीसाठी असलेले संपूर्ण नवीन कुलर, फ्रिज यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक होऊन जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती असून काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत दुकानाच्या सर्व मजल्यावर आग पोहोचली
घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळ गाठले .आठ ते दहा अग्निशमन बंबांच्या माध्यमातून भीषण आग तब्बल चार ते पाच तासानंतर पहाटे साडेसहा वाजता आटोक्यात आली
आग आटोक्यात येईपर्यंत....भीषण आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.
रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण होत असल्याचे उघडकीस आले आहे.
मोरेवाडी मार्गे खांडस राज्यमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर हे डांबरी करणाचे काम सुरु असून पाथरज येथील ग्रामस्थांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे व्हिडीओ काढत अक्षेप नोंदवला आहे.
मातीने भरलेल्या रस्त्यावर कोणतीही पूर्व प्रक्रिया न करता थेट कार्पेट डांबरीकरण केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
रस्त्यावरील माती बाजूला न करता डांबरीकरण केले जात असेल तर त्या कामाचा चौकशी केली जाईल, जर काम खराब असेल तर ठेकेदाराकडून दुरुस्त करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी या प्रकरणी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपुर गावातील प्रकार....
उष्णतेमुळे तलावातील शेकडो मासे मृत....
तलावाच्या काठावर शेकडो माशांचा पडला खच.....
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस वर.....
तलावात मृत्युमुखी पडलेल्या माशांमुळे समशेरपुर गावात पसरली दुर्गंधी .....
पसरलेल्या दुर्गंधीमुळे गावकरींचे आरोग्य धोक्यात....
संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात वाहतूक कोंडी...
घारगाव येथे सकाळपासून वाहतूक कोंडी...
वाहतूक कोंडीत दोन ॲम्ब्युलन्सही अडकल्या अडकल्या..
सकाळी आठ वाजेपासून वाहतूक कोंडी...
महामार्ग विस्तारीकरण कामाचा नागरीकांना फटका...
प्रशासनाचे ठिसाळ नियोजन...
कालही भर दुपारी चार तास झाली होती वाहतूक कोंडी...
आज सकाळपासून पुन्हा प्रचंड कोंडीने वाहन नागरिक हैराण...
हडपसर स्थानकावरून सुटेल/टर्मिनेट होईल
पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म उपलब्धतेच्या अडचणीमुळे, गाडी क्रमांक 05289/05290 मुजफ्फरपूर – पुणे – मुजफ्फरपूर विशेष गाडीचे प्रारंभ/समाप्त स्थानक तात्पुरते पुणे ऐवजी हडपसर असे करण्यात आले आहे.
हा बदल पुढील सूचनेपर्यंत लागू असेल.
बदलाचा तपशील पुढीलप्रमाणे:
गाडी क्रमांक 05289 मुजफ्फरपूर – हडपसर विशेष आता ही गाडी पुणे ऐवजी हडपसर येथे टर्मिनेट होईल.
हडपसर आगमन वेळ: सकाळी 06:25 वा. प्रभावी तारीख: 05 मे 2025 (सोमवार)
गाडी क्रमांक 05290 हडपसर – मुजफ्फरपूर विशेष
आता ही गाडी पुणेऐवजी हडपसर येथून सुटेल.हडपसर प्रस्थान वेळ: सकाळी 10:00 वा.
प्रभावी तारीख: 07 मे 2025 (बुधवार)
यात्रेची योजना करताना प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी.
पुणे विभाग, मध्य रेल्वे यांच्यातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी व जोडणी वाढवण्यासाठी हडपसर (पुणे) – जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात येत आहे.
गाडी क्रमांक 01401 हडपसर (पुणे) – जोधपूर उद्घाटन उद्या धावेल.ही गाडी हडपसर (पुणे) येथून 17:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 14:00 वाजता जोधपूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01402 जोधपूर – हडपसर (पुणे) एकमार्ग TOD विशेष रविवारी धावेल.ही गाडी जोधपूर येथून 20:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 17:00 वाजता पुणे येथे पोहोचेल.
या ठिकाणी थांबणार ही गाडी - चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, जवाई बांध, फालना, राणी, मारवाड, पाली मारवाड, लूणी.
कोच रचना 1 एसी 2-टियर, 4 एसी 3-टियर इकॉनॉमी, 5 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 जनरेटर कार, 1 सामान व गार्ड यासाठी ब्रेक व्हॅन.
आरक्षण: गाडी क्रमांक 01401 साठी आरक्षण 02.05.2025 रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व IRCTC वेबसाइटवर सुरु होईल.
अनारक्षित कोचचे तिकीट UTS App वरून सामान्य दरात बुक करता येतील जे सुपरफास्ट मेल/एक्सप्रेससाठी लागू आहेत.
2 मे पासून ते 4 मे पर्यंत असा तीन दिवस होत आहे. या भव्य महोत्सवानिमित्ताने महाबळेश्वरातील विविध पाँइंटवर विविध कार्यक्रम ठेवले आहेत. या उत्सवाच्या पूर्वसंधेला वेण्णालेक परिसरात केलेल्या लेझर शोमुळे उपस्थित सर्व पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत.
बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान दरम्यान खरवई इथे रुळाखालून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठे पाईप टाकण्याचं काम सुरू केलंय.
हे काम करत असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने शेताचे बांध, बंदिस्ती तोडून शेतजमिनीचं नुकसान केलंय.
त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी शेती लावताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
याबाबत खरवई येथील स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र जमून याविरोधात अंबरनाथच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.
विकासकामांना आमचा विरोध नाही, मात्र आमच्या शेतीचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांकडे केली आहे.
- ११:३० वाजता माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव मध्ये जाऊन सांत्वनपर भेट घेणार आहेत.
- भाजपचे बीड विस्तारक बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी झाली होती हत्या.
- माजलगाव शहरातील भाजप कार्यालयासमोरच नारायण फपाळ याने कोयत्याने वार करत केली होती निर्घृण हत्या.
- मंत्री पंकजा मुंडेंनी कुटुंबियांना फोनवरून धीर दिला होता. आपण भेटायला येणार असंही आश्वासन दिलं होतं
परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथील घटना परिमाळा बाबुराव कावळे वय 65 वर्ष असे मयताचे नाव आहे
आरोपी दारूडा पुतण्या चंद्रकांत धुराजी कावळे वय 25 वर्ष कावळ्याचीवाडीतील धक्कादायक घटना
आरोपी चंद्रकांत कावळे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी परिमाळ कावळे यांच्याकडे करायचा त्याही त्याला पैसे देत होत्या परंतु आरोपी हा सतत पैशाची मागणी करून त्रास देत होता
काल 6 वाजताची घटना असून आरोपीने परिमाळा यांच्याकडे पैशाची मागणी केली होती मात्र माझ्याकडे पैसे नाही येत त्याचाच राग आल्याने आरोपीने आपल्या सोबत आणलेल्या कुराडीने अंगावर व डोक्यावर सपासप वार करून तो तिथून फरार झाला आहे त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे
याप्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती
मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालय प्रेत पाठविण्यात आले आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना तळपत्या उन्हात उभं राहून तिकिटं काढावी लागतायत.
बदलापूर पश्चिमेकडील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी उन्हात उभं राहावं लागतंय.
बदलापूर शहरातील तापमानाचा पार चाळीशी पार गेला आहे. त्यात ही तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागतोय.
काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील तिकीट खिडकी तोडण्यात आली असून ती तात्पुरत्या स्वरूपात होम प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे.
मात्र सध्या उन्हाचा पारा बघता इथे किमान शेडची व्यवस्था तरी करावी, अन्यथा ही तिकीट खिडकी सावलीत ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याची सुतराम शक्यता नसल्याचं म्हटलं आहे
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या जाणीवपूर्वक बातम्या बरेच दिवसापासून पेरल्या जात आहेत.
वास्तविक असे काहीही होण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ अफवा आहेत
दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा अजित पवार आणि मित्र मंडळी प्रतिगामी विचाराच्या भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडतील.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सोशल हँडलवर घोषणा
- राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय अग्रेसर ठरले आहे.
- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे काम राज्यात पाचव्या क्रमांकावर लक्षवेधी ठरले आहे.
- कमी कालावधीत जिल्हाभरातील पोलीस स्टेशनमध्ये अमूलाग्र बदल घडवला आहे
वाशिम जिल्ह्यातील शासकीय 52 रूग्ण वाहिकांवरील कंत्राटी चालकांचे मागील 5 महिन्यांपासून वेतन थकीत असल्यानं या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
या 102 रुग्ण वाहिकेद्वारा गर्भवती महिला तसेच प्रसूती झालेल्या महिला आणि त्यांच्या बाळांची घरापासून रुग्णालयापर्यंत ने - आण केल्या जाते.
तसेच अत्यावश्यक वेळी इतर जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयात ही ने - आण करावी लागते.
एवढी अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील 102 या शासकीय रुग्णवाहिका चालकांना मागील 5 महिन्यांपासून वेतन नसल्यानं त्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह ही चालवणं कठीण झालं आहे.
त्यामुळं या रुग्णवाहिका चालकांनी आरोग्य प्रशासनाला थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. जर 4 मे 2025 पर्यंत थकीत वेतन मिळालं नाही तर 5 मे पासून रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्याचा निर्णय 102 रुग्णवाहिका चालकांनी घेतला आहे.
जर या रुग्णवाहिकेची सेवा बंद पडली तर गरोदर माता आणि प्रसूती झालेल्या माता तसेच लहान बालकांची फरफट होणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी महिलांसाठी काम करणाऱ्या आणि त्यांना शिक्षणाचा मुळ प्रवाहात आणून महिला सक्षमीकरण करणाऱ्या वेस्ट खान्देश बघिणी सेवा मंडळाचे अध्यक्ष स्मिता अजमेरा यांना इंडो युरोपियन एक्सेलंसी हा आंतरराष्ट्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे नुकताच मुंबई येते झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला...
शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना हिंगोलीत एका कृषी सहाय्यकासह तलाठ्याचा निर्घृण खून करण्यात आल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेत पोलीस योग्य तपास करत नसल्याने आरोपी अद्यापही फरार आहे दरम्यान याच आरोपींना पोलिसांनी अटक करण्यासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया पुढे मृत कृषी सहाय्यक राजेश कोल्हाळ यांच्या पत्नीने आमरण उपोषण सुरू केले आहे तर तलाठी संतोष पवार यांच्या पत्नीने देखील हिंगोली जिल्हा पोलीस दलावर गंभीर आरोप करत पोलीस गुन्ह्याचा योग्य तपास करत नसल्याचा आरोप केला आहे, धक्कादायक म्हणजे कृषी सहाय्यकाचा खून करणारा आरोपी निष्पन्न झाला आहे मात्र वर्षभरापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होत असल्याचं पुढे आला आहे त्यामुळे या गुन्ह्याचा तपास गृह मंत्रालयाने विशेष शाखेकडे द्यावा अशी मागणी देखील या कुटुंबीयांनी केली आहे
"माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार्या एफ आरपीचे भाजपा किसान मोर्चाने स्वागत केले आहे. केंद्र सरकारने ऊस दराच्या एफ आरपीत प्रति टन 150 रूपयांची वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरी येथे पेढे वाटून स्वागत केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ऊसाला किमान हमीभाव प्रतिटन 3 हजार 550 रूपये इतका मिळणार आहे. सरकारने साखरेच्या खरेदी दरात वाढ करावी अशी मागणी ही हळणवर यांनी केली आहे.
पीएमआरडीए कडून अद्याप कामाला सुरुवात नाही
टेंडर प्रोसेसिंग सुरू असल्याने विलंब
बनेश्वर येथील ७०० मीटर रस्तासाठी सुप्रिया सुळे यानी केले होते उपोषण
पीएमआरडीए कडून सुप्रिया सुळे यांना २ मे म्हणजे आजपासून कामाला सुरुवात करू असे दिले होते लेखी आश्वासन
मात्र पीएमआरडीए च्या दिरंगाईमुळे आज ही रस्त्याचे काम सुरू नाही
सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाला पीएमआरडीए ने देखील गांभीर्याने घेतले नाही का असा प्रश्न विचारला जात आहे
बीडच्या नागझरी येथील वन विभागाच्या डोंगराला अचानक आग लागली आहे
या अचानक लागलेल्या आगीमुळे वन विभागाकडून डोंगर परिसरामध्ये छोटी मोठी झाड लावण्यात आली होती
या भीषण आगीमुळे झाडे जळून खाक झाले असून त्याचबरोबर काही वन्य प्राण्यांची यामध्ये मोठी हानी होऊ शकते अशी शंका वर्तवली जात आहे
ही आग विझवण्यासाठी गेल्या दोन तासापासून शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.
ही आग विजवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी हनुमंत वायभट,दशरथ गुजर, विलास नवले, शंकर शिंदे, मधुकर नैराळे,बबन पाव्हणे, गौतम वीर,बडगे चंद्रकांत, मेटे महेश, अकबर शेख, परमेश्वर पाव्हणे, परमेश्वर नाईक,शहादेव चव्हाण, बळीराम चव्हाण,संदिप पवार, मधूकर वायभट, लक्ष्मण जाधव, बळीराम चव्हाण आहेत..
जळगाव जिल्ह्यातील हतूनर, गिरणा आणि वाघूर या मोठ्चा, १४ मध्यम आणि ०६ लघु प्रकल्पात सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त जेलसाठा शिल्लक आहे.
हतनूर आणि गिरणा प्रकल्पातून सिंचनासह पेयजलाचे तीन आवर्तन देण्यात आले आहेत. तसेच गिरणा प्रकल्पातून चार आवर्तन पेयजलाचे शिल्लक आहेत.
यापैकी फक्त गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी चौथे आवर्तन मागणीनुसार येत्या काही दिवसात लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तापमानाचा पारा कमालीचा वाढला असल्याने जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होत आहे.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळावं.
याकरिता, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले होते..
यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे..
यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारी मदत मिळणार आहे...
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
देहूतून १८ जूनला संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान तर आळंदीतून १९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान
दोन्ही सस्थानकडून पालख्यांचे वेळापत्रक घोषित
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय.
नगर परिषद धाराशिव, जलसंधारण विभाग,टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीतील गाळ काढण्यात येणार आहे
.नदीतील गाळ काढल्याने भविष्यात नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव व लोणी गुरव येथे कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प - २ अंतर्गत प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची प्रभातफेरी, मशालफेरी व शिवारफेरी काढण्यात आली. पाणी अडवा, पाणी जिरवा ... तसेच झाडे तोडू नका होईल नाश असा संदेश या प्रभातफेरी मधून देण्यात आलाय...
रोहा शहरात एकाच रात्री तीन इमारतींमध्ये घरफोडीच्या सहा घटना समोर आल्या होत्या. या घटनेने पोलिसांची झोप उडाली होती. या चोरी- घरफोडी प्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही तपासत एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. यात चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाचाही समावेश आहे.
राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात
अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद
सूर्यदेवाचा प्रकोप पुण्यात सुरूच! पुणे शहरच पारा ४३ अंशावर
विदर्भातील जिल्ह्यांबाबत अकोला पाठोपाठ अमरावती ४२.८, वाशिम ४२.६, वर्धा ४२.१, चंद्रपूर ४१.८, नागपूर आणि यवतमाळ ४१.६ तर बुलढाण्यात ४०.८ अंश इतक्या तापमानाची नोंद
मराठवाड्यातील बीड मध्ये ४२.९, धाराशिव ४२.६, छत्रपती संभाजीनगर ४२ तर परभणी मध्ये ४१.६ अंश तापमानाची नोंद
मध्य महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव मध्ये, जळगावात ४४ अंश तापमान
सोलापूर मध्ये ४४.१, पुणे ४३, मालेगाव मध्ये ४२.२, सातारा ४१.२ तर नाशिक मध्ये ४० अंश तापमानाची नोंद
केंद्र सरकार ने जातीय जनगणना केली जाणार असल्याच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी या निर्णयाच्या स्वागतार्थ जल्लोष केल्याचं पाहायला मिळतंय.
पुण्यात सुद्धा फुले वाड्यात सर्व फुले प्रेमी आणि ओबीसी रणसंग्राम तर्फे जातनिहाय जनगणना घोषणेचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून यावेळी पुरुषांनी फुगडी खेळत या निर्णयाचे स्वागत केलं.
ढोल ताशा वाजवत आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
ज्या पुण्यात फुले सिनेमातील काही दृश्यांना विरोध झाला होता त्याच पुण्यात महिलांसाठी या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केला गेला.
युवाशक्ती सोशल फाउंडेशन व समीर उत्तरकर यांच्या वतीने पुण्यात महिलांसाठी फुले चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन काल १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते.
या शोच्या माध्यमातून सर्वांपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार पोहोचावेत या उद्देशानेच या मोफत शोचे आयोजन केले होते असं आयोजकांकडून सांगण्यात आलं.
हा मोफत शो पाहण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला...
पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये सुरू होते उपचार
अंतिम पार्थिव दर्शन-
दुपारी २ वा.
(भवानीनगर - निवासस्थानी, अहिल्यानगर)
अंत्यविधी -
दुपारी ४ वा.
(अमरधाम, अहिल्यानगर)
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील होते
शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचे मुदतीत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आता कुठलेही व्याज न आकारता शून्य टक्के व्याजदराने पीक कर्जाची वसुली करण्याचा निर्णय यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलाय या संदर्भात सर्व शाखांना निर्देश देणारे पत्र पाठवण्यात आले असून शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे.
चिखली तालुक्यात अविध पणे शेकडो वर्षांपूर्वीचे शेकडो वृक्ष कुठलीही परवानगी न घेता तोडण्यात आली आहे...
ही तोडलेली झाडे चिखली शहरात एका निर्जंनस्थळी साठवून ठेवण्यात आली आहेत..
ही झाडे तोडण्यासाठी वन विभगगाची परवानगी घेणे आवश्यक असताना तिथे परवानगी न घेता असंख्य वृक्ष तोडली जात आहेत..
याची तक्रार सुद्धा वन विभागाकडे करण्यात आली आहेत मात्र वन विभागाने त्याची साधी चौकशी सुद्धा केली नाही..
त्यामुळे पाणी कुठेतरी मूर्तंय असा संशय व्यक्त केला जात आहे..
चिखली येथील जी झाडे तोडल्या गेली त्याची वन विभागाने तातडीने चौकशी करावी तसेच ही वृक्ष तोडण्याऱ्यावर व कोणाच्या सांगनमताने तोडल्या गेली याची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे
1 मे महाराष्ट्र दिनी तिवसाळा ग्रामपंचायत मध्ये रात्री उशिरा पर्यत राष्ट्रध्वज उतरविला गेला नाही,त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे..
यवतमाळ पालिकेच्या वतीने वापर करण्यात येणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या थकबाकी तब्बल 30 कोटी रुपये इतकी झाली असून या थकबाकीच्या वसुलीसाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक थेट पालिका कार्यालयात वसुलीसाठी धडक देत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन थकबाकी भरणा करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेच्या वतीने दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील गावगाड्यातील कामे सध्या ठप्प झाली आहेत.
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीने गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
ही संस्था महाराष्ट्रात ३२ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिन्यातील एक रविवार महाराज्यांच्या प्रत्येक गडकिल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवण्यात येते..
राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून यशवंत गड, जयगड, रत्नदुर्ग, पुर्णगड, आंबोळगड, गोविंदगड, सुवर्णदुर्ग, किल्ले सिंधुदूर्ग अशा विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती.
मोहीमेसाठी जयगड, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, लांजा, सांगली, गोवा, सावंतवाडी येथून परिवाराचे सदस्य दाखल झाले होते.
बदलापूरात महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून 1200 चिमुकल्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा केला,
यावेळी वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने छावा चित्रपटाचा खुला शो ही आयोजित केला होता,
छत्रपती संभाजी महाराजकी जय अशा घोषणा देत छत्रपती संभाजी राजांची छावा चित्रपटातील शौर्यगाथा या चिमुकल्यांनी अनुभवली,
सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं
या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,
तसेच चिमुकल्यांसाठी पुढील सात दिवस उन्हाळी मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं असून त्यात जुन्या काळातील खेळ, चित्रकला, वृक्षारोपण, मैदानी खेळ, योगा, नृत्य नृत्यकला चिमुकल्यांना शिकवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक वरूण म्हात्रे यांनी दिली.
मावळच्या शिळींब गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजा करण्यात आले...
लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
दरम्यान यावेळी संपूर्ण गावातून कळस मिरवणूक, काढण्यात आली या कळस मिरवणुकीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
काल्याच कीर्तनाची सेवा ह भ प. शिवा महाराज बावस्कर यांच्या हस्ते करण्यात आली आहे. किर्तन ऐकण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतून भाविक आले होते.
महाप्रसादांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.