कर्जत तालुक्यातील घरावर झाड पडून वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मोरेवाडी या आदिवासी वाडीतील ही घटना आहे. यामध्ये घर आणि सामानाचे अंशतः नुकासन झाले आहे. मंजुळा नावजी केवारी असे जखमी वृध्देचे नाव आहे. या घरातील व्यक्ती दुसऱ्या खोलीत असल्याने इतर कोणीही जखमी झाले नाही.
पालघर जिल्ह्यात हवामान खात्याकडून उद्या रेड अलर्ट असल्याने आणि सध्याही ठिकठिकाणी पावसाचा जोर असल्याने पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुरानी जाखड यांनी तसा आदेश काढला आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा यात्रेच्या निमित्ताने हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मगाव यवतमाळच्या गहुली येथील समाधीस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांनी आदरांजली वाहिली. कडू यांच्या यात्रेचा समारोप १४ जुलै रोजी होणार आहेत. त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आत्मचिंतन करण्यासाठी १४ जुलै रोजी राज्याला हरितक्रांती देणारे वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी शेतकरी प्रतिनिधी,कार्यकर्ते एकत्र येऊन आत्मचिंतन करणार आहे.
आषाढी एकादशी निमित्त आमदार आदित्य ठाकरे हे वरळी येथे विविध विठ्ठल मंदिरात दर्शनांसाठी पोहोचले आहेत. ससमिरा महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या पुरातन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. घाटंजी तालुक्यात दुपारपासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना जोरदार पूर आला आहे. या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये एक मृतक अज्ञात आहे. तर दुसऱ्या घटनेत शिरोली येथील वृद्ध मजुराचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 39 हजार 172 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे. निफाड तालुक्यातील गोदावरी काठावर असलेल्या चांदोरी सायखेडा शिंगवे आणि करंजगाव या गावांना पुराचा फटका बसू नये, यासाठी 15 हजार 775 क्यूसेक सुरू असलेल्या पाण्याच्या निसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत 39 हजार 172 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
विठू माऊली तू माऊली जगाचा माऊलीत मूर्ति विठ्ठलाची विठू नामाच्या जयघोषामध्ये तीर्थक्षेत्र धाकटी दुमदुमली. जुन्या रूढी आणि परंपरा आजही कायम टिकून आहेत. वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडावरती वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनाचा त्याच बरोबर वारीचा आस्वाद घेतला. प्रति पंढरपूर म्हणून तीर्थक्षेत्र नारायण गडावरती वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये वारकऱ्यांनी अभंग गवळणी म्हणून दाखवल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आहे.
बीड शहरातील उमीकरण या खासगी क्लासेसमधील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक छळ प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांना अटक देखील करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान दुसऱ्या पालकाने लैंगिक छळाची तक्रार दिल्यानंतर आता शिवाजी नगर पोलिसांत आणखीन एक गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आरोपी पवार आणि खाटोकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पालकाच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदनुसार गुन्हा दाखल झालाय. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.
- दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी
- नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर रामकुंड आणि गोदाघाटाच्या पाणी पातळी वाढली
- गंगापूर धरणातून ५,१८६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- ४,६५६ असलेला विसर्ग ५०३ ने वाढवून ५,१८६ करण्यात आला
- नाशिक मध्ये देखील कालपासून पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरीची पाणी पातळी वाढली
वाशिम जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यानं विविध मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
पंढरपूरहुन विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुका घेऊनपंढरीची वारी थेट लंडनच्या दारी पोहोचली आहे. लंडन इथं राहाणारे अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने पंढरपूर ते लंडन ही वारी निघाली आहे. भारतातील लंडन येथे राहणाऱ्या जनसमुदायाने 14 एप्रिल रोजी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडनवारी सुरू केली. ही वारी 70 दिवसांचा प्रवास करत आशिया आणि युरोप या दोन खंड ओलांडून 22 देशांतून प्रवास करत 22जून 2025 लंडनमध्ये पांडुरंगाच्या पादुका घेऊन पोहोचली आहे. लंडनच्या टॉवर ब्रिज जवळ येथील भारतीयांनी या वारीचे परंपरेने जोरदार स्वागत झाले.यावेळी हरिनामाचा जयघोष करण्यात आला. लंडनमध्ये टॉवर ब्रिज जवळ ढोल पथक व भगवी पताका घेऊन असलेले वारकरी यावेळी पाहायला मिळाले.
150 वर्षाची परंपरा असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आज पांडुरंगाच्या रथोत्सवाच्या आयोजन यावेळी करण्यात आले होते .या रथउत्सवामध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये जय जय राम कृष्ण हरीचा जयघोष करत जय हरी विठ्ठलाचा जय घोष करत हा रथउत्सव पिंप्राळा येथून काढण्यात आला जवळपास 150 वर्षाची रथ उत्सवाची परंपरा असून यामध्ये ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक वेशभूषा परिधान करत भक्तगणांनी आपला सहभाग नोंदवला होता. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भावीक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीही लेझीमच्या तालावर यावेळी ठेका धरला
विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक भक्त आतुरला असून प्रतिस पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थ क्षेत्र नारायण गडावरती आज विठुरायाच्या दर्शनासाठी आणि त्याचबरोबर संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मध्यरात्री साडेबारा वाजता प्रत्यक्षात दर्शनाला सुरुवात झाली असून लाखो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी माहिती दिली आहे
पांडुरंगाला हात जोडून विनंती आहे की, आमच्या फडणवीस साहेबांच्या डोक्यात एक चांगला विचार येऊंदे,शेतकऱ्याबाबत ते नेहमी शहरीकरण शहरीकरण करतोय जपानच्या तंत्रावर ते शहर विकास करते आणि आमचा पादण रस्ता देशाच्या तंत्रज्ञानावर विकास होत नाही तो तसाच पडून आहे म्हणून त्यांच्या डोक्यात पांडुरंग तुझा त्यांच्या पूर्ण तो पांडुरंगाचा अवतारच फडणीस साहेब वाटले पाहिजे आणि त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर केली पाहिजे असं पांडुरंगाला पार्थना करतो आणि पांडुरंग त्यांच्यात आल्यानंतर आमच्या फडणवीस साहेबांना ते नाही म्हटलंही पाहिजे म्हणून त्यांनी कर्जमाफी निर्माण पांडुरंगाच्या कानात तरी सांगितले पाहिजे पांडुरंगा मी या शेतकऱ्याची कर्जमाफी या तारखेला करतो पांडुरंग आम्हाला सांगन
० रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद
० पत्रिकेत केवळ तटकरे कुटुंबीयांचीच नावे
० भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांची नाराजी
आषाढी एकादशी निमित्त नांदेड शहरातील सराफा भागात भक्ती संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. भाजपचे महानगर चिटणीस अजय डहाळे यांच्या वतीने सराफा भागातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महेरबाबू श्रीरामवार आणि त्यांच्या टीमने भक्ती गीत सादर करून उपस्थीताना मंत्रमुग्ध केले. यावेळी विठल रुख्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या भक्तीगीत कार्यक्रमाला आमदार आनंद बोढारकर, भाजप महानगर प्रमुख अमर राजूरकर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे महानगर चिटणीस अजय डहाळे यांच्या वतीने आषाढी एकदशी निमित्त मागील पाच वर्षा पासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातं आहे.
पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत पुणे जिल्ह्यात घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरील माहिती IMD मौसम वेबसाईट वरून घेतलेली आहे.
पंढरपूर शहरातील प्रमुख स्टेशन रस्त्यावर असणारी बुरुड समाज ट्रस्टची जुनी इमारत आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोसळली आहे. यामध्ये रस्त्यावरील दोन भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.
आषाढी एकादशी निमित्ताने नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास उगले व कल्पना उगले यांना पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाला..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उगले दाम्पत्यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली..शेतकरी कुटुंब असलेले कैलास उगले हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून ही वारकरी नियमित पंढरपूरला वारीला जातात..पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाल्याने कैलास उगले यांच्या कुटुंबीयांसह जातेगाव येथील ग्रामस्थ देखील सुखावले आहे..
मराठी माणसाच्या हितासाठी काल दोन्ही ठाकरे बंधू मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी जवळपास 20 वर्षानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर ठाकरेंच्या शिव सैनिकात आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकात मोठ उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे.. सततच्या पावसामुळे निसर्गाने कात टाकली असून निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे.. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत.. पर्यटकांची पावले भंडारदरा परिसराकडे वळत असून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटताय.. सततच्या पावसाने भात खाचरे देखील ओसंडून वाहत आहेत.. भंडारदरा परिसरात हिरवाईने नटलेल्या निसर्गाचे मनमोहक रूप बघायला मिळतय...
सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले...
उधना बस डेपोपासून स्वामीनारायण मंदिरापर्यंत पाणी भरले...
महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाहीये...
ड्रेनेज लाईनमधून रासायनिक पाणी बाहेर आल्याने संपूर्ण रस्त्यावर लाल रंगाचे पाणी दिसून आले....
गिरण्यांकडून बेकायदेशीरपणे ड्रेनेज लाईनमध्ये रासायनिक पाणी सोडले जाते....
पावसामुळे ड्रेनेज लाईनमधून पाणी न गेल्याने संपूर्ण रस्त्यावर रासायनिक पाणी दिसले....
स्थानिक नगरसेवकांसह ड्रेनेज समितीच्या अध्यक्षांनी या प्रकरणी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत...
- नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत वाढ
- रविवार असल्याने आज पर्यटकांकडून धबधबा परिसरात केली जात आहे गर्दी
- अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात
- स्थानिक पोलिसांचं गृह रक्षक दलाचे जवानही तैनात
धरणाची रचना अशी आहे कि त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण झालेत
धरण आणि तिथंला धबधबा असा दुहेरी संगम
पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं
त्यानंतर टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो
यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोरनीनकोचे धरण भरलं
पावसाळा सुरू झाल्याने सह्याद्रीच्या पर्वतरांगा झाल्या हिरव्यागार
हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी आज रविवार असल्याने पर्यटकांनी केली चिखलदरा येथे गर्दी....
पंढरपूर प्रमाणे साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळतोय.. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त साई समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असून साईमंदिराच्या दर्शनरांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.. साई समाधीवर विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली असून साईबाबांना विठ्ठल स्वरूप मानून भाविक साईचरणी लीन होत आहेत..
सध्या हृदय विकाराच्या धक्क्याने तरुनांचा मृत्यू होण्याच्या घटना मध्ये वाढ झाली असून, क्रिकेट, कब्बड्डी खेळताना मैदानात, व्यायाम करताना जिम मध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अशीच एक धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड शहरात घडली असून घरी व्यायाम करताना एका 15 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
प्रवीण धायगुडे असे या मुलाचे नावं असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता नेहमी प्रमाणे तो घरी व्यायाम करीत असताना अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाला
म्हणुन त्याच्या आईने धाव घेतली असता त्यांना प्रवीण अत्यावस्थ अवस्थेत दिसून आला त्याला तातडीने खाजगी दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केला असता प्रवीणची प्राणज्योत मावळली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे
रात्रभर पावसाची संततदार सुरू असल्यामुळे शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात मातीचे घर धसल्याने झाली दुर्घटना
या दुर्घटनेत आजोबा आणि नातू देखील छताखाली दबल्याने गंभीर जखमी, जखमींना शासकीय रुग्णालयात उच्चारासाठी केले दाखल
जवळपास रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली दुर्घटना
रात्री मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी घेतली धाव, बचाव कार्य करत आजीचा मृतदेह ढीणाऱ्या खालून काढत वृद्ध इसम व चिमुकल्याला ढीगाऱ्याखालून काढत केले बचाव कार्य
सुपाबाई तात्या चव्हाण वय 63 असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे
आषाढी एकादशीनिमित्त संत शिरोमणी नामदेवांच्या जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी मध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे सकाळपासून हजारोंच संख्येने भाविक दर्शनासाठी रांगेत उभे
टाकल्याचे पाहायला मिळाले आहे, ज्या भाविकांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेता आलं नाही असे भाविक दरवर्षी संत नामदेवांच्या चरणी लीन होतात
त्यामुळे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नरसी नामदेव मध्ये देखील भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे, संत नामदेवांच्या नरसी मध्ये दर्शनासाठी झालेली गर्दी लक्षात घेता प्रशासनाने देखील चोख व्यवस्था ठेवली आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्सव सुरु आहे. विठ्ठल भक्तांच माहेर असलेल्या पंढरपुर पासून ठिकठिकाणी विठ्ठल मंदीरात भक्तांनी गर्दी केली आहे. आज कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेने महाडमध्ये दिंडी काढली. पारंपारिक वेशभुषेसह विठ्ठल रखुमाई आणि संतांची वेशभूषा करीत विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल नामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद लुटला.
जालन्याचे आराध्य दैवत आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आनंदी स्वामी महाराजांचा पालखी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. जुना जालना भागातील आनंदी स्वामी मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात येत आहे.जालना शहरातील बाजार चौकी येथे मुस्लिम समाजाकडून देखील पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान पालखी सोहळ्यामध्ये फुगडी ,पारंपारिक नृत्य, ढोलपथक आणि चिमुकले वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
बिर्ला स्कूल आणि बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक हरिनामात तल्लीन होत दिंडीचे आयोजन
ताल, मृदुंग, ढोलकीसह विठ्ठलनामाचा गजर करत विद्यार्थ्यांचा सहभाग
दिंडीला सेंचुरी रियान परिवाराचा पुढाकार; बिर्ला कॉलेज ते शहाड बिर्ला मंदिर मार्ग
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ
आमदार विश्वनाथ भोईर, कुमार ऐलानी आणि शेकडो कार्यकर्ते ठिकाणी उपस्थित
कणकवली तालुक्यातील कासार्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आपल्या प्रशालेच्या प्रांगणात पालखीतील रिंगण सोहळा हुबेहूब सादर केला. यावेळी विद्यार्थ्यानी विठ्ठल नामाचा एकच गजर केला. या रिंगण सोहळ्यात प्रशालेतील १०० पेक्षा जास्त मुले मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यानी विठ्ठल -रखुमाई बरोबरच विविध संतांची वेशभूषा करून रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. या रिंगण सोहळ्यात पालखीतील विविध वारकरी खेळांचे प्रदर्शनही या विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये शिक्षकांचाही उत्साहपुर्ण सहभाग होता. या रिंगण सोहळ्यात विद्यालयातील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आषाढी वारीतील 'पालखी सोहळा' याची देही याची डोळा अनुभवला.
विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठलाच्या जयघोषात परिसरातील रुख्मिनी च महेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी बघायला मिळाली, विदर्भातील जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते लोक प्रति पंढरपूर असलेल्या कोंडण्यापुरामध्ये रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात,आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. तसेच कौंडण्यपुरातही भाविक दर्शनासाठी येतात. कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचे माहेर आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर साठी रुक्मिणी मातेच्या माहेराहून गेलेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे. जे भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाही. ते आषाढी एकादशीच्या दिवशी कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येतात
त्या अनुषंगाने सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठेच पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 52 मिमी पाऊस झाला असून सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना-भाजप यांची बैठक झाली या बैठकीला अजित पवार गटाला कोणतेही निमंत्रण देण्यात आलं नव्हतं तसेच अजित पवार गटांनी महायुती म्हणून लोकसभा विधानसभेला नवी मुंबई शहरामध्ये मदत केली मात्र आता आम्हाला विचारला जात नाहीये आमची काम केली जात नाहीयेत आमदार खासदार मंत्री यांना संपर्क केला ते फोन उचलत नाहीयेत त्यामुळे आम्ही नवी मुंबईतून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत अजित पवार गट आहे
महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते अजित पवार गटाची नवी मुंबई शहरांमध्ये बैठक पार पडली बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
वसई विरार शहरात आज सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत मात्र पाण्यात खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळें अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
शहरात मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका हा सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने कामावर जाणाऱ्या नागरिकांना देखील बसला आहे. यामुळे त्यांना देखील काहीतास घरामध्येच अडकून पडावे लागले होते.
आषाढी एकादशीचा पवित्र दिवस... आणि त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिर्ला मंदिर आज पहाटेपासूनच भक्तांच्या जय जय राम कृष्ण हरी च्या घोषणांनी दुमदुमले.
या दिवशी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब महापूजेत सहभागी होत श्री विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत भक्तीची नाळ अधिक दृढ केली.
पहाटे पाच वाजता अभिषेक आणि त्यानंतर सहा वाजता आरती पार पडली. विठ्ठलनामाच्या गजरात भक्तगण मंत्रमुग्ध झाले होते.
या दिवशी सेंच्युरी रेऑन कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारीही या भक्तिमय वातावरणात सामील झाले होते. मंदिर परिसरात श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा अपूर्व संगम पाहायला मिळाला.संपूर्ण मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिपाठाच्या स्वरात, बिर्ला मंदिरात आषाढी एकादशीचं पावन पर्व भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात साजरं झालं.
गेले काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीत लावली दमदार हजेरी
पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्याचे हाल
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
गेली 17 वर्षे हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ आयोजीत करत आहे वारी
प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विठुरायाची मूर्ती स्थापित करून दिवसभर हरिनाम संकीर्तन
यंदाच्या या वारीत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थिती
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मेळावा घेतल्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ठाण्यामध्ये आता ठाकरें बंधु एकत्र येण्याचे बॅनर झळकू लागले आहेत. मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आणि उपशाखा अध्यक्ष अक्षय आंबेरकर यांनी एकत्र येऊन धन्यवाद देवा भाऊ....तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ... अशा आशयाचे बॅनर सर्वत्र लावले आहेत. या बॅनर वर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहे.
मुठा खोऱ्यातील वातुंडे (ता.मुळशी) येथील शेतकरी महादेव राघू शिंदे व नामदेव राघू शिंदे यांच्या शेतात नाचणीच्या पिकामधून ज्ञानेश्वरांची मूर्ती साकारली आहे.
महादेव शिंदे यांचे पूत्र बाळकृष्ण शिंदे व सून लक्ष्मी शिंदे यांनी चाळीस गुंठे माळरानात ही मूर्ती तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या बावीस दिवसांपूर्वी शेतात २०० फूट लाब व १५० फूट रुंद आकारात ही रचना साकारली आहे.
बावीस किलो नाचणी पेरून त्यापासून उगवलेल्या हिरव्या पिकांमुळे मूर्तीचा आराखडा तयार झाला आहे. गळ्यातील हारासाठी मेथीच्या बियांचा वापर केला आहे.
तपकिरी रंग हा शेतातील मूळ माती असून ज्ञानेश्वरीच्या आकारासाठी झेंडूची फुले वापरली आहेत. हारात ठराविक ठिकाणी दिसणाऱ्या गुलाबी रंगासाठी चाळीस किलो गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलद्वारे औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
सीईटी सेलने याचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
वेळापत्रकानुसार 4 जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी 5 जुलै ते 14 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
उत्तर भारतातील कुख्यात रायफल व काडतूस तस्कराच्या यवतमाळ एलसीबीने उत्तराखंड मधील देहरादून इथून मुसक्या आवळल्या.कामरान अहमद राहणार देहरादून,उत्तराखंड असे अटक केलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. दरम्यान आरोपीला देहरादून येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट वर यवतमाळ येथे आणण्यात आले न्यायालयाने आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिनय सम्राट अभिनेते अशोक सराफ आणि सुलेखनकार व अक्षरांचा किमयागार अच्युत पालव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारने गौरविल्याबददल
कला सेवकांचा नागरी सन्मान सोहळा आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले यांच्याकडून आयोजन करण्यात येत आहे
रायगड जिल्हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र तरुणाई आणि अतिउत्साही पर्यटकांकडून होणाऱ्या अतिरेकामुळे रायगडमध्ये पावसाळी पर्यटनावर निबंध लावण्यात आले आहेत. याला पर्याय म्हणून वॉटर पार्क समोर येत आहेत. महाड रायगड रोड आणि माणगावमध्ये येथील स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात छोटे छोटे वॉटर पार्क तयार केले आहेत. यामध्ये स्विमिंग पुल, स्लाईड, कारंजे आणि आगदी कृत्रिम धबधबे देखील तयार करण्यात आले आहेत. नैसर्गिक धबधब्यांवर जात येत नसल्याने पर्यटक आणि स्थानिक देखील या छोट्या वॉटर पार्कमध्ये पावसाळी पर्यटनाची मौजमजा करताना दिसत आहेत.
आषाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे आज सकाळपासूनच आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत आषाढी एकादशी निमित्त राज्यातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश गुजरात मधून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहे मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचे कार्यक्रम शेगावात पार पडत आहे
आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. भंडारा येथील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी तुळशीच्या पानावर रांगोळीतून विठुरायाची प्रतिकृती साकारली. आजपर्यंत त्यांनी अनेक चित्र रांगोळीतून रेखाटले आहेत. मात्र, इवल्याच्या तुळशीच्या पानावर रांगोळीच्या विविध रांगांतून त्यांनी आता विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकारताना त्यांना पथक परिश्रम घ्यावं लागलं
शंकर ढमाले या शेतकऱ्यांच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.गावाच्या शेजारीच वारंवार बिबट्या फिरकतोय, त्यामुळे नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर कडूस ग्रामस्थांनी तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये श्री विठुरायाच्या चरणी दाखल झाली असली तरी, जे वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊ शकले नाहीत, ते आळंदीत माऊलींच्या समाधीस्थळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.या पार्श्वभूमीवर समाधी मंदिरात विविध रंगांच्या फुलमाळांनी आकर्षक अशी पुष्पसजावट करण्यात आली आहे. ही सजावट भक्तांच्या श्रद्धेचा गहिवर अधिकच वाढवणारी ठरत असून, आळंदी परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालाय. माऊलींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागलेली आहे.
वाशिम आणि मंगरूळपीर तालुक्यात गेल्या अनेक महिन्या पासून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या..गुन्हे शाखेने या चोरट्यानां जेरबंद करण्यात यश मिळालं असून,वाशिमच्या लाखाळा भागात राहणाऱ्या तरुण योगेश गिरी, आणि पिंपळगांव इथं राहणारा तरुण विष्णुदास झाटे, यांच्या कडून चोरीच्या 7 दुचाक्या ताब्यात घेण्यात आल्या असून,मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झालीय.
बीडच्या गेवराई तालुक्यातील बगेवाडी येथे तुम्ही गायरान जमीन वहीती करायची नाही असे म्हणत चार जणांनी तिघांना मारहाण केली.
यामध्ये एका महिलेच्या हाताला जबर मार लागला असून इतर तिघांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली.
यातील जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
रायगडच्या माणगावमधील महिला स्वयंसहायता बचत गटांना बँक कर्जाद्वारे
80 लक्षाचा धनादेशाचे वाटप राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
यावेळी माणगाव तालुक्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनव्या आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्दिष्टाने या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सरकारने वाढवलेला वॅट,15 टक्के केलेली फी वाढ आणि दारूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे विदर्भ बार असोसिएशन आक्रमक...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून बैठक घेऊनही तोडगा न निघाल्याने बार मालक आक्रमक...
विदर्भातील बारमालकांची अमरावतीमध्ये पार पडली बैठक...
14 जुलै रोजी विदर्भातील सगळे इंग्रजी दारूचे (बार )दुकाने बंद ठेवल्यानंतर त्यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा इशारा
आता बार व्यावसायिक उतरणार आंदोलनासाठी रस्त्यावर.
सरकारला 3 हजार करोड रुपयांचा महसूल आणी हजारो लोकांना रोजगार देणारे विदेशी दारूचे दुकानदार अडचणीत असल्याने बार मालक चालकांचा निर्णय
आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली. अन पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांच्या महापूर आलेला दिसून येतो आहे. प्रत्येक भाविक हा मुखी विठ्ठल विठ्ठल नाव घेत चंद्रभागेच्या तीरावरवरून एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होत असताना याच चंद्रभागेच्या काठावरील पंढरपूरचे भक्तिमय वातावरण निर्माण झाला आहे.
आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक येतील कैलास उगले यांना महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. आज पंढरीत 18 ते 20 लाख भाविक दाखल झाले आहेत. पदस्पर्श दर्शनाची 22 किलो मीटर पर्यंत गेली आहे. दर्शनासाठी 12 तासांहून अधिकचा वेळ लागत आहे.
रिलायन्सला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी वाटद पंचक्रोशीत होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी प्रांताधिकारी जीवन देईसाई यांच्यासमोर सुनावण्या सुरु झाल्या आहेत.
घरे व धार्मिक स्थळे, आंबा बागायती वगळणे, मोबदला, नोकर्या याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. एमआयडीसीनेही प्रदूषण विरहीत प्रकल्प येणार असलस्याचे लेखी स्पष्टीकरण प्रांताधिकार्यांना दिले आहे.
वाटदसाठी जवळपास 904 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. त्यातील एक हजार एकर जागा ही रिलायन्स कंपनीच्या हत्यारे बनवणार्या कारखान्यासाठी दिली जाणार आहे.
तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या सेमी कंडक्टर बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प होणार आहे या दोन प्रकल्पांमुळे जवळपास ३० ते ४० हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे
सजावटीमुळे मंदिर अगदी खुलून दिसत आहे पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांच्याकडून ही सजावट करण्यात आली आहे
सजावटीसाठी दहा टन विविध देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर पंधरा टन उसाचा वापर केला आहे
देवाचा गाभारा सोळखांबी चौकांबी आणि विठ्ठल सभागृहा ही फुलांची सजावट करण्यात आली आहे
नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास उगले या शेतकरी दाम्पत्याला आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे.
कैलास उगले हे शेतकरी कुटुंबातील आहेत ते गेल्या बारा वर्षांपासून आषाढीची पायी वारी करतात. मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचे भाग्य मिळाली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापौर लोटला आहे चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.
आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले या भाविकाला महापूजा करण्याचा मान मिळाला.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या 12 वर्षांपासून पंढरीची नियमित वारी करत आहेत.
आज पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे मानाचा वारकरी म्हणून कैलास व कल्पना उगले यांना ही महापूजा करण्याचा मान मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.