आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन रेकी केली असा दावा विजयसिंह बांगर यांनी केलाय.
मुंबईच्या बोरीवली पश्चिम येथील झाशीची राणी तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय अल्ताफ मोहम्मद शेख याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा तलाव बीएमसीच्या देखरेखीखाली असूनही, तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती.
अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील राशीन येथे करमाळा रोडवरील चौकाला नाव देण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आहे. 2014 साली राशीन ग्रामपंचायत ने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन करमाळा रोड येथे असलेल्या चौकाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक असे नामकरण करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या गटाकडून छत्रपती संभाजी चौक नामांतर करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली.
7-Eleven स्टोअरमध्ये आईस्क्रीम खाताय ? ते उंदराने चाखलेलं असू शकतं !
सीवूड्सच्या Nexus मॉलमधील आउटलेटमध्ये उंदीरांचा धुमाकूळ
नागरिकांचे आरोग्य धोक्यात, सध्या असा प्रश्न उपस्थित होत आहे
हा व्हिडिओ शोशल मीडियावर प्रचंड viral होत आहे
बीडच्या शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये आज दुपारी मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर एका रूग्णाला भेटण्यासाठी जात होते त्या लिफ्टचा अचानक बिघाड होऊन ती खाली येऊन आदळली. यामध्ये जरांगे पाटलांचे एक सहकारी किरकोळ जखमी झाले असून इतर कोणालाही इजा पोहोचली नाही.
दरम्यान अपघातानंतर रुग्णालयाकडून परवाना असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून सदरील लीफ्टची परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात आपण लिफ्ट बंद करण्याच्या त्यांना सूचना दिल्या असून इन्स्पेक्शन देखील केले जाणार आहे अशी माहिती सहाय्यक विद्युत निरीक्षक गणेश सोळंके यांच्याकडून फोनवरून बोलताना देण्यात आली आहे.
बीडमधील लिफ्ट अपघातावर मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्याच्या प्रतिक्रिया
- लिफ्टच्या अपघाताचा दोन-तीन मिनिटाचा तो कालावधी असेल
- मात्र टेक्निकली त्या ठिकाणी कोणीही लिफ्टला पाहणारा नव्हता
- आम्हाला दरवाजा जोरात ओढून जरांगे पाटलांना बाहेर काढावे लागले
- जरांगे पाटील त्या ठिकाणी सहकार्याच्या वडिलांना भेटायला गेले होते
- आम्ही दहा-अकरा जण त्या लिफ्टमध्ये गेलो
- मात्र लिफ्टने कोणतही सिग्नल दिलं नाही
- अतिरिक्त वजन असल्यास त्यामुळे कळाले नाही
- मात्र लिफ्ट वरती गेली अन् पुन्हा जोरात खाली आदळली
- मात्र सुदैवाने एक दोन सहकारी वगळता कोणालाही काही झालं नाही
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबाबत बोलाल तर हाताखालून काढू असे म्हणत मारण्याची दिली धमकी...
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांची महारुद्र पाटील यांना धमकी....
हनुमंत कोकाटे यांनी एक वर्षांपूर्वी अशीच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिली होती धमकी....
इंदापूर मध्ये धमकी च्या राजकारणाला सुरुवात.
पण आम्ही 30 लाख लोकांची वेटिंग लिस्ट आमच्या कडे असताना पंतप्रधान यांनी त्याला मान्यता देऊन 20 लाख घरांच कामही सुरू झालं.
हे घरबांधणीसाठी केंद्र सरकारच्या निधीमध्ये 50 हजार रुपयांचा निधी हा राज्य सरकार देईल,व यामध्ये त्याला सोलर वर वीज दिल्या जाईल, त्यामुळे त्यांना विजेचे बिल येणार नाही..
100 युनिट पर्यन्त वीज वापरण्याला विजेचे दर 26 टक्क्यांनी कमी होणार.
5 लाख घरावर पहिल्या टप्प्यात राज्यात घरावर सोलर युनिट लागणार आहे त्यामुळे त्यांना मोफत वीज मिळेल
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान दर्शनाला राज्यातील पुढार्यांनी संध्याकाळी चार नंतर येऊ नये, विसर्जन मिरवणुकीच्या बाबतचा वाद लवकरच संपेल असे अनेक मुद्द्यांवर आज पुण्यात चर्चा झाली. निमित्त होतं "सकाळ" माध्यम समुहाने आयोजित केलेल्या पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीचं. या बैठकीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्ष सोबतच शहरातील जुन्या जाणकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. गणेशोत्सवाच्या दरम्यान गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी त्यासोबतच विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि व्हि आय पी दर्शन अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विसर्जन मिरवणुकीवरून सुरू असलेला स्थानिक वाद याबाबत सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली. नेमक्या गणेश मंडळांच्या समोर उभ्या ठाकलेल्या अडचणी कोणत्या आणि प्रशासनाकडून त्याची काय अपेक्षा आहे
साकोली येथील मालगुजारी तलाव दोन दिवसांपूर्वी फुटला. यामुळं अनेक एकरातील शेती खरडून निघाली. तर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. यासोबतचं तलावातील पाण्यासह लाखो रुपयांच्या मासोळ्याही वाहून गेल्यात. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता महसूल, कृषी आणि मत्स्य विभागाचं पथक तलाव फुटल्यानंतर बाधित भागात सर्वेक्षणासाठी प्रत्यक्ष ऑन फिल्ड उतरले आहेत.
शिरुरच्या ओयासीस कॉलनीतील फुले तोडत असलेल्या ६५ वर्षीय छाया सातारकर यांना अज्ञात दोन चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले आणि मोबाईलवर पत्ता सांगण्यात गुंतवत त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले.ही घटना आज दुपारी घडली असून आरोपी युनिकॉर्न मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दिवसाढवळ्या झालेल्या या लुटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, शहरातील महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
धुळ्याच्या शिरपूरमध्ये साम टीव्हीचा दणका बघावयास मिळाला आहे, शिरपूर तालुक्यातील लौकी या गावात झोपडीमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेला वीज वितरण विभागाने चक्क 83 हजार 260 रुपयांचं बिल दिलं होतं, या संदर्भातील बातमी साम टीव्हीने दाखविल्यानंतर वीज वितरण विभागाला खडबडून जाग आली असून, वीज वितरण विभागाच्या वतीने तात्काळ या महिलेला 4 हजार 380 रुपयांचे सुधारित बिल देण्यात आले आहे,
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या एका वादग्रस्त व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री बोर्डीकर एका कार्यक्रमाला कमी गर्दी झाल्याने संतापलेल्याचं स्पष्ट दिसतं, इतकंच नव्हे तर "कानाखाली मारते" अशी भाषा त्यांनी वापरल्याचं देखील समोर आलं आहे, असे रोहित पवार म्हणाले.
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान दर्शनाला राज्यातील पुढार्यांनी संध्याकाळी चार नंतर येऊ नये, विसर्जन मिरवणुकीच्या बाबतचा वाद लवकरच संपेल असे अनेक मुद्द्यांवर आज पुण्यात चर्चा झाली. निमित्त होतं "सकाळ" माध्यम समुहाने आयोजित केलेल्या पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीचं. या बैठकीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्ष सोबतच शहरातील जुन्या जाणकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. गणेशोत्सवाच्या दरम्यान गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी त्यासोबतच विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि व्हि आय पी दर्शन अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विसर्जन मिरवणुकीवरून सुरू असलेला स्थानिक वाद याबाबत सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली. नेमक्या गणेश मंडळांच्या समोर उभ्या ठाकलेल्या अडचणी कोणत्या आणि प्रशासनाकडून त्याची काय अपेक्षा आहे.
- जळगाव महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणू,जिल्ह्यात सर्वाधिक नगरपालिकांवर सत्ता आणायची आहे
- तुम्हाला सगळं साहित्य दिले जाईल, तुम्ही कुठे कमी पडू नका
- राज्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक यश यावेळी उत्तर महाराष्ट्रात मिळणार आहे
- धुळे, अहिल्यानगर नाशिक या ठिकाणी देखील सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील
- जळगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना गिरीश महाजन यांनी दिले एक ला चलो चे संकेत
बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात शाळकरी मुलीचे तीन आरोपींनी चारचाकी गाडीतून अपहरण करत तिचा विनयभंग केला. तसेच प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली आणि घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी नेकनूर पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पार्श्वभूमीवर प्रहारची कर्जमाफीसाठी बॅनरबाजी..
मुख्यमंत्री साहेब कर्जमाफीची तारीख घोषित करा.. मोर्शीमध्ये लागले प्रहारचे बॅनर..
बॅनर लावणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री यांनी निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून असे दिले होते आश्वासन..
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करावे यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू कडून आंदोलन..
सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेले प्रशिक्षणार्थी उतरले रस्त्यावर.
स्टेशन चौक या ठिकाणी संतप्त प्रशिक्षणार्थ्यांकडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न.
आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरुणीला चक्कर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने
प्रशिक्षणार्थी झाले आक्रमक..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी सांगलीत तीन दिवसापासून सुरू आहे बेमुदत उपोषण.
सुकन्या गायकवाड असे प्रशिक्षणार्थी आंदोलकाचे नाव.
तीन दिवसांपासून तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे उपोषण
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन गेल्या दोन दिवसापासून प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण ला बसले आहेत.
मात्र प्रशासनाकडून कोणतेही दखल न घेतल्याने आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगलीच्या स्टेशन चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली
पुरोहित यांच्या उपस्थितीत शोभायात्रा
स्वतः पुरोहित हे या शोभायात्रेत सहभागी होणार
पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोल ताशा चे वादन
नंदुरबारमध्ये भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजप विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत गावित यांनी हे वक्तव्य केले आहे.
भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आरोप केला आहे की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना युतीबाबत सूचना देऊनही, नंदुरबारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने उघडपणे भाजपचा विरोध केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे महापालिका निवडणुका स्वबळा वर लढवण्याचे संकेत
कल्याण डोंबिवली ला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर येणे अत्यंत गरजेचे आहे
कल्याण डोंबिवली भाजपमय करायचे आहे त्यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागा
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची तारीख संपली; तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमिनी नावावर केलेल्या आहेत, 2019 पासून ज्या शेतकऱ्यांचे फेरफार झाले आहेत अशा शेतकऱ्यांना पिक विमा व महाडीबीटी सारखी योजना घेता येत नाही अशा शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइन दिसत नसल्याने विम्यापासून शेतकरी वंचित राहत आहे शासन स्तरावर या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे...!
प्रवाशांमध्ये घबराट ; एक तास स्थानाकावरील वीजपुरवठा बंद
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अचानक लागलेल्या आगीमुळे तिकीट वितरण केंद्र,एलईडी सूचना फलक,लाईट्स,पंखे,उदघोषणा प्रणाली कांही काळासाठी ठप्प ठेवण्यात आली.
अचानक अलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे कांही प्रवाशांना अडचणींचा करावा लागला सामना..
आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानाकावरील लोहमार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत 8 ते 10 अग्निरोधकांच्या माध्यमातून आग विझवली
या दुर्घटनेत कुठलीच जीवितहानी झालेली नसून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील कांही महत्वाची उपकरणे जळून खाक झाली आहे.
सांगलीच्या मौजे डिग्रज या ठिकाणी कृष्ण नदीच्या पात्रामध्ये मळीमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याचा प्रकार घडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
नदीकाठच्या कारखान्यांकडून कृष्णा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला आहे,
तर नदीपत्रात सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित पाण्यामुळे मौजे डिग्रज परिसरामध्ये नदीला दुर्गंधी पसरली असून त्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी देखील पडत असल्याचा आरोप फराटे यांनी केला आहे,
याबाबत प्रदूषण महामंडळाने दाखल घेऊन संबंधितांच्यावर कारवाई करावे,अशी मागणी करण्यात फराटे यांनी केली आहे.
नदी काठच्या कोणत्यातरी साखर कारखान्याने हे मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचा आरोप
मौजे डिग्रज भागातील नागरिकांनी प्रदूषण मंडळाकडे केली तक्रार
कृष्णा नदीत पाण्याला प्रचंड दुर्गंधी आणि मासे देखील मरु लागले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर मार्गवरील बसफेरी नियोजित वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लावत आहे,
त्यामुळे या मार्गावरील बस सेवा नियमित चालण्यात यावी या मागणीकरीता विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे एसटी आगारात धडकले होते.
यावेळी राजुरा ग्रा.पं. सदस्य तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अमरावती जिल्हा समन्वयक भुषण काळे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने आगार प्रमुखाला निवेदन दिले,
चांदूर रेल्वे आगार मधुन नियमित सुरु असणारी बस सेवा नियोजित वेळेवर सुटत नसल्याने, चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची खुप गैरसोय होत आहे.
- सोलापूर जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी 100 कोटींचा साखर घोटाळा केला असून त्यावर गुन्हे दाखल झालेत. याची ईडी मार्फत चौकशी करण्यासाठी तक्रार दिली आहे.
- मंगळवारी मी पुन्हा एक स्मरणपत्र ईडीला देणार आहे. त्यानंतर कारवाई झाली नाही तर मी हायकोर्टात दाद मागणार आहे.
- बार्शी, अक्कलकोट आणि सांगोला या तीन तालुक्यात हा साखर घोटाळा झाला आहे.
- साखर तारण ठेवून कर्ज घेतले मात्र साखरही गायब आणि कर्जही गायब अशी स्थिती आहे.
दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास साकोलीच्या जुना शहरातील ९० एकर परिसरात असलेला मालगुजारी तलाव फुटला. यामुळं ४०० हेक्टर परिसरातील शेती जलमय झाली. तर, अनेक एकरातील शेती अक्षरश: खरडून निघाली. ज्यांनी १५ दिवसांपूर्वी भात पिकाची लागवड केली होती, अशाही शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून भात पीक अक्षरश: वाहून गेलंय. ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून निघाली अशांना खरीप हंगामाच्या पिकाला मुकावं लागणार आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली स्पोर्टस् फौंडेशनकडून दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा- २०२५ आयोजित करण्यात आली होती.मिरज-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दंडोबा डोंगरावर ही राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली.
समृद्धी महामार्गावर वाशिममध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे.
भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकून ठार झाला आहे.
वाशिमच्या कारंजा जवळ असलेल्या पोहा गावाजवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडोर चॅनल क्रमांक 188 हा अपघात झाला आहे ..
ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह काढण्याच काम गेल्या तासभरा पासून सुरू आहे.
शनिवारी पनवेलमध्ये झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनधिकृत डान्स बारांवर तीव्र रोष व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केले होते.
"छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहतात?" असा ठाकरेंनी सवाल करत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला इशारा दिला होता.
या भाषणानंतर अवघ्या काही तासांत मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले.
शनिवारी मध्यरात्री १२ वाजता पनवेल तालुक्यातील कोन गावातील ‘नाईट रायडर’ या लेडीज सर्व्हिस बारवर मनसेने धडक कारवाई करत फोडाफोड केली.
मनसे कार्यकर्ते 15 सह योगेश चिले यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
- वर्धा पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीला केली अटक
- वर्धेच्या मस्जिद चौकात केली कारवाई
- आरोपीना अटकेचा थरार सिसिटीव्हीत कैद
- चार आरोपीना अटक तर एक आरोपी फरार
- आरोपीकडून दोन देशी कट्टा पोलिसांनी केला जप्त
- नागपूर जिल्ह्याच्या बोरी येथे देशी दारू दुकानदाराला देशी कट्टा दाखवत आरोपीनी केली होती लुटपाट
वर्षानुवर्षे वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय मिळाला, महसूल सप्ताहानिमित्त मावळ तालुक्यात घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
ठाकर वाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे भागातील पाच पिढ्यांपासून वन हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना ३/२ प्रकरणांतर्गत कायदेशीर हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा ऐतिहासिक निर्णय महसूल विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत, आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमधून शक्य झाला आहे.
वाशिमच्या साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळेला डोंबिवलीच्या सिस फाउंडेशन कडून सद्भावना प्रकल्पा अंतर्गत तीन लाखांचे संगणक संच भेट देण्यात आलेत. त्यामुळं या शाळेत शिक्षण घेणाऱ्या १०६७ मुलांना संगणकीय शिक्षण घेण्यासाठी फायदा होणार आहे. यापूर्वी या शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत राज्यात पहिला क्रमांक मिळववत ५१ लाखांचं पाहिलं बक्षीस मिळवलं होतं. या शाळेत वाशीम शहरासह आजू बाजूच्या परिसरातील विध्यार्थीही शिक्षण घेतात.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात एसआयटी गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांची एक एसआयटी गठीत केली आहे.
या एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि त्यांची टीम तपासासाठी मदत करणार आहे.
SIT लवकरच बीडमध्ये दाखल होणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
यवतमाळच्या वणीत भाजपला गळती,भाजपचे दोन माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश वणी विधानसभा मतदारसंघातील भाजप, काॅग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय.
त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात इनकमिंग जोरात सुरू आहे
त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
देशातील विविध विमानतळांवर ‘बर्ड हिट’ म्हणजेच पक्ष्यांच्या धक्का बसण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे
देशातील सर्वाधिक घटना दिल्ली विमानतळावर
२०२० ते २०२५ जून या कालावधीत दिल्लीत सर्वाधिक ६९५ घटना घडल्या आहेत
पुणे विमानतळावर १४५ वेळा विमानांना पक्ष्यांचे धक्के बसले असल्याची माहिती समोर
मुंबई (४०७), अहमदाबाद (३३७), बंगळुरू (३४३), हैदराबाद (२०७) या विमानतळांवरही अशा घटना मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत
शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीस राहणार उपस्थित.
मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे होणाऱ्या बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.
एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ,रवींद्र फाटक ही राहणार उपस्थित.
रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरवस्था यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वैतागले आहेत.
मुंबई गोवा महामार्गाला साडेसाती लागली असल्याचं त्यांनी म्हटलंय . दरवर्षी गणेशोत्सव आला की आम्ही सांगतो लवकरच करू पण तो काही पूर्ण होत नाही.
नितीन गडकरी यांनीही यासाठी प्रयत्न केले. पण कधी चुकीचा ठेकेदार तर कधी वेगवेगळ्या अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडले. तो लवकरच पूर्ण करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मंत्रीमंडळ स्थापन होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरीही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही केल्या सुटेना.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या अलिबाग दौऱ्यात या मुद्याला मिश्किल पणाने स्पर्श करताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे आम्ही तिघेजण मिळून यातून लवकरच मार्ग काढू अशी टिप्पणी केल्याने रायगड पालकमंत्रीपदाचे घोंगडे आणखी काही काळ भिजत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे
मात्र आपण जिल्हा नियोजन साठी निधी कमी पडू देणार नाही हे सांगायला ते विसरले नाही.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकिय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणारभूमिपूजन
या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सह इतरही मंत्री राहणार उपस्थित
तुळजाभवानी मंदीराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत 108 फुट शिल्प उभारले जाणार आहे.
या शिल्पाचे शिल फायबर मॉडेल मागविण्यात आलेले आहेत अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आलीय.
108 फुट उंचीचे भव्य ब्रॉंझ धातुचे शिल्प उभारण्यात येणार आहे.
तुळजाभवानी माता छञपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रसंगावर असणार आहे.
कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली अडीच ते तीन फुट उंचीचे फायबर मॉडेल्स मागविण्यात आली असुन 31 ऑगस्टपर्यंत कलासंचनालयाकडे पाठवण्याच आवाहन करण्यात आलय.
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला काणाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला
ज्यावर मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिलय…
रोहित पवारानी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतोय
पैश्यांची मागणी करतोय त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता
त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या आणि मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले असल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले आहे
मोबाईलवर बोलणे सिग्नल तोडणे फेरीमध्ये बदल करणे वाहतूक भंग करणाऱ्यावर ही कारवाई
गेल्या तीन महिन्यात पीएमपीच्या 2150 कर्मचाऱ्यावर तिकीट तपासणी पथकाकडून कारवाई
चालकाकडून वाहतूक नियमाचा वेळोवेळी भंग होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे
पीएमपीच्या वाहकाकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार तिकिटात करत होत असल्याने कारवाई करण्यात आली आहे
अचानक निर्णय झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम
एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी एक केवायसी आयोगाने बंधनकारक केली होती
उमेदवाराने एकदाच केवायसी केल्यानंतर सर्व परीक्षा देता येणार होत्या
परीक्षेत पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय आयोगाने घेतला होता.
प्रशासकीय कारणामुळे इ केवायसी प्रक्रिया पुढे गेली असल्याचे आयोगाने स्पष्ट केला आहे
केवायसी कधी होणार याची तारीख लवकरच नव्याने जाहीर केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केला आहे
कोकणातील सौंदर्यं पावसाळ्यात आणखीणच खुलून दिसत...
हिरवागार निसर्ग आणि यात डोंगरात धुक्याची चादर...जणु ढगच पृथ्वीतलावर अवतरलेत असच काहीचं वातावण सध्या कोकणात पहायला मिळतंय...
श्रावणमास सुरु आहे त्याच अधुनमधून पडणा-या श्रावणधारा....आणि डोंगराच्या कुशीत पडणारं धुकं त्यामुळं कोकणातील सध्याचं वातावरण अल्हाददायक झालय...
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी स्पष्टच स्पष्टीकरण दिलंय..
"सामाजिक न्यायभवनाच्या वस्तीगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे...
आपल्या बापाचं काय जातंय" असं वादग्रस्त विधान शिरसाट यांनी केलं होतंय. त्यांच्या विधानाचा परत पराचा कावळा केला गेला असल्याचे आमदार मिटकरी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.