Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : सांताक्रुझ वाकोल्यात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शनिवार, दिनांक २१ जून २०२५, आषाढी वारी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, घाटमाध्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सांताक्रुज वाकोल्यात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या अपमानास्पद टीकेमुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटाकडून राऊत यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला याची कुणकुण वाकोल्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना लागतात शेकडो कार्यकर्ते विनायक राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले.

दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली असताना वाकोला पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना वाकोला पोलीस ठाण्यातl जवळ रोखून भरले शिंदे गटाकडून विनायक राऊत यांचा निषेध खेळण्यासाठी तृतीयपंथीयांना देखील बोलवण्यात आले. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका देखील करण्यात आल्या.

वारकऱ्यांनी केली मेट्रोची सफर; मेट्रोत माऊलीचा जयजयकार

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी च पुण्यात काल आगमन झालं असून पालखी च आज पुण्यात मुक्काम आहे.पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या हे मुक्कामाला असताना आज सकाळपासून मोठ्या संख्येने वारकरी तसेच पुणेकर नागरिक हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शनासाठी लाईन लावून दर्शन घेत आहे. अनेक पुणेकर वारकऱ्यांची विविध सेवा करत असताना सागर खोत मित्र परिवारकडून वारकऱ्यांना स्वारगेट ते वनाज अशी सफर घडवण्यात आली. यावेळी वारकऱ्यांनी मेट्रो माउली,माउली, च जयघोष...ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष केला.

डोंबिवलीत रिक्षाचालकांचा मुजोरी,भररस्त्यात रिक्षा थांबवत वाहतूक पोलिसांशी हुज्जत

चौथ्या सीटवर कारवाई केल्याने रिक्षाचालकानी भर रस्त्यात रिक्षा थांबवत वाहतूक पोलिसांशी आणि अधिकाऱ्यांशी घातली हुज्जत

डोंबिवली पश्चिमेत प्रवाशांची बसदेखील अडवली

प्रवाशाची हाल पाहता कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे उतरले रस्त्यावर

"नागरिकांना त्रास दिला तर मागेपुढे बघणार नाही...रिक्षाचालकांना आमदारांनी दिला खडसावणारा इशारा

Beed : बीड जिल्ह्यात लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

बीड जिल्ह्यात लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विहिरीचा लाभ देण्यासाठी सरपंचानेच लाच मागितली... आणि एसीबीच्या जाळ्यात अडकला...!

Maharashtra Politics :  राष्ट्रवादीसोबत पुन्हा बसण्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिले संकेत

राष्ट्रवादी सोबत पुन्हा बसण्याचे मंत्री भरत गोगावले यांनी संकेत दिले आहेत.

वरिष्ठ पातळीवरून जो आदेश येईल, त्याचं पालन आम्ही तीनही आमदार करू, गोगावले म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादी सोबत बासणार का ? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गोगावले यांची प्रतिक्रिया

पुण्यात पावसाला सुरुवात, एक दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्यानं ठोकला एका घरात मुक्काम

- सिन्नरच्या शिवडे गावातील घटनेनं खळबळ

- बिबट्यासोबत कुत्राही होता, मात्र कुत्रा सुरक्षित

- घरातील महिलांना रात्रीच्या वेळी बिबट्याची हालचाल आली लक्षात

- घरातील पुरुषांनी रात्रीच्या अंधारात बॅटरी लावून बिबट्या असल्याची केली खात्री

- विलास राजाराम हारक यांच्या घरात शिरला होता बिबट्या

- वनविभागाने पहाटे ४ वाजेला बिबट्याला केलं जेरबंद

- सिन्नरमध्ये बिबट्याने चिमुकलीला ठार केल्याची घटना ताजी असतांना दुसरी घटना समोर

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी मोफत आरोग्य सेवा

पुणे येथील संत देवजी बाबा मंदिरासमोर “समतेचा वारकरी, सेवा हिच माझी पंढरी” या उपक्रमांतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या साधू, संत, वारकरी, भाविक आणि भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा आणि इतर सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्नछत्राच्या अन्नवाटप उपक्रमाचे उद्घाटन महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे (माऊली) होते. डॉ. बाबा कांबळे यांनी पुणे ते पंढरपूर या मार्गावर या सेवा राबवल्या जाणार असल्याची माहिती दिली.

या उपक्रमात पुणे ते पंढरपूर या मार्गावर वारकऱ्यांसाठी खालील १२ प्रकारच्या मोफत सेवांचा समावेश आहे:

पुणे येथील कसबा पेठमध्ये पिंपळाचे झाड पडले

कोणत्याही प्रकारची जीवित हानी नाही

रिक्षांचे नुकसान झाले

पोलीस प्रशासन पालिका प्रशासन अग्निशामक दलाने तात्काळ झाड हटविले

आषाढी एकादशीनिमित्त यावर्षी पालघर मधून 55 ज्यादा बसेस सोडवण्यात येणार आहे

पालघरच्या पालघर, सफाळे बोईसर ,नालासोपारा ,डहाणू ,वसई या बस आगारांमधून पंढरपूर साठी 55 जादा बसेस सोडण्यात येणार असून यामुळे आषाढीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले .

नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- २,३२० क्यूसेकवरून ३,९४४ क्यूसेक इतका वाढवला पाण्याचा विसर्ग

- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे विसर्गात वाढ

- नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार

शोकाकुल वातावरणात दीपक पाठक यांना अखेरचा निरोप

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृतदेह आज बदलापुरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. यावेळी बदलापूरकरांनी साश्रूनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर दीपकचं पार्थिव पाहून कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. मांजर्लीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोदावरीला पूर, नाशिक शहरात शिरलं पाणी

- नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर परिस्थिती

- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

- दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत गोदावरीच्या पुराचे पाणी

- सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पूर परिस्थिती कायम

- साम टीव्हीच्या बातमी नंतर प्रशासनाला आली जाग

- गोदा घाटावर सुरक्षारक्षकांची नियुक्ती

तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांनी ती फेटाळत पक्षाशी निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नर्मदा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तरुणावर मगरीचा हल्ला

नर्मदा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तरुणावर मगरीचा हल्ला....

मगरीच्या हल्ल्यात तरुणाचा पायाला गंभीर इजा...

अक्राणी तालुक्यातील भरड गावानजीक असलेल्या नर्मदा नदीपात्रात आंघोळ करत असताना झाला हल्ला...

नर्मदा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने मगरींचा वाढला वावर....

कमलेश पावरा असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव....

मगरीचा हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आलं दाखल...

यापूर्वी नर्मदा काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांवर झाला आहे मगरीचा हल्ला...

 कोल्हापुरात घाटमाथ्यावर संततधार सुरू, पंचगंगा नदीची पाणी पातळी २८ फुटांवर

कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी, घाटमाथ्यावर पावसाची संततदार सुरू आहे. त्याचबरोबर राधानगरी धरणातील विसर्ग देखील सुरू असल्याने पंचगंगा नदी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी २८ फुटांवर आहे. जिल्ह्यातील २० बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे.

'तटकरेंचा खरा चेहरा समोर आणणार'; आमदार दळवींचा तटकरेंविरोधात घणाघात

० तटकरेंचा खरा चेहरा आता मी महाराष्ट्रासमोर आणणार.

० आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरे यांच्याविरोधात घणाघात.

० अलिबाग येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीत दळवी यांनी तटकरे यांवर तोफ डागली

० जेंव्हा तटकरेंना मोठ पद हव असता, एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेंव्हा तटकरे महाराजांचा आधार घेतात

० भैयुजी महाराजांचे नाव घेत केला आरोप

० याच्या अधिकृत कॅसेट आपल्याकडे असल्याचे देखील दळवी म्हणाले

आरोग्य मंत्री अॅक्शन मोडवर; कोल्हापुरच्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना धरलं धारेवर

आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर ॲक्शन मोडवर.

कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटलमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना धरलं धारेवर

१०० कर्मचारी असूनही रुग्णांची होत आहे हेळसांड.

रुग्णालयाच्या आढावा बैठकीत घेतली झाडाझडती.

अमरावती जिल्ह्यात केवळ १० टक्के पेरण्या, बळीराजा चिंतेत

अमरावती जिल्ह्यात जून महिना सरत आला असतानाही अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. मे महिन्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसामुळे जमिनीत काहीसा ओलावा निर्माण झाला होता. त्यानंतर जून महिन्यातही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, मात्र तो पुरेसा ठरलेला नाही.

आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात केवळ ६३ मिमी इतकाच पाऊस झाला आहे. परिणामी, जिल्ह्यात फक्त १० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवस पुणे मुक्कामी

क्कामादरम्यान अनेक जण वारकऱ्यांची सेवा विठ्ठल सेवा म्हणून करतात.

पुण्यातील साखळीपीर तालीम मंडळही गेले तीस वर्षाहून अधिक वर्ष वारकरी सेवा करत आहेत.

वारकऱ्यांच्या पायाची मालिश करणे,चप्पल दुरुस्ती करणे, बॅग दुरुस्ती, दाढी, मसाज या सगळ्या सेवा मोफत केल्या जातात.

वारकऱ्यांचा थकवा दूर करण्याचा आणि वारकरी सेवा केली जाते.

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी नाही तर फक्त मार्गदर्शक सूचना

सातारा जिल्ह्यात होणाऱ्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शक सूचनेचा आदेश काढत पर्यटन स्थळांवर जाण्याबाबत काही सूचना केल्या आहेत जोरदार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल आहे.

अनेक पर्यटक धबधब्यांच्या शेजारी जाण्याचं धाडस करतात यामुळे अपघात होतात

तसेच घाटमाथ्यावरून प्रवास करताना पर्यटकांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा सूचना देत हा आदेश काढण्यात आला

नंदुरबार शहरातीन जी टी पाटील महाविद्यालयात पतंजली योग शिबिराचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने आज नंदुरबार शहरातील जी टी पाटील महाविद्यालयाचा प्राणांगणा पतंजली योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पतंजली योग शिबिरात आरोग्य संदर्भात मार्गदर्शन करत योग संदर्भात मार्गदर्शन करत प्रात्यक्षिके करण्यात आली या शिबिराला माजी खासदार डॉ हिना गावित उपस्थित होत्या....

Yavatmal: यवतमाळमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

यवतमाळ येथील पोलीस कवायत मैदानमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 40 संस्थांचा सहभाग नोंदविण्यात आला होता.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड,जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.

तसेच जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, शाळांसह ठिकठिकाणी योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Kalyan: केडीएमसीची वेबसाईट बंद; 490 पदांची भरती लटकली, सुशिक्षित बेरोजगारांमध्ये संतापाचा उद्रेक

गट-क आणि गट-ड मधील 490 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, परंतु www.kdmc.gov.in वेबसाईट सतत डाऊन.

अर्ज भरण्यासाठी वेळ कमी, पण वेबसाईट लोड न झाल्याने तरुणांची धावपळ; हेल्पलाइनही सतत व्यस्त.

तांत्रिक अडचणी कायम; उमेदवारांकडून अर्ज मुदतवाढीची आणि त्वरित उपाययोजनांची मागणी.

बार्शीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांची शिवसेनेच्या वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमासीला दांडी

- दिलीप सोपल हे शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत

- आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या दोन्हीही कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या.

- आमदार दिलीप सोपल दोन दिवसापासून बार्शी मतदारसंघ आणि जिल्ह्याबाहेर असल्याची सूत्रांची माहिती.

- यापूर्वीही शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक महत्वाच्या बैठकांना आमदार दिलीप सोपल यांनी मारली होती दांडी.

- दिलीप सोपल यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या दोन्हीही कार्यक्रमांना गैरहजर लावल्यामुळे चर्चेला उधाण

आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून तटकरेंवर जमिन घोटाळ्याचे गंभीर आरोप

यगड जिल्ह्यात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादीतील वाद पार टोकाला गेला आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आता थेट तटकरे कुटुंबांवरती सरकारी जमिन लाटल्याचा गंभीर आरोप करत आदिती तटकरे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा मागितला आहे. या मुळे आता तटकरे विरूद्ध शिवसेना यामध्ये नवीन वाॅर पहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील दुरटोली गावा जवळील एका सरकारी जमिनीवर आधी शेतकऱ्यांचे नाव लावले नंतर ती जमीन तटकरे यांनी विकत घेतली असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला असून याच मुद्यावर थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मर्सिडीजची धडक, नवी मुंबईत विवाहितेचा मृत्यू, 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी खारघर पोलिसांच्या ताब्यात

खारघर मध्ये बुधवारी सायंकाळी 7 वाजता गोपाल यादव आणि रेखा हे दोघे पती-पत्नी स्कूटरवरुन नवीन पनवेल येथे परत येत असताना अपघात झाला होता.

बेलापूर वरून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली.

या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला.

ही घटना बुधवारी रात्री नवी मुंबईतील शीव-पनवेल मार्गावर खारघर परिसरातील हिरानंदानी ब्रिजजवळ घडली असून खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या 19 वर्षीय मर्सिडीज कार चालक तरुणीला ताब्यात घेतले आहे.

संभाजी ब्रिगेड राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार- केंद्रीय अध्यक्ष मनोज आखरे

सभा विचारी पक्षांसोबत हात मिळवणी करणार.

सत्ते शिवाय शहाणपण नाही...

भाषेचा वाद हा पॉलिटिकल स्टंट म्हणून भाषेकडं बघितलं जात आहे...

नागरिकांचे प्रश्न सोडवता यावे यासाठी निवडणुकीत उतरणार...

राजसत्तेत जाण्यासाठी उमेदवारी करणार...

नंदुरबार येथे आगामी निवडणुकीचा पार्श्वभूमीवर घेतली बैठक...

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

ही चिकित्सा पद्धती आहे.

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील केबिन क्रू दीपक पाठक यांचं पार्थिव बदलापूरकडे रवाना

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मरण पावलेले केबिन क्रू दीपक पाठक यांचं पार्थिव बदलापुरातील त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालय.

इथल्या मांजर्ली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

दीपक पाठक हे अकरा वर्ष एअर इंडियात कार्यरत होते.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत त्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. डीएनए जुळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दीपक पाठक यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलाय.

दीपक पाठक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

कल्याण-डोंबिवलीत ‘पॅनल की सिंगल वॉर्ड?’ वादावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुक पॅनल पद्धतीने होणार आहे मात्र निवडणुकीपूर्वीच पॅनल पद्धतीवरून शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गटात जुंपल्याचेपाहायला मिळत आहे.ठाकरे गटाने निवडणुकीतील पॅनल पद्धतीने निवडणुका घेण्यास विरोध करत तीव्र आंदोलनाची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाने कोणतीही निवडणूक पद्धत असो — आमची तयारी पूर्ण असल्याचं ठामपणे सांगत विरोधकांवर प्रतिउत्तर दिलं आहे.

Kalyan: कल्याण शीळ रोड वरील पलावा पूलाला पुन्हा ‘तारीख पे तारीख

कल्याण-शिळ रोडवरील पालावा जंक्शन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन मार्चपासून प्रवाशांसाठी सुरू करण्याचं आश्वासन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिलं होतं. मात्र, कामाची गती संथ असल्याने या पुलाचं उद्घाटन मे अखेरीस होणार असल्याचं पुन्हा सांगण्यात आलं. ती तारीखही गाठली गेली नाही.या विलंबाविरोधात ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी गाजर व नोटा दाखवून आंदोलन केलं होतं.

इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अबीर चित्रपटाची निवड

सुदेश झावरे पाटील दिग्दर्शित अबीर मराठी चित्रपटाची जर्मनी मध्ये होणाऱ्या इंडियन फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे.

या चित्रपट फेस्टिव्हलमध्ये जगभरातील 194 देशांमधून तीन भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. यामध्ये अबीर या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.

स्त्री जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटातातून महिलांवर होणार्या अन्याय अत्याचारा वाचा फोडण्याचे काम केल्याचे चित्रपट निर्माते झावरे पाटील यांनी सांगितले.

भुसावळ रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह रेल्वे विभागाचे डी आर एम तसेच जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची देखील उपस्थिती होती दरम्यान मंत्री गिरीश महाजन रक्षा खडसे यांनी योगा करत नागरिकांनाही सुदृढ आरोग्यासाठी योगा करण्याच्या आवाहन केले तसेच योगामुळे मानसिक संतुलन चांगले होते त्यामुळे सर्वांनी योगा करावा असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंना दिला आहे.

विदर्भात 23 जूनला वाजणार शाळेची पहिली घंटा

यावर्षीचा शाळा प्रवेशोत्सव खास असणार आहे...

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार स्वागत..

अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीच्या दाभा येथील शाळेला देणार भेट...

तर विभागीय आयुक्त श्वेता सिंगल ह्या माहुली जहागीर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर जिल्हा परिषद उर्दू शाळा वलगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत...

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, गणवेश, गोड पदार्थ देऊन यावर्षीचा शाळा प्रवेशोत्सव अधिक ऐतिहासिक केला जाणार आहे...

अमरावती जिल्हा परिषदेच्या 1572 शाळेत एकाच वेळी हा शाळा प्रवेशोत्सव होणार आहे...

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्यातील चुलांगण धबधबा खळखळून वाहू लागलाय

हिरवाईने नटलेला निसर्ग,डोंगरकड्यांवरून खळबळ वाहणारे धबधबे आणि वातावरणातील गारवा असं निसर्गाचे वैभवशाली रुप पर्यटकांना खुनावतय आता सह्याद्रीच्या कुशीतला निसर्ग सौंदर्य बहरलाय या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हि या परिसरात गर्दी करू लागलेत

महिलांनीच पकडली अवैध देशी दारू.दारू विक्रेत्यास चोप देऊन पोलिसांच्या दिले ताब्यात

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील येवली गावातल्या महिलांनी आज भल्या पहाटे सापळा रचून अवैध देशी दारू पकडली.

दारूच्या वाहनाला आडवत दारूचे तीन बॉक्स आणि आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मागील तीन ते चार वर्षापासून येवली गावात अवैद्यरीत्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत होती.

त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

लहान मुले देखील या दारूच्या आहारी गेले होते.या त्रासाला कंटाळून महिला व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार करूनही गावातील दारू विक्री बंद झाली नव्हती.

अखेर संतप्त झालेल्या महिलांनी पुढाकार घेत आज दारू विक्रेत्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.यापुढे दारू विक्रेत्यावर आळा न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ महिलांनी दिला आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांच्या फेरतपासणीचे आदेश

पुणे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी शासकीय बदली, कर सवलत आणि विविध शासकीय लाभ मिळवण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याची चर्चा रंगल्याने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांच्या फेरतपासणीचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार पुणे ससून रुग्णालयात दिव्यांग शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांवर लाभ घेतलेल्या लबाड शिक्षकांचे दाभे दणणालेत.या प्रकारामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाइन बुकिंगला आजपासून सुरुवात

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आणि कुलचर कुलधर्म करण्यासाठी महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणातून भाविक येतात. भाविकांना देवीची सिंहासन पूजा करण्यासाठी जुलै महिन्याची ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू होत आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ही बुकिंग करता येणार आहे.सिंहासन पूजा नोंदणी 21 जून रोजी सकाळी दहा वाजता पासून सुरू करण्यात येत असून ती 26 जून 2025 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत करता येईल. तर जुलै महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकिंग झाल्याची यादी 30 जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयाने सार्वजनिक ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रात्यक्षिके, शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार व प्राणायाम करून योग साजरा केला.२१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून २१ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो.२१ जून हा दिवस नैसर्गिक आणि पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

- नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढलेलीच

- गंगापूर धरणातून ११०० क्यूस एक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम

- रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पाण्याने वेढलेलाच

- गोदा घाटावरील लहान मोठ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम

आई वडील मुलांकडून पोटगी घेऊन स्वतंत्रपणे दुसरीकडे राहू शकतात

आई-वडिलांना मुलांकडून पोटगी मागायची असल्यास मुलांसोबत राहिलेच पाहिजे हे कायद्याने बंधनकारक नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे..

उल्हासनगरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून या दिनानिमित्त उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांनी भव्य स्वरूपात योगा प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ,यावेळी चव्हाण यांनी योगा करून सहभाग दर्शवला, येथील भगवती नावानी मैदानात योगा दिन साजरा करण्यात आला,यावेळी उल्हासनगर मधील योगा प्रेमी नागरिक तसेच नगरसेवक उपस्थित होते,सकाळी सात वाजता या योगा प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले असताना हजारो नागरिकांनी आपला सहभाग दर्शवून आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला.

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीम जिल्हा प्रशासनाद्वारे उत्साहात साजरा

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीम जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाशीम येथील वाटाणे लॉन येथे आयोजित भव्य सामूहिक योग सत्रात शेकडो नागरिकांनी सकाळी ७ ते ८ दरम्यान सहभाग नोंदवून योगाभ्यास केला. या योग सत्राचे विशेष आकर्षण ठरले सोयता येथील विद्यार्थ्यांचे सादरीकरण. त्यांनी मधुर संगीतात विविध योग क्रिया सादर करत संगीत आणि योग यांचा सुंदर समन्वय उपस्थितांसमोर ठेवला. त्यांच्या तालबद्ध हालचालींनी उपस्थितांची मने जिंकली.

‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची जागतिक थीम असून, या भावनेला अनुसरून कार्यक्रमात नागरिक, विविध योग समित्या, नामवंत योग प्रशिक्षक, आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी सहभागी होत योग दिनाच्या माध्यमातून आरोग्याचा संकल्प केला.

गटविकास अधिकाऱ्याला 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलंय.. या प्रकरणातील तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत.. त्यांना सेवेत असताना गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून निलंबित करण्यात आले होते.. या कारवाईनंतर ते सेवानिवृत्त झाले होते.. दोषारोपपत्राचा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठविण्याकरिता गटविकास अधिकारी मुंडे यांनी दहा हजारांची मागणी केली होती.. लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचत गटविकास अधिकारी मुंडे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले..

1500, जवानांची केला योग अभ्यास

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज लातूरच्या केंद्रीय रिझर्व पोलीस बलाच्या प्रशिक्षण केंद्रात योग अभ्यासाचे धडे देण्यात आले आहे... यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक , आणि राजपत्रित अधिकारी, तसेच पंधराशे च्या जवळ प्रशिक्षणार्थी जवान सहभागी होते... तर योग अभ्यासा नंतर अनेकांनी रक्त दान देखील केले आहे.

आज जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. आपल्या स्वास्थ्यासाठी नियमित रूपाने योगासन करण्याचा खूप मोठा उपयोग आपल्या जीवनात होतो. आपले स्वास्थ चांगलं राहावं यासाठी योग विज्ञान आपल्यासाठी खूप उपयोगी आहे, मला याचा आनंद आहे की प्रधानमंत्री मोदींनी आजचा दिवस जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी अनुरोध केला होता. आज संपूर्ण विश्वात योगाचा प्रसार झालेला आहे आणि लोक योगासन करत आहेत ही आमच्यासाठी मोठी उपलब्ध आणि अभिमानाचा विषय आहे, सर्वांनी नियमित योगाभ्यास करावा.
नितीन गडकरी

- नाशिककरांसाठी आनंदाची बातमी

- मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण ६५ टक्के भरलं

- १५ वर्षात पहिल्यांदाच गंगापूर धरणात जून महिन्यात ६५ टक्के पाणीसाठा

- मागील वर्षाच्या तुलनेत गंगापूर धरण समूहात पाणीसाठ्यात ४ पटीनं वाढ

- नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

- धरणात नव्याने पाण्याची आवक सुरूच असल्यानं धरणातून ११०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच

- आज देखील नाशिकमध्ये पावसाचा अंदाज

ताम्हिणीत हंगामातील उच्चांकी पाऊस,   24 तासात अति मुसळधार पाऊस

24 तासात अति मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

जिल्ह्यातील घाट परिसरात झालेल्या अति मुसळधार पावसाने दरडी पडणे रस्ता खचणे यासह पुलावरून पाणी वाहू लागल्याने मार्ग बंद झाले

डोंगर माथ्यावरून फेसाळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले असून गेल्या 24 तासात ताम्हिणी आणि शिरगाव घाट परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे

पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या ताम्हिणी घाट परिसरात यंदाचा हंगामातील सर्वाधिक 370 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर शिरगाव येथे 360 मिलिमीटर पाऊस झाला.

तर आज घाट माथ्याला पुणे वेधशाळेने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे

नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनीच रचला कट ; सत्यवान लाटे महाराजांचा गंभीर आरोप

तपोभूमी येथील वारकरी संप्रदायाच्या संस्थानावरती झालेली मारहाण आम्ही केलीच नाही असे मत सत्यवान महाराज लाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. विशेष म्हणजे मनोहर वाऱेला मारहाण कुणी केली हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. मनोहर वारेला दोन दिवसांपूर्वी पाच ते सहा लोकांकडून खोलीत डांबून झाली होती मारहाण यानंतर सत्यवान महाराज लाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत.

मनोहर वारे हा त्या ठिकाणी आल्यानंतर सतत संभाजी महाराज यांचे नाव घेत होता तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही नारायण गड माझ्या पाठीशी आहे.

धाराशिव मधील टेक्निकल टेक्सटाईल पार्कला गती, वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागावाटप प्रक्रिया सुरू

धाराशिव मध्ये दहा हजार रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला आता आणखी गती मिळाली आहे. कौडगाव एमआयडीसीत तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून जागा वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.कौडगाव एमआयडीसीत साकारल्या जाणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी ३०८ एकर क्षेत्र आरक्षित आहे. आरक्षित असलेल्या या क्षेत्रावरील जागा ९५ वर्षांच्या नोंदणीकृत लीज करारावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.कौडगाव एमआयडीसीत तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मितीसाठी अभिरुची दाखवण्याची १७ सप्टेंबर अंतिम तारीख असणार आहे. इच्छुक उद्योजकांनी त्यासाठी "उद्योजक साक्षी" कार्यालय, मरोल,मुंबई येथे रीतसर प्रस्ताव सादर करावे असे आवाहन एमआयडीसी कडून करण्यात आल्याची माहिती मिञचे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. तिघांवर गुन्हा दाखल.

लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे.... यातील पीडित मुलीला बार्शी येथील एका लॉजवर आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. तर या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणी तीन आरोपींवर लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.. तर मुख्य आरोपी अमोल शिरसागर याला पोलिसांनी बार्शी येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल आहे.. तर इतर दोघांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

जालन्यातील औद्योगिक वसाहत परिसरात चंदनझिरा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

जालन्यात जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केलीय. या कारवाईत 7 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून चंदनझिरा पोलिसांनी छापा कारवाई करून जुगार खेळणाऱ्या 9 जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत 1 कार, 4 दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण

नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला.माहूर, हदगाव, कंधार, देगलूर, बिलोली, उमरी व नायगाव या सात पंचायत समित्यांना हे वाहन देण्यात आले आहेत. या वाहनांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामी

काल रात्री पालख्यांचे पुण्यात झाले आगमन

पुणे महापालिका आणि पुणे पोलीस प्रशासनाकडून पालखी आणि जय्यत तयारी.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पालखी विठोबा मंदिर भवानी पेठेत मुक्कामी असणार तर संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी निवडूंगा विठोबा मंदिर नाना पेठेत मुक्कामी असणार

काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पालखी विठोबा मंदिरात भवानी पेठ येथे घेतले दर्शन..

नाशिक शहरात आज पाणीबाणी

- आज दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद, तर उद्या रविवारी सकाळीही कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

- महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरूस्तीसह नवीन वॉल्व्ह, फ्लो मीटर बसवण्याच्या कामासाठी आज शट डाऊन

- स्मार्ट सिटी कंपनीकडून केली जाणार जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरूस्ती आणि विकास कामं

- आज दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानं नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन

मावळातील वडिवळे धरण शंभर टक्के भरले, सांडव्यावरून 246 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

मावळ मधील वडिवडे धरण 100 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रा मध्ये 246 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण परिसरात पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी

जास्त करण्यात येईल. दरम्यान नदीपात्रात कोणीही नागरिकांनी उतरू नये, किंवा नदीपात्रात जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. नदीकडच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप,भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार,चैतन्य लोंढे,पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आषाढीवारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी विठ्ठल नामाच्या गजारात आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते.

योगदिनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात

जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ होणार आहे.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकर योगासने करणार आहेत.

हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडे सात वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे कार्यक्रम होणार आहे. याचवेळी शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

खडकवासला धरण साखळीत एका दिवसात दीड टीएमसी पाणीसाठा वाढला

खडकवासला धरण साखळीत 9.67 टीएमसी पाणीसाठा

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 9.67 टीएमसी म्हणजे 33..19 टक्के पाणीसाठा जमा..

गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.58 टीएमसी म्हणजे 12.27 टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता.

म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध..

चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.सध्या पाणी साठा चांगला वाढला आहे.

खडकवासला 1.27 टीएमसी

पानशेत 2.99 टीएमसी

वरसगाव 4.83 टीएमसी

टेमघर 0.59 टीएमसी

मध्य रेल्वेवर रविवार मेगा ब्लॉक

माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान, अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा,  पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

'विकसित महाराष्ट्र २०४७' साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात पाच आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध पाच आर.जे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

जागतिक स्तरावर साजरा होतोय योग दिवस

यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०२५ रोजी साजरा होत आहे. हा ११ वा योग दिन असून, यावर्षीची थीम आहे "स्वतःसाठी योग, समाजासाठी योग". योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य लाभते. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने २०१५ पासून हा दिन जागतिक स्तरावर साजरा होतो. यंदा विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि सरकारी कार्यालयांमध्ये योग शिबिरे, कार्यशाळा आणि ऑनलाइन सत्रांचे आयोजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाच्या प्रसारासाठी विशेष आवाहन केले आहे. योग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, तो सर्वांना निरोगी जीवन जगण्यास प्रेरित करतो.योगाच्या फायद्यांबद्दल अधिकप्राणायामाविषयी माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT