Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ०९ सप्टेंबर २०२५, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, एनडीए की इंडिया आघाडी कोण बाजी मारणार? महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

हिंगोलीत एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हिंगोली शहरासह तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती ओढवली आहे तर ईसापुर रमणा परिसरात गावाच्या जवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने शेकडो गावकरी गावाच्या वेशीवरच अडकले आहेत दरम्यान तासभरापासून या गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे तर शहरातून गावाकडे जाणारे नागरिक देखील पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले आहेत तर काही नागरिकांनी धोकादायक स्थितीत या पाण्यातून प्रवास देखील केला आहे प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले मात्र नागरिकांकडून नियमांची पायमपल्ली होत असल्याने धोकादायक स्थितीत प्रवास करणाऱ्या या नागरिकांना नेमकी समज घालणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

हिंगोलीत ओढ्याला पूर येऊन गावकऱ्यांचा संपर्क तुटला

हिंगोलीत मुसळधार पावसाने ओढ्याला पूर येऊन गावकऱ्यांचा संपर्क तुटला

हिंगोलीच्या इसापूर गावातील गावकऱ्यांचा संपर्क तुटला

शहरातील नागरिक गावच्या वेशीवर अडकले

टिटवाळातील काळूनदीत २ बहिणींचा बुडून मृत्यू

टिटवाळा मध्ये काळूनदीत दोन बहिणी बुडल्याची दुदैवी घटना... कल्याण -टिटवाळातील मांडा पश्चिमेतील वासुद्री रोड परिसरातील गणेश नगर परिसरातील राहणाऱ्या दोन बहिणी मंगळवारी दुपारी कपडे धुवण्यासाठी काळूनदी शिवमंदिर येथील नदी काठी गेल्या असता.नदीत पाणी वाढले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघी बहिणी पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध

आमदार महेंद्र दळवी यांच्या तटकरे विरोधी वक्तव्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध सुरु झाले आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट सायली दळवी यांनी शिवसेना आ. महेंद्र दळवी यांनी प्रत्योतर दिले आहे. सुनील तटकरे यांना राजकीय दृष्ट्या संपवणारा अजून तरी रायगड जिल्ह्यात जन्माला आलेला नाही, अशा भाषेत सडेतोड उत्तर देत, स्वतः महेंद्र दळवी एकेकाळी सुनील तटकरे यांच्या विचारधारेवर काम करत होते याची आठवण सायली दळवी यांनी करून दिली.

जमीन संपादन केल्याशिवाय पंढरपूर-महाड रस्ता रुंदीकरण नको

राष्ट्रीय महामार्ग डी.डी. आर. ९६५ म्हणजेच पंढरपूर-महाड रस्ता मार्गाच्या विस्तारीकरणामुळे भोर तालुक्यातील सुमारे ५०० शेतकऱ्यांची १०० हेक्टर जमीन बाधित होत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य भूसंपादन प्रक्रिया, मोबदला, व पुनर्वसनाची तरतूद न करता थेट शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता बांधकामाचे काम सुरु केल्याने त्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत न्याय मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासून तीव्र धरणे आंदोलन केले.

राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत महत्वाची बैठक

मंत्री अतुल सावे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे

परिणय फुके , बबन तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत

सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवण्यात आली आहे

गोकुळ दूध उत्पादक संघाची सभा प्रचंड गदारोळात संपन्न

सत्ताधाऱ्याकडून ही सभा सुरळीत आणि समाधानकारक संपन्न झाल्याचा दावा करण्यात आलाय, तर तर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेमध्ये आपल्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संताप व्यक्त केलाय. गोकुळची सभा सुरू होताना सभा मंडप तुडुंब भरला होता... मात्र सभा अर्धी होताच सभासदांनी देखील सभा मंडपातून काढता पाय घेतला.

डोंबिवलीत महिला चोराचा धुमाकूळ! 

​भरदिवसा घरात घुसून कामगाराच्या बॅगेतून २० हजार लंपास

​गडबडीत दरवाजाला लॉक लावायला विसरले आणि चोरी झाली

​चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद.

​पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी महिलेचा शोध सुरू

पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

आयुष कोमकर हत्या प्रकरण

पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांची पत्रकार परिषद

कोमकर याचा खून प्रकरणातील ६ आरोपींना अटक

अमरावतीमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या 22 दिवसापासून समायोचन करण्याच्या मागणीसाठी संपावर..

1500 कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम..

आज कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर रिंगण सोहळा करीत अनोखे आंदोलन केले..

यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली..

सरकारने तात्काळ समायोचंन कराव अन्यथा संप सुरूच राहणार असल्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

* अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन...

* 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिंतन शिबिराचे आयोजन..

* उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सह पक्षातील मंत्री, आमदार, खासदार, सह महाराष्टातील प्रमुख पदाधिकारी लावणार उपस्थिती....

* आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या चिंतन शिबिराला विशेष महत्व..

मतचोरी करून भाजप सत्तेत; माजी मंत्री महादेव जानकर यांचा आरोप

केंद्रात आणि राज्यात मतचोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी यवतमाळ येथे केला.लोकशाही वाचवायची असेल तर यापुढे निवडणूक इव्हीएम मशीनवर नव्हे तर बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जानकर यांनी केली. अक्कलकोट येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला त्याच्या गावात शून्य मते मिळाली. याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्व समाजाला आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 28सप्टेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री जानकर यांनी दिली.

Chhagan Bhujbal: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

सरकार अशा धमक्यांना घाबरायला लागले, तर काम कसं करणार.. कुणीही येऊन काहीही धमक्या देतील. आता चार पाच दिवस पाहिले. बीडमधील जाळपोळ पाहिली.. ही भीती सरकारला तुम्ही घालणार का? ही भीती तर कुणालाही घालता येईल.

कायदा हातात घेऊन आंदोलन चालवायचे, अशी भीती घातली जाईल. पण हे कायद्याने चालणारे सरकार आहे. किती महत्त्व द्यायचे हे सरकारने ठरवावे, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचं - भुजबळ

मराठा आरक्षणाच्या जीआरवर आम्ही सरकारसोबत बोलत आहोत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचं आहे. राज्य सरकारने जीआर काढल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आरक्षणाचा हा जीआर दबावाखाली काढण्यात आला.

Chhagan Bhujbal: जीआरमधील मराठा समाज या शब्दावर आक्षेप - भुजबळ

जीआरमधील मराठा समाज या शब्दावर आमचा आक्षेप आहे. जीआरमध्ये ओबीसी किंवा कुणबी असं म्हणायला हवं होतं, असे भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख आहे.

मराठा आरक्षणाचा जीआर मागे घ्या, अथवा बदल करा, छगन भुजबळांची मागणी

मराठा आरक्षणाचा जीआर मागे घ्या किंवा त्यामध्ये बदल करा. या जीआरमुळे ओबीसीला धक्का लागणार नाही, असा बदल करा. ओबीसीमधील ३५० हून अधिक जास्त जातींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाचा जीआर दबावाखाली काढलाय - भुजबळ

२ सप्टेंबर रोजी जारी केलेला मराठा आरक्षणाचा जीआर घाईघाईने आणि दबावाखाली काढण्यात आला आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली नाही. ओबीसीची समितीसोबतही चर्चा झाली नाही. जीआरबाबत सजेशन, तक्रारी मागवण्यात आला नाही.

मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत छगन भूजबळांची भूमिका स्पष्ट म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना...

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना ८ पाणी पत्रं लिहिले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या जीआर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहेत. जीआरसंदर्भात कायदेशीर मुद्दे या पत्रात आहेत, असे भुजबळ म्हणाले. कुबणी प्रमाणपत्र आणि मराठा आंदोलनासंदर्भात या पत्रात उल्लेख असल्याचे समोर आलेय.

Gokul: गोकुळ दूध संघाची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह इतर संचालक व्यासपीठावर दाखल

समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार सतेज पाटील सभेसाठी दाखल

Gokul: गोकुळ दूध संघाची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी 1 वाजता सुरू होणार

सभेसाठी गोकुळणे केली जय्यत तयारी

सभामंडपात मोठा पोलीस बंदोबस्त, तर सभेवर राहणार CCTV ची नजर

शेवटच्या सभासदाच्या प्रश्नांचे निरसन होई पर्यंत सभा चालवण्याचा निर्धार

नवीद मुश्रीफ हे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सभेला जाणार सामोरे

सभा शांततेत पार पडण्यासाठी गोकुळ दूध संघाचे प्रयत्न

Maharashtra Politics: अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं - विजय पांढरे

अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला, असे वक्तव्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केले. पांढरे हे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांच्याविरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. काल ८ संप्टेंबर रोजी त्यांनी शोषल मीडियावर आपली व्हिडीओ बाईट प्रसारित केली. यामध्ये त्यांनी हे आरोप केलेत.

Pandharpur: पंढरपुरात पेन्शनसाठी ज्येष्ठ नागरिकांची सन्मान वारी

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहा सात हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी. या मागणीसाठी आज पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांनी पंढरपुरात आंदोलन केले. अर्थक्रांती जीवनगौरव अभियान या नावाने ज्येष्ठ नागरिकांची सन्मान वारी निघाली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन लागू करण्यासाठी सरकारला देण्यात येणारी पहिल्या टप्प्यातील 11 हजार पत्र संत नामदेव पायरीशी ठेवून पेन्शनचा लढा सुरू करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक , प्रदक्षणा रोड या मार्गे ज्येष्ठ नागरिकांची सन्मान यात्रा नामदेव पायरी येथे पोहोचली. या यात्रेसाठी सांगली ,सातारा ,पुणे ,जुन्नर ,सोलापूर आदी परिसरातून मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक पंढरपुरात दाखल झाले होते.

Nashik: नाशिकमध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

- जिल्हा रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

- सेवेत कायम करण्याच्या मागणीसह लॉयल्टी बोनस, ग्रॅज्युएटी आणि अन्य मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

- मागील काही दिवसांपासून याच मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलाय संप

- मात्र मागण्या मान्य होत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी आज काढला मोर्चा

- शासनाने तातडीनं मागण्या मान्य करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

धुळ्यात स्कुटी आणि एसटी बसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून, या अपघातात बारा वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, परिवहन महामंडळाच्या बसने साक्रीहून पिंपळनेर जात असताना कान नदीच्या पुलावर पिंपळनेर कडून साक्री कडे जाणाऱ्या दोन दुचाक्यांना धडक दिली,

Jogeshwari: जोगेश्वरी-वांद्रे द्रुतगती मार्गावर दुचाकीस्वारांची हुल्लडबाजी

मुंबईत जोगेश्वरी ते वांद्रे दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर पहाटे ६:१५ वाजताचे दरम्यान तब्बल 60 ते 70 दुचाकीस्वारांची उलटबाजी पाहायला मिळाली. या बाईकस्वारांनी ट्रिपल सीट, विनाहेल्मेट प्रवास करताना सायलेंसरचे प्रचंड आवाज काढत अत्यंत वेगाने दुचाकी चालवल्या. दुचाकी स्वरांच्या हुल्लडबाजीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून या प्रकरणी वाहतूक पोलीस या सर्व दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत.या बेकायदेशीर रेसिंगमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Ganeshotsav: गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर व ध्वनी प्रदूषणा संबंधात पोलिसांनी केली कारवाई

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात, लेझर बीम लाईट चा वापर करून पोलिसांनी काढलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एकूण 40 मंडळांवर भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Vo : त्यात वाकड पोलिस स्टेशन हद्दीत 17 , पिंपरी पोलिस स्टेशन हद्दीत

08, निगडी पोलिस स्टेशन हद्दीत 05, सांगवी पोलिस स्टेशन हद्दीत

05, दापोडी पोलिस स्टेशन हद्दीत 03, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीत

02 या कारवाई करण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणा संबंधात या कालावधीत मोठ्या प्रमाणात नॉइस लेवल मीटर या उपकरणाद्वारे आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी ध्वनीच्या पातळीची मोजणी करण्यात आली आहे. त्याबाबत संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे कडून प्राथमिक चौकशी करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

Maratha OBC Aarakshan: मराठा आणि ओबीसी पदाधिकाऱ्यांची माहिती केली जाणार संकलित

- समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती केली जाणार संकलित

- मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांची खबरदारी

- ओबीसी संघटना पदाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि इतर माहिती गोळा केली जाणार

- ओबीसी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक घेणार बैठक

- बैठकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनाची माहिती संकलित केली जाणार

Ulhasnagar: उल्हासनगरात नशेखोर तरुणांचा धुमाकूळ, दहा गाड्यांची तोडफोड

उल्हासनगरातील गीता कॉलनी परिसरात पहाटेच्या सुमारास नशेखोर तरुणांनी मोठा हैदोस घालत दहा गाड्यांची तोडफोड केली. यात बाहेरगावाहून आलेला एक ट्रक, रिक्षा तसेच कार यांचा समावेश असून, गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ वाहनांची तोडफोड न करता या तरुणांनी ट्रक चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येत असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Pune: पुण्यात NHM कर्मचाऱ्यांचा संप; २१ दिवस बेमुदत काम बंद

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचम) राज्यात सुमारे ३० हजारांहून अधिक तर पुण्यातील १४०० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. समायोजन व वेतनवाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसह अन्य १८ मागण्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एकत्रीकरण समितीने १९ ऑगस्टपासून संप पुकारला आहे. पुण्यातही औंध जिल्हा रुग्णालयात या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत राज्य सरकारने आपल्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी केली

राज्यभरातील सुमारे २५ ते ३० हजार कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात १९ ऑगस्टपासून सहभागी. पुण्यातील १५००. तांत्रिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सहभाग.

भर पावसात आमदार बाबासाहेब देशमुख यांचा जनता दरबार

सांगोल्याचे शेकापचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी भरपावसात लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

मुहूद येथे काल सायंकाळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जनता दरबारा घेतला होता. या दरम्यान अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. भर पावसात आमदार बाबासाहेब देशमुख यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

आमदार बाबासाहेब देशमुख यांचा पावसातील व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला‌ आहे.

 उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. यासाठी आज मतदान करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात आधी मतदान केले.

Buldhana: बुलढाणा जिल्हा परिषद परिसरातच घाणीचे मोठे साम्राज्य, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष...

बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय परिसरातच मोठे घाणीचे साम्राज्य पसरले आहे, जिल्हाभरातून आलेल्या अभ्यंगतांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.. तर दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.. बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील गावांमध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय, मात्र याच जिल्हा परिषद कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने हे प्रशासन जिल्ह्याचा काय विकास करतील.. असा सवालही या निमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घाणीचे साम्राज्य आणि अस्वच्छता असल्याचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती, मात्र त्यांच्याच कार्यालय परिसरात अशा पद्धतीचे घाणीचे साम्राज्य असल्याने खरात साहेब याकडेही लक्ष देतील का असाही सवाल उपस्थित केल्या जात आहे...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाच्या पिक विमा योजनेला थेट उच्च न्यायालयात आव्हान

राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे असं असताना राज्य शासनाने पिक विमा योजनेमध्ये केलेले बदल शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यात मोठ्या अडचणी ठरत आहेत याच अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाच्या पिक विमा योजनेला थेट उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी पिक विमा योजनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये आव्हान दिले आहे येत्या 25 सप्टेंबर रोजी यासंदर्भामध्ये सुनावणी होणार असून तत्पूर्वी यासंदर्भामध्ये राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे

Kolhapur: मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी थेट कोल्हापुर- मुंबई सायकलवारी...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत अमरण उपोषण सुरू केलं होतं. या वेळी राज्यभरातून मराठा समाज मुंबईत आरक्षणाच्या लढाईसाठी धडकला. मराठ्यांनी मुंबईत आझाद मैदानात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जी गाडी मिळेल त्याने जाण्यासाठी प्रयत्न केले. हजारोंच्या संख्येने मुंबईत मराठे जात असताना कोल्हापुरच्या एका पठ्ठ्याने आपल्या कृतीने अनेकांची मने जिंकली. कारण कोल्हापुरच्या एका गावातील हा पठ्ठ्या थेट मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भर पावसात सायकलवरून मुंबईकडे रवाना झाला होता. तो व्हिडिओ ही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा हाच पट्ट्या कोल्हापुरात परतला त्यावेळी गुलालाची उधळण करत त्याच स्वागत हे करण्यात आलं.

Nashik: कळवण आदिवासी प्रकल्पातील चणकापूर आश्रमशाळेतील तिसरीतील विद्यार्थ्याचा उपचाराविना मृत्यू

नाशिक

- कळवण आदिवासी प्रकल्पातील चणकापूर आश्रमशाळेतील तिसरीतील विद्यार्थ्याचा उपचाराविना मृत्यू

- प्रकृती बिघडली तरी आठ दिवस वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप

- संतप्त पालकांनी मुलाचा मृतदेह आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांच्या टेबलवर ठेवून कारवाईची केली मागणी

- रोहित बागुलचा मृतदेह सकाळपासून मुख्याध्यापकांच्या टेबलावर तासनतास पडून राहिला

- आश्रमशाळेतील जबाबदार अधिकारी गायब, अधीक्षक रजेवर तर मुख्याध्यापक मुख्यालयी अनुपस्थित राहिल्याने पालकांचा संताप

- शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर मृतदेह पडून राहिल्याने परिसरात शोककळा

- अखेर आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत निष्काळजीपणा उघड

- मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई

Kamsheth Ghat Accident: कामशेत बोगद्याजवळ कोळशाचा ट्रक पलटी

मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत बोगद्याजवळ कोळशाचा ट्रक पलटी झाला यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झालेले आहे. पाठीमागून आलेल्या पिकप ने जोरदार कोळशाच्या ट्रकला धडक दिल्याने कशाचा ट्रक पलटी झाला. काही वेळ ट्राफिक जाम झाली होती मात्र. आर आय बी पोलीस यांनी ट्रॅफिक बाजूला करण्यात यश आलेले आहे.

दणदणाटाबद्दल जिल्ह्यात ४५४ मंडळांना नोटिस

गणेशोत्सवात 'साऊंड सिस्टीम'चा दणदणाट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ४५४ मंडळांना पोलिसांनी नोटिस पाठविल्या आहेत. या मंडळांनी 60 दिवसांत त्याचे उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर पोलिस उपअधीक्षकांकडून पुराव्यासह खटले दाखल होणार आहेत. आवाजाच्या मयदिचे उल्लंघन होऊ नये, ट्रॅक्टरच्या बोनेटवर उभाराहून नाचू नये, अशा सूचना पोलिसांनी मंडळाच्या कार्यत्यर्त्यांना केल्या होत्या. यासाठी पोलिसांनी सिस्टीमचालक आणि मालक यांच्यासोबतही बैठक घेतली होती. मंडळाच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या, तरीही पोलिसांच्या आवाहनाला धाब्यावर बसवून पोलिसांसमोर मंडळाच्या कार्यकत्यांनी घडकी भरविणारा आवाज सिस्टीमवर सोडला. पोलिसांनी या संदर्भातील नोंदी घेतल्या आहेत. अशा सर्व मंडळांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचे काम सुरू केले असून, आजपर्यंत ४५४ मंडळांना नोटिस पाठविल्या आहेत. पोलिसांनी मिरवणुकीत आवाजाचे डेसिबल मोजले आणि चित्रीकरणही केले आहे. या सर्वांचा उपयोग करून थेट उपअधीक्षकांकडून संबंधित मंडळांविरोधात खटले दाखल केले जाणार आहेत. नोटिसा मिळाल्यापासून 60 दिवसांत मंडळांना खुलासा सादर करावा लागणार आहे. आजपर्यंत खटले दाखल करताना केवळ मुंबई पोलिस अॅक्टनुसार केले जात होते; मात्र आता ध्वनिप्रक्षण कायद्यानुसारही खटले दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही मंडळाच्या कार्यकत्यांनी मोठे स्ट्रक्चर उभे केले. मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा वापर केला. त्यावेळी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकत्यांना कोणताही विरोध केला नाही. आता थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संपावर गेल्या मुळे रूग्णालयात तंत्र डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी दोन वर्षीय प्रियल सुरेश धिंडा या मुलीचा मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुलभाग असलेल्या जव्हार तालुक्यात आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेले सर्व कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर गेले आहेत. यामुळे जव्हार तालुक्याच्या मुख्य आरोग्य केंद्र असलेल्या पतंगशाह कुटीर रुग्णालय येथील वैद्यकीय व्यवस्था अक्षरशः सलाईनवर चालू आहे.

कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, मराठा म्हणून ओबीसी मधूनच आरक्षण देण्याची मागणी

राजकीय पक्षासह आमच्या मराठा जातीतील काहीजण मराठा समाजाला कन्फ्युज मध्ये ठेवण्याचं काम परत आहेत,नाव न घेता मनोज जरांगे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांची टीका

कुणबी प्रमाणपञ कधीही रद्द होवु शकत,त्यामुळे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण न देता थेट मराठा म्हणून आरक्षण द्याव मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

छत्रपती संभाजीनगर : किरकोळ वादातून घरात घुसून माय-लेकींना मारहाण

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील अयोध्यानगरात किरकोळ कारणावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडी लावण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. रोहन आदिक नावाच्या आरोपीने मित्रांना बोलावून थेट महिलेच्या घरात घुसून मारहाण केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. आईला मारहाण होत असल्याचे बघून मुलीने आरोपींना भिडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी तिलाही धक्काबुक्की केली. यात यात महिला जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडे धाव घेत त्या महिलेने तक्रार दिली मात्र 'पोलीस आमच्या ओळखीचे आहेत काही होणार नाही'अशी धमकी आरोपीने दिली. आणि पोलिसांनी देखील या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेत आरोपीला मोकाट सोडल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मावळच्या पवनानगर परिसरामध्ये गावोगावी रंगला महिलांचा लेकी मागण्याचा पारंपारिक खेळ.....

मावळ्याच्या पवन मावळातील बहुतांश गावांमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दोन दिवसांनी लेकी मागणे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये गावातील लहान मुलींपासुन ते वृध्द महिलेपर्यंत सर्व महिला यामध्ये आनंदाने सहभागी सहभागी होत असतात. तसेच गौरी गणपती साठी माहेरी आलेल्या माहेरवाशीन महिलाही यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असल्याने भात लागवड झाल्यानंतर शेततील कामे कमी झालेली असतात. त्यामुळे गावातील प्रत्येक घरातील महिला यामध्ये सहभागी होतात. सर्व महिला गावातील मुख्य मंदिर किंवा पारावर एकत्र येतात यामध्ये फुगड्या,फेर,पारंपारिक गाणी,उखाणे,

भारूड, तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे सोंग घेऊन कार्यक्रमाचा मनमुराद आनंद महिला लुटतात. गावातील राजकिय व्यक्तीपासुन ते सर्व थरातील व्यक्तीच्या बोलण्या चालण्याच्या नकला सादर करत असतात त्यामध्ये उखाणेस्पर्धा,संगीत खुर्ची,तसेच नवीन रिलचे ट्रेंड अशा स्पर्धा होतात. यामध्ये महिला गावातील प्रत्येकाच्या घरी नियोजन करुन रात्रभर पारंपारिक गाणी,फुगडी,नकला असे कार्यक्रम सादर केला जातो त्यावेळी महिलांना चहा,नाष्टाची व्यवस्था आयोजकांच्या घरी करण्यात येते. लेकी मागण्याच्या या दोन दिवसांमध्ये रात्रभर गाण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीही सकाळी पुन्हा गाणी व इतर कार्यक्रम असतात दुपारी एकच्या सुमारास विवाह सोहळा सुरू होतो त्यामध्ये एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजविले जाते त्या मुलाकडील मंडळी मुलीच्या घरी मुलगी मागण्यासाठी जातात नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम संपन्न होतो...

पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावला

महामेट्रोची गणेशोत्सव काळात प्रवाशांची आणि आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद

गणेशोत्सवात सर्वाधिक ३७ लाख १६ हजार ५१२ प्रवाशांनी मेट्रोने केलं प्रवास

गणेशोत्सव काळात महामेट्रोला मिळाले ५.६७ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवात महामेट्रोचे उत्पन्न २ कोटी ६१ लाख रुपयांनी वाढले

अनंत चतुर्दशीच्या एकाच दिवशी ५.९० लाख प्रवाशांनी मेट्रोतून केला प्रवास

गणेशोत्सवानिमित्त मेट्रोने यंदा रात्री उशिरापर्यंत मेट्रोसेवा सुरू ठेवली होती. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसासाठी सलग ४१ तास मेट्रो सुरू होती

भुवनेश्वर-पुणे विमानाला धावपट्टीवर उतरता अडचण

रविवारी भुवनेश्वरहून पुण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 'आयएक्स २७१७' विमानाला पुणे विमानतळावर धावपट्टीवर उतरता अडचण आली.

त्यामुळे विमानाला अर्धा तास घिरट्या घालाव्या लागल्या. प्रवाशांनी घाबरले होते, कारण उतरता का येत नाही याची माहिती मिळाली नाही

नियोजित वेळेनुसार साडेतीन वाजता पोहोचलेले विमान सुरुवातीला धावपट्टीवर उतरता शकले नाही

अर्ध्या तासानंतर, चार वाजून पाच मिनिटांनी विमान सुरक्षितपणे उतरले

विमानतळ प्रशासन आणि एअर इंडिया एक्स्प्रेसकडून अद्याप कारण स्पष्ट केले गेले नाही. प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला

आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीच्या ६ जणांना अटक करण्यात आलं

पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीच्या ६ जणांना अटक करण्यात आलंय

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा कारवाई करत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना काल रात्री उशीरा अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांमध्ये अंधेकरांच्या कुटुंबातील चार लोक आहेत आणि दोन बाहेरचे

सध्या या आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे

या सर्वांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार

नेत्र तपासणीला जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाची झडप

नागपूर - नेत्र तपासणीला जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाची झडप,

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने धडक दिल्याने पन्नास वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि सतेचाळीस पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू झाला...

घटना सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलकामठी शिवारात घडली ..

अरुंद रस्ता आणि वळणावर चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला ...

अपघातानंतर चारचाकी वाहन देखील उलटले...

रेल्वे स्टेशन परिसरातील बेवारस बॅगेमध्ये बॉम्ब नव्हे,आढळले कपडे अन् चार्जर

सोलापूर रेल्वे स्टेशनसमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या परिसरात एक बॅग रात्री बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली.या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.तपासणी दरम्यान कपडे आणि मोबाइल चार्जर आढळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

जवळपास दोन तास होऊनही त्या बॅगेला कोणीही घेऊन न गेल्याने तेथील एका दुकानदाराने याची माहिती पोलिसांना दिली.लगेच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केली त्यात फक्त कपडे आढळल्याने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच दंगा नियंत्रण पत्रकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित.

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणका, सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित...

- जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचे 12 लाख 61 हजार 271 रुपयांचा महसूल बुडालाचा प्राथमिक ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.

- लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत 28 ऑगस्ट रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयाची अचानक पाहणी केली होती.

- यावेळी कार्यालयात केवळ एक कंत्राटी व्यक्ती हजर असल्याचे पाहून महसूलमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती..

- यानंतर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांना यासंदर्भात तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले होते..

- ज्यानंतर चौकशी समिती स्थापन करून जाधव यांच्या कार्यकाळातील जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या दस्त व्यवहारांची तपासणी करण्यात आली...

- या तपासणीत सरकारच्या 12 लाख 61 हजार 271 इतका महसुलाचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.

आमदार विजयकुमार गावितांचा शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा...

दुरबार जिल्ह्यात आमच्या परिवाराशिवाय कुठल्याही पुढाऱ्याने एकही योजना आणली नाही, असा थेट आरोप भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केला आहे. तसेच, नागरिकांसाठी राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांना विरोधकांनी तक्रारी करून बंद पाडल्याचा घणाघातही त्यांनी केला. नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे 'जनतेशी संवाद' कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

माजी आदिवासी विकास मंत्री असलेले डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी नाव न घेता शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला. "जिल्ह्यात एकही पुढारी असा दाखवून द्या ज्यांनी लोकहिताच्या योजना स्वतःहून आणल्या आहेत," असे आव्हानच त्यांनी दिले.

डॉ. गावित पुढे म्हणाले, "आम्ही नागरिकांसाठी नेहमीच लोकहिताच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने विरोधकांनी त्यात अडथळे आणले. आमच्या योजनांना तक्रारी करून बंद पाडण्याचे काम त्यांनी केले. मात्र, तरीही आम्ही जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहोत." या आरोपांमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल...

-मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे. भारतीबाई पवार यांनी वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याचबरोबर मराठा समाजाबद्दल देखील अपशब्द वापरले आहेत. ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळ पोलीस ठाणे गाठून भारतीबाई पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांच्या तक्रारीनंतर भारतीबाई पवार यांच्यावर अखेर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

मुंब्रात इमारतीच्या सज्जाचा भाग पडल्याने एक महिला जखमी तर एका जेष्ठ महिलेचा मृत्यू

मुंब्रातील लकी कंपाऊंड येथील इमारत डी विंग ग्राउंड प्लस तीन माळ्याची बिल्डिंग आहे...

इमारतीला एक टेरेस रूम देखील असल्याने बिल्डिंग ही 25 वर्षे जुनी आहे...

बिल्डिंगच्या टेरेस वरील रूम नंबर 404 चा बाहेरील सध्याचा भाग हा कोसळल्याने दोन महिला जखमी झाल्या होत्या...*

दोन्ही महिला या इमारतीच्या बाजूने जात असताना त्यांच्यावर सज्जाचा भाग पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या...

यात एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून... दुसरी महिला जखमी आहे...

बिल्डिंगचा सध्याचा काही भाग हा धोकादायक स्थितीत आहे...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण अपूर्णच

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे तब्बल सव्वा लाख हेक्टर वरील कापूस,सोयाबीन तूर आदी पिकांचे नुकसान झाले.कृषी विभागाकडून बाधित पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कारवाई अजूनही संपलेली नाही,त्यामुळे अहवाल कधी सादर होणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केल्या जातोय.

आमदार महेंद्र दळवींनी सुनिल तटकरेंना पुन्हा डिवचलं

पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला वाद काही थांबताना दिसत नाही. काल पालक मंत्री पदाच्या स्पर्धेत असलेले मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे एकाच व्यासपिठावर दिसले. त्यानंतर काही वेळाने झालेल्या रोहा येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात गोगावले व्यासपिठावर असताना आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना पुन्हा डिवचल आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य भाई पाशिलकर यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करीत भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तटकरे जन्माला आले नसते, असे अनेक आहेत ज्यांना या महाभागाने त्यांना संपवले. तोच विडा आम्ही उचललाय, सगळ्या गोष्टींनी तागदवर आहोत, आम्ही काही कमी नाहीत असा विश्वास आमदार दळवी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

Gokul Milk : कोल्हापूरचा गोकुळ दूध ब्रँड आता आईस्क्रीमसह बाजारात, मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT