आगीत १० ते १२ गाड्या जळाल्यांची सूत्रांची माहिती गाडयांना आग नेमकी कशी लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशमक दल दाखल या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. १० ते १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. आगीचं नेमकं कारण काय याचा माटुंगा पोलीस शोध घेत आहेत.
कल्याणमधील 'मेळा गणपती' ही सव्वाशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा असून, यात विविध जातीधर्माचे लोक एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करतात. या परंपरेची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापनेनंतर कल्याणमध्ये मेळ्याच्या गणपतीची सुरवात झाली वेगवेगळ्या ज्ञाती समाजाचे बारा गणपती एकत्र येऊन 'मेळा गणपती' उत्सवाला सुरुवात झाली. या गणपतींचे विसर्जन एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने आणि ढोल-ताशांच्या गजरात कल्याण च्या गणेश घाटावर विसर्जन केले.
गौरी गणपतीच्या सणाला कोकणात आलेले मुंबईकर गणेभक्तांनी आपला परतीचा प्रवास सुरु केला आहे. ते या परतीच्या प्रवासादरम्यान वाहतुक कोंडीत आडकले आहेत. दुपारनंतर मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतुक कोंडीतुन गणेश भक्तांची सुटका व्हावी यासाठी प्रशासनाने अवजड वाहनांना थांबले आहे
नाशिकच्या मालेगाव शहरातील गणेश भक्तांनी गणपती डोक्यावर रस्त्यात ठिय्या मांडत महापालिकेचा निषेध केला, मालेगाव शहरात गणपती विसर्जन मार्गावरील खड्डे, मोकाट जनावरे यांमुळे मंडळातील गणेश मूर्तींना अपघाताचा धोका, गणपती मंडळांच्या जवळच वाहणारे गटारीचे सांडपाणी या बाबत शहरातील सामजिक कार्यकर्ते व गणेश भक्तांनी वारंवार मनपाला निवेदन देऊन देखील त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी शहरातील सरदार मार्केट जवळ गणपती डोक्यावर घेत घोषणा बाजी करीत मालेगाव मनपाचा निषेध व्यक्त केला..
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची नाराजी दूर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
- नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह, महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्तांनी घेतली नाशिक मधील साधू महंतांची भेट
- साधूग्रामसह, दिगंबर आखाडा आणि तपोवनात साधू महतांसोबत केली पाहणी
- प्रशासकीय अधिकारी आणि साधू महंतांचा संयुक्तिक पाहणी दौरा
- साधू महंतांच्या सूचना आणि मागण्यांबाबत केली चर्चा
- पावसाळा संपताच कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात करण्याचं अधिकाऱ्यांनी दिलं आश्वासन
- प्रलंबित साधूग्रामच्या जागे संदर्भात देखील लवकरात लवकर तोडगा काढण्याचं अधिकाऱ्यांचं साधू महंतांना आश्वासन
- कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना देखील प्रत्यक्षात कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात होत नसल्याने साधू महंतांनी व्यक्त केली होती नाराजी
- साधू ग्रामसाठी देखील एक हजार एकर जागेची साधू महंतांची मागणी
- साधू महंतांच्या गरजा आणि सूचना वरिष्ठ पातळीवर पोहोचवणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधक सामने सामने आले आहेत. काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभागरचना झाल्याचा आरोप करत त्याला तीव्र आक्षेप घेण्याचा इशारा दिलाय, तर भाजपने विरोधकांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांचे रडगाणे सुरू असून त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा पलटवार केलाय. दरम्यान कोल्हापूर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचनेत 20 प्रभाग जाहीर केलेत पहिल्यांदा चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना आहे.
पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करून कोकणवासीय मुंबईकडे परतत आहेत. या परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे. माणगाव ते तळेगाव हे सात किलो मिटर तर लोणेरे ते टेमपाले हे साधारण चार किलो मिटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पालघरच्या सूर्या समुद्रात काल गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या शांताराम चौरे यांचा पाण्यात बुडून अंत झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत सारणी येथील बाबल्या लाडवी याचा सूर्या नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
मराठा आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका मांडताना सुनील तटकरे म्हणाले, "ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय की नाही यावर अभ्यास करावा लागेल. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे " असे म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गतवर्षी महायुती सरकारने गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला होता. मात्र यावर्षी हा शिधा वाटण्यात आला नाही त्यामुळे हा शिधा फक्त विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची मते मिळविण्यासाठी त्यावेळी वाटण्यात आला होता का असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
कॉंग्रेस नेते सुनिल केदार यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. एक जरांगे दिसला तर मुंबईत थैय थयाट झाली, सामान्य माणूस रस्त्यावर आला तर तुम्हाला जागा मिळणार नाही. अशा वाक्यात त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. तसेच येणाऱ्या सहा महिन्यात मोदी सरकार दिसणार नाही असेही ते म्हणाले.
सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ दुर्घटना घडली. बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जबरदस्त धडक दिली. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. यातील सर्व प्रवाश्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.
ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. भुजबळ नाराज असतील, तर त्यांना समजावून सांगू. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी सांगली महापालिका निवडणुक ताकतीने लढवली जाईल,असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक घेतली आहे.काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागावे,असं आवाहन आमदार विश्वजीत कदम यांनी केले आहे.
- आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध
- 2017 च्या महापालिका निवडणुकांची प्रभाग रचनाप्रमाणेच यंदाही सादरीकरण
- महापालिकेच्या कौन्सिल हॉल परिसरात सर्व प्रभागांचे लावण्यात आले स्वतंत्र नकाशे
- प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे आणि हद्द पाहण्यासाठी भावी नगरसेवकांनी केली गर्दी
- 2011 च्या लोकसंख्येप्रमाणे तर 2017 च्या पद्धतीने प्रारूप प्रभाग रचना जाहीर
- प्रभाकर रचनेमध्ये मतदारांची संख्या मात्र जुलै 2025 अखेर पर्यंत निश्चित
गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आलेल्या कोकण वासियांना पुन्हा मुंबईत परतायचे वेध लागलेत. त्यांच्या परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या रायगड विभागाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी आज 3 सप्टेंबर रोजी 525 तर उद्या 4 सप्टेंबरला 125 जादा गाड्या रायगडमधील आठ आगारातून सोडण्यात येणार आहेत. शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात येतील असे एसटी तर्फे सांगण्यात आले.
- अंडरवर्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून झाली सुटका
- मागच्या गेटने पोलिसांनी मीडिया पासून लपवत केली अरुण गवळी यांची सुटका.
- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली,
- सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे....
- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे...
- अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.....
- सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला असून थोड्या वेळात नागपूर मध्यवर्ती कारागृहातुन सुटका झाली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना दिसत आहे. नांदेड मध्ये ओबीसी समाजाने शासनाने काढलेल्या जीआरची होळी केलीये.नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने हे आंदोलन केले.शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता.राज्य शासनाने मराठा समाजाबद्दल घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाविरोधात ओबीसी समाज राज्यभरात तीव्र लढा उभा करणार असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ यांची अनुपस्थिति आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला भुजबळ उपस्थित होते. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे भुजबळ नाराज होते. त्यात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला भुजबळ अनुपस्थित आहेत, त्यामुळे चर्चा सुरू आहे.
जर गैरसमज असेल, तिथे आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेय,
भावांनो.. यांना तुमच्यातील आणि माझ्यातील दुरी निर्माण करायचे अन् तोडायचे. मी तुमच्यापासून बाजूला झालो की वाटोळं झालं. पण मी फक्त अन् फक्त मरठ्यांचेच कल्याण करतोय. आता जरांगेंनी विषय संपवत आणलाय.
पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाडा आरक्षणात गेला तर खाली काय राहिले. आपल्याला बोलायला काहीच राहिले नाही. कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळे पण जर कुणा गरीब मराठ्यांना शंका असेलच
तुमचा आणि माझा विश्वास राहिला नाही, पाहिजे असा काहींचा उद्देश आहे. तो तुम्ही ढळू देऊ नका. तुम्ही मोठं झालेले पाहिजे. गैरसमज असेलच तर मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेय.
ज्याच्या नोंदी नाही, त्याच्यासाठी तिघांची समिती केली. गावस्तारवर तालुकास्तरावर, हैदराबादमध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्यातील मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी तिघांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही. त्यांनी कुणाची बटाईने जमीन केली असेल, त्याचे हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार.. प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे.
ज्याच्याकडे जमीन आहे, त्याच्या सातबारावर.. तिघाजणांच्या सदस्यांनी ताबडतोड वर्ग करून प्रमाणपत्र दिले जाणार.. हैदराबाद गॅझेटेयरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्या यावे, यासाठी जीआर आहे. शंका, कुशंका डोक्यात ठेवण्याची गरज नाही. मी तुमचं का वाटोळं करेन. मराठा समाजाचे मी का वाटोळं करणं. मी आणि समाज सध्या आनंदी आहे.
निर्णय घेताना मी एकटा निर्णय घेत नाही. सात कोटी गोरगरीब जनता आणि मी निर्णय घेतो. काहींचे पोट यासाठी दुखत असते, आता त्यांच्या हातातून सर्व गेले. ज्यांना आरक्षणावर, गॅझेटवर राजकारण करायचे होते, ज्यावर जीवन जगत होते, ते सर्व आता कोलमडायला लागले. मग आता काय करायचे, काहीतरी करायचे. हे कधीच आपल्या बाजूने बोलले नाहीत. कुठलाही निर्णय सुरूवातीचे आठ ते १५ वाटते हे करायला पाहिजे नव्हते.
मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही, हे डोक्यात ठेवा अन् आनंदी राहा. कुणाचे ऐकूण आपलं भलं होणार नाही. आणखी खूप टोळ्या उठणार आहेत.
शेवटी काहीही होऊ दे.. माझ्या मराठी बांधवानी ही लढाई जिंकली. अनेक शतकांपासूनची प्रतीक्षा होती. शेवटी त्या लढाईल मराठ्यांनी यश पदरात पाडून घेतलेय. ३ जीआरचे यश समाजाचे आहे, मी फक्त नाममात्र आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र... शब्दावर विश्वास ठेवा अन् ठेवलाय पण.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणाजे जाणार, त्यावर शंका ठेवायची नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून गॅझेटियर लागू करायचे आहे. १८८१ पासून सरकारने मराठ्यांच्या हिताची एकही ओळ लिहिली नव्हती. हक्काचे गॅझेट असूनही सरकारने एक ओळही दिली नव्हती. फक्त संयम आणि शांतता ठेवून शांत डोक्याने विचार करा. एकाद्या विदूषक, अविचारी माणासावर विश्वास ठेवून संयम ढसळून घ्यायचा नाही.
अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे सापळा रचत 5 गावठी पिस्तुल आणि 9 जिवंत काडतूसांसह तीन आरोपींना जेरबंद केलंय.. मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने आणलेले गावठी पिस्टल श्रीरामपूर शहरात विक्रीसाठी आणले जात होते.. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना 4 लाख 10 हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतलं..
मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. ते मराठा आरक्षणाविषयी बोलणार आहेत.
वाल्हेरीहून तळोदा च्या दिशेने जाणाऱ्या महामंडळ बसचा अपघात....
अपघातात बसमधील 25 ते 30 विद्यार्थी जखमी...
त्यातील तीन विद्यार्थी गंभीरित्या जखमी....
जखमी विद्यार्थ्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आला दाखल.....
घटनास्थळी विधानसभेचे आमदार राजेश पाडवी दाखल....
भाद्रपद शुद्ध परिवर्तिनी एकादशी निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी आज पंढरीत हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. महाद्वार, पश्चिमद्वार, प्रदक्षिणामार्ग, यासह चंद्रभागानदी परिसर हजारो भाविकांनी गजबजुन गेली आहे. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी एक तासांचा कालावधी लागतो आहे.
विठ्ठल रूक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग दोन किलोमीटर पर्यंत गेली आहे.
सोन्याचे दर
आज जळगावातील सराफा बाजारातील सोन्याचे दर
22k 96720
24k 105600
Silver 124000
अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे येथील बोरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनल ने 13 पैकी 13 जागा जिंकून जिल्ह्यात दमदार एन्ट्री केली आहे.. यामध्ये शिंदे गटाचे नेते माजी जिल्हा परिषद सभापती आशिष धर्माळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली असून त्यांनी एक हाती सत्ता या सोसायटीवर मिळविली, व गावात गुलाल उधळत एकच जल्लोष करण्यात आला.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी त आता शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात सुद्धा दमदार एन्ट्री करेल,ही आता सुरुवात झाली आहे, असेही यावेळी या विजयी उमेदवारांनी बोलून दाखवले...
- जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नंतर जल्लोष
- नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनाचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित
- नाशिकचे ग्राम दैवत असलेल्या कालिका मातेची आरती करून जल्लोष
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्याने अनेक मराठा बांधव मुंबईवरून गावाकडे परतत आहे. याच मराठा बांधवांसाठी जालन्यातील रामनगर येथील मराठा बांधवांनी नाष्टा आणि चहाची व्यवस्था केली आहे. जालन्यातील रामनगर येथील ग्रामस्थांकडून जवळपास 15 क्विंटल चिवड्याचे वाटप करण्यात येत आहे.
असीम सरोदे यांनी पुणे पोलिस महानगरपालिका आयुक्त यांना पाठवलं पत्र
पुणे महापालिका आकाशचिन्ह विभाग आणि पुणे पोलीस यांना प्रबोधन चित्राचे बॅनर/होर्डिंग लावण्याची परवानगी मागितलेली आहे
१५ बाय २५ फुटाचे होर्डिंग्ज गणपती उत्सव काळात डेक्कन येथील गुडलक चौकात बॅनर लावण्याची परवानगी मागितली
लोकशाही आणि लोकशाहीचे पारदर्शक प्रक्रिया या संदर्भात काढलेले एक चित्र लावणार आहोत
सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगात रांगा
मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
सायन पुणे महामार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे
आज सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला आहे वाहन चालकांना
काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, पिरंगुट- हिंजवडी मार्गावरील भरे पूल येथे मुळा नदीच्या किनारी ही दुर्घटना घडली.
हा मुलगा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता.मित्रांसोबत खोल पाण्यामध्ये गेला होता.त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्यांनी डुबकी मारली व तो तसाच नदीच्या पात्रामध्ये वाहत खाली गेला
लक्ष्मण हनुमंत चव्हाण असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.तो मूळचा उदगीर तालुक्यातील असून सध्या तो पिरंगुट येथे राहत होता. त्याचा शोध आपत्ती व्यवस्थापन समितीने घेत असताना संध्याकाळ झाल्याने शोध थांबवण्यात आला.
आज सकाळपासून या बुडलेल्या मुलाचा शोध घेतला जात आहे.
अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.
काल पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तसेच रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. बेपत्ता तरुणाचा आज सकाळी पुन्हा शोध घेतला जात आहे.
मराठवाड्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या परभणीच्या येलदरी धरणाचे पुन्हा एकदा १० पैकी ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.६ दरवाज्यांमधून १२६६० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि खडकपुर्णा धरणातील विसर्गामुळे येलदरी तून पाण्याचा विसर्ग केला जातोय जर पाऊस वाढला तर विसर्ग ही वाढवण्यात येवू शकतो.
जळगाव राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुलांच्या शेतीवर मोठा परिणाम झाला असून, ऐन गणेशोत्सवाच्या काळात बाजारात फुलांची आवक लक्षणीय घटली आहे. यामुळे फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे, सरकारने कृत्रिम फुलांवर बंदी घातली असली तरी, बाजारात त्यांची विक्री जोरात सुरू आहे. जळगावच्या बाजारात झेंडू, गुलाब, मोगरा आणि निशिगंधा याच फुलांची आवक आहे. चाफा, सोनचाफा आदी फुले बाजारात नाहीत.
पंढरपूर जवळच्या कुर्डुवाडी शहरातील गणेश तरुण मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याचा आगवेळा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात पोलिसांच्या उपस्थितीमध्ये संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तशी शपथ घेतली आहे. डीजेमुळे ध्वनी प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावण्याचा महत्व पूर्ण निर्णय घेतला आहे.अशा प्रकारचा निर्णय घेणारे हे मंडळ सोलापूर जिल्ह्यात पहिले ठरले आहे.
बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शहराची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे येळगाव धरणाच्या गोडबोले सांडव्यातून विसर्ग व्हायला लागला आहे. येळगाव धरणातून बुलडाणा शहरासह तालुक्यातील काही 13 गावांना पाणीपुरवठा केला जातो. पुढील एका वर्षासाठी बुलडाणा तसेच लगतच्या गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलीय. येळगाव धरणात जवळपास 100 टक्के जलसंचय झाला आहे .. बुलडाणा शहरातील लोकसंख्येचा विचार केला असता शंभर लिटर प्रमाणे दररोज एक कोटी लिटर्स पेक्षा जास्त पाण्याची गरज शहरवासियांना आहे. तर येळगाव धरणातून अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी बु., सागवन, कोलवड, देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर, अंत्री तेली, जांभरुण या गावांना यळगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. याधरणातून दररोज सव्वा कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्याची उचल केल्या जाते . धरणाची पाणी साठवण क्षमता 12.40 दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुफलाम झाला आहे.
मेळघाट मधील धारणी तालुक्यातील बारू गावातील सिंचन विभागाच्या तलावाची भिंत फुटल्यामुळे मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.या पाण्यामुळे बारू–बीजू धावडी हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.तर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे... या दुर्घटनेमुळे बारू, बीजू धावडी, ढाकणा, अकोट व परतवाडा मार्गावरील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.हा 1977-78 मध्ये बांधण्यात आला होता. त्याची दुरुस्ती 2013-14 मध्ये करण्यात आल्याचे सिंचन विभागाचे अधिकारी यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या बैठकीत या तलावाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र 2014 पासून या तलावाची देखभाल न केल्याने अखेर हा तलाव अखेर फुटला आहे,याचा त्रास मात्र मेळघाट मधील नागरिकांना सहन करावा लागत आहे
- तर नाशिक विमानतळावरील विमानांचं पार्किंग देखील ५ वरून ८ वर
- नाशिकला ५ तर त्र्यंबकेश्वर परिसरात ५ हेलिपॅड उभारण्यासाठी जागा निश्चित
- परिसरातील शिक्षण संस्थांचे हेलिपॅडदेखील वापरण्याचा प्रशासनाचा विचार
- नाशिक आणि ओझर होऊन हेलिकॉप्टरने थेट त्रंबकेश्वरला जाता येणार
- १८५ कोटींचा आराखडा केंद्रीय उड्डयन मंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला
- १५० कोटी रुपये खर्चून विमानतळ इमारतीचा देखील केला जाणार विस्तार
- विषबाधा झालेल्यांपैकी 17 लोकांवर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती
- प्रशिक्षणार्थी पोलीसांना अन्नातून ही विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय
- सर्व बाधित प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेय
- पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास 1400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
- दरम्यान काल सायंकाळच्या सत्रात या प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब, मळमळ याचा त्रास सुरू झाला
- त्यानंतर जवळपास 170 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले
- कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई, नाशिक पोलिस प्रशासनाचा इशारा
- डीजे आणि लेझरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्यानं निर्णय
- पोलिस ठाणे निहाय ध्वनी क्षेपकांच्या आवाजाचं डेसीबल देखील मोजलं जाणार
- विसर्जन मिरवणुकीतील गर्दीवर देखील असणार पोलिसांचा वॉच
गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आलेल्या कोकण वासियांना पुन्हा मुंबईत परतायचे वेध लागलेत. त्यांच्या परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या रायगड विभागाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी आज 3 सप्टेंबर रोजी 525 तर उद्या 4 सप्टेंबरला 125 जादा गाड्या रायगडमधील आठ आगारातून सोडण्यात येणार आहेत. शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात येतील असे एसटी तर्फे सांगण्यात आले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज एका दिवसात ७८५ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.
गेल्या १० दिवसात केवल ५९५ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या होत्या. पण एका दिवसात त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त हरकतींचा पाऊस आज पडला आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२२ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर ४ सप्टेंबर पर्यंत यावर हरकती सूचना नोंदविण्याची मुदत आहे.
यासाठी महापालिकेच्या निवडणूक शाखेच्या कार्यालयासह १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या ४ सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदविल्या जाणार आहेत.त्यातच पालिकेच्या निवडणूक कार्यालय निहाय निवडणुकीसाठी १७ मुख्य निवडणूक अधिकारी आणि ३४ सहायक निवडणूक अधिकारी देण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली
पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच प्रभागनिहाय निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे
मुंबईमधून निघाल्यानंतर जरांगे पाटील थेट संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल
जरांगे पाटील यांच्यावर गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू
मध्यरात्री जरांगे पाटील यांचे मराठा समाजाकडून जंगी स्वागत
रुग्णालयाबाहेर मराठा तरुणांची स्वागतासाठी मोठी गर्दी
मध्यरात्री तरुणांकडून फटाके फोडत पाटलांचे स्वागत
यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळे देखावे तयार करण्यात आला आहे.अशातच यवतमाळ शहरातील वडगाव परिसरातील सुभाष नगर येथील सुमित रवींद्र टाके या युवकाने घरी पार्वती माता नसताना गणपती आणि उंदराच्या घरात चालू असलेल्या गोंधळाचा देखावा तयार केला असून हा देखावा बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला आहे अशातच जुनी भांडी चूल व उंदरांच्या मस्त्या हुबेहूब साकारले असून हा देखावा तयार करण्यासाठी सुमितला पंधरा दिवसांचा वेळ लागला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सुमितच्या डोक्यात आगळावेगळा काहीतरी देखावा तयार करण्याचा विचार सुरू होता अशातच त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून साहित्य जमा करीत हा देखावा तयार केला.
मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसापासून मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव च्या उमरगा शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.या वेळी जय जिजाऊ,जय शिवराय,एक मराठा लाख मराठा च्या गजरांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
चंद्रग्रहनाच्या पाश्र्वभूमीवर 7 सप्टेंबर रोजी रवीवारी राञी तुळजाभवानी मातेचा धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.यामध्ये रवीवारी राञी ९.५७ ते १.३० या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे. रवीवारी राञी चंद्रग्रहन असल्याने ग्रहनकालावधीत रवीवारी देवीचे नित्योपचार धार्मिक पुजा विधीत बदल करण्यात आला आहे.तसेच ग्रहण सुटल्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता नित्यपुजेची घाट होऊन अभिषेक पुजेला प्रारंभ होणार आहे.अभिषेक पुजा विधीनंतर देवीस महावस्त्र अलंकार घालण्यात येवून धुपारती होईल विशेष म्हणजे रवीवारी राञभर मंदीर खुले राहणार आहे.
अंबरनाथमधील बबलू खान हे मनसेचे पदाधिकारी असून त्यांनी मंगळवारी सात दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनात सहभागी होत गणेशमूर्तींचं विसर्जन केलं. कानसई परिसरात माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या पुढाकाराने अंबरनाथ पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात बबलू खान यांनी बाप्पांचं विसर्जन केलं. यावेळी आमची ईद, तसा हिंदूंचा गणेशोत्सव, असं म्हणत सर्वांनी जात धर्म न मानता एकमेकांच्या सणात सहभागी व्हायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं. तर त्यांच्या या कृतीचं माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी देखील कौतुक केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केले आहेत. मागण्या संदर्भात राज्य शासनाने तसा जीआर देखील काढला आहे.जीआर काढल्यानंतर आणि मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला.नांदेड मध्ये देखील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधवांनी एकत्रित येत जल्लोष साजरा केला. गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत मराठा बांधवांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.