बीडच्या केज येथील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्याविरुद्ध केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका 16 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा बेडसकर याने प्रयत्न केला. रात्री साडेआठच्या दरम्यान पिडीत मुलगी आणि तिच्या मावशीसह बहिणीला नाश्ता चारण्याच्या बहाण्याने आपल्या चारचाकी गाडीत निर्जनस्थळी घेऊन गेला. आणि तेथे त्याने एका 16 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिथे काही लोक दाखल झाल्यानंतर बेडसकर याने तेथून पळ काढला. याप्रकरणी केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस हा आरोपी त्याच पोलीस स्टेशनमध्ये हजर असल्याचा फोटो देखील समोर आला आहे मग पोलिसांनी त्याच वेळेस या गटशिक्षणाधिकारी आणि आरोपी बिडकर ला ताब्यात का घेतलं नाही अशा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक–संभाजीनगर महामार्गावर जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन सुरू.
प्रहार संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा.
कांद्याच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान आणि हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळे वस्त्र बांधून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला घातली कांद्याची माळ
आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
जवळपास 2 कोटी 61 लाख रुपयांचे ट्रक्स इंटेलिजन्स विभागाने केले जप्त
5 किलो 234 ग्रॅम मेथाकॅलोन नावाचा अमली पदार्थ आणला जात होता पुण्यात
विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर २०२५ रोजी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-२४१ वरून येणाऱ्या एका प्रवाशाला अटक केली.
त्यांच्या चेक-इन लगेज बॅगची झडती घेतली असता पावडर आणि क्रिस्टल स्वरूपात ५.२३ किलोग्रॅम वजनाचा पांढरा पदार्थ आढळून आला.
फील्ड टेस्टिंगमध्ये हा पदार्थ मेथाकॅलोन असल्याचे निश्चित झाले
हा प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आला आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली
स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे "नमो उद्यान" नामकरण करण्याचा घाट घातला जात असल्याने सावरकर प्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. नाशिकच्या भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत सावरकर उद्यान असावे, अशी मागणी करण्यात आलीय. नमो उद्यानाला निधी नाही मिळाला, तरी चालेल अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आलीय. भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे २४ वर्षापासून रखडलेले काम अजूनही पूर्ण झालेले नाही. तर शासनाच्या नवीन निधी अंतर्गत नमो उद्यान घोषणा करण्यात आलीय. या नमो उद्यानांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासही एक कोटीचा निधी वर्ग करण्यात आलाय. मात्र हे उद्यान नमो उद्यान की सावरकर उद्यान? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
परळीतील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघु फड गॅंगवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. या गॅंगचे वाल्मीक कराड समर्थकांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. या टोळीत सात जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र आता अपर पोलिस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गितेचाही समावेश आहे. नंदागौळ (ता. परळी) येथील रहिवासी असलेल्या गोट्या गितेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे १० ते १५ गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्याप फरार आहे. गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द झाला आहे. तर टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि धनराज गिते या दोघांवरच मकोका कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे परळी परिसरात चर्चांना उधाण आले आहे
- बार्शी तालुक्यातील बेलगाव परिसरात वादळी वारा, गारपीटीसह मुसळधार पाऊसाची हजेरी
- मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेय.
- त्याचबरोबर ताडसौंदणे गावात शिरले पावसाचे पाणी
- तर मांडेगाव येथील चांदणी नदीवरील पुलावरून जेसीबीच्या साह्याने नागरिकांची ये जा.
- बार्शी सोलापूर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा.
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागच्या आठवडाभरापासून मराठवाड्यातल्या सगळ्याच भागात अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय शेत जमिनी वाहून गेल्या. अनेक घरांची पडझड झाली. या नुकसानीसाठी पन्नास टक्के म्हणजेच ६३० कोटींची मदत शासनाने १८ सप्टेंबरपर्यंत मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. चार जिल्ह्यांतील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे आकडे अद्याप स्पष्ट नाहीत. अद्याप सप्टेंबरमधील नुकसानीचा आकडा समोर आला नाही. सर्वाधिक नुकसान हे सप्टेंबर महिन्यात झाले आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यानुसार किती मदत लागणार, हे स्पष्ट नाही. आतापर्यंत ५ हजार गावांतील १९ लाख शेतकरी बाधित झाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतात जाता येत नाही, ई- पीक पाहणी सर्व्हर डाऊन असणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे लोकेशन चुकीचे दिसणे, खाते क्रमांक न जुळणे आदी अडचणींमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करु शकले नाहीत. शासनाकडे केलेली मागणी आणि मंजूर केलेल्या निधीत ५० टक्के फरक सध्या आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात प्रामुख्याने पीक नोंदणी, आधार-बँक खाते लिंक नसणे, पंचनामा प्रक्रियेतील विलंब, नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीची प्रतीक्षा व निधी वितरणातील समस्या या प्रमुख अडचणी आहेत
कोल्हापुरात परवा रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधाऱ्यावर पाणी
यावर्षीच्या पावसाळ्यात सहाव्यांदा राजाराम बंधाऱ्यावर आलं पाणी
खबरदारीचा उपाय म्हणून राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक तात्पुरती बंद
कोपरखैरणे पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार घनसोली रेल्वे स्टेशन परिसरात एम.डी. अंमली पदार्थ विक्रीसाठी दोन इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सेंट्रल पार्कच्या विरुद्ध बाजूस सापळा रचून कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक केली आहे.
या कारवाईदरम्यान निखील राजकुमार वागासे याच्या अंगझडतीतून ४४ लाख किमतीचा ११२.३८ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) पावडर जप्त करण्यात आला. तर त्याचा साथीदार मसुद अब्दुल सलाम खान याच्या अंगझडतीतून २८ लाख किमतीचा ६९.७४ ग्रॅम एम.डी. पावडर मिळाली.
- रात्रीच्या वेळी सिडकोच्या स्टेट बँक चौकात मद्यधुंद तरुणींचा गोंधळ
- तरुणींना हटकणाऱ्या एका व्यक्तीला तरुणींकडून मारहाण
- मद्यधुंद तरुणींकडून गोंधळ आणि गुंडगिरी
- अखेर मित्रांनी मैत्रिणीची अवस्था पाहून ठोकली धूम
आदिवासी तरुणाचा हत्तेच्या निषेधार्थ आज जिल्हा बंद...
तरुणाच्या हत्यने आदिवासी समाजात प्रचंड संताप...
मृत जयेश भील च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षेची मागणी...
आज सकाळ पासूनच जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद.....
जिल्हाभरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात...
मावळतील अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणाऱ्या खडकाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अंजलीताई मुथा यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडणुकीत सरपंचासह एकूण १७ सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायतीत उपसरपंच पद रिक्त झाल्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत अंजलीताई मुथा यांच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमताने विश्वास दाखवत निवड केली.
दोन दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी लक्ष्मण हाके यांच्याबाबत बोलताना म्हटले होते की ते वारंवार बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडमधून निवडणूक लढवायची आहे याला उत्तर देताना लक्ष्मण हक्क म्हणाले की बजरंग सोनवणे हे बावचळले आहेत भंजाळले आहेत. आठ दिवसांपूर्वी ते म्हटले गावच्या ग्रामपंचायतच्या सदस्य होयला सांगा आणि आज म्हणतायेत बीड जिल्ह्यामध्ये हे लोकसभा लढवायला येणार आहेत नक्की ठरव बाबा मी एका मेंढपाळाचा पोरगा आहे याच बीड जिल्ह्याने आणि याच बीड जिल्ह्यातील लोकांनी नेहमी मतदान देण्याची भूमिका बजावली आहे एका मेंढपाळाचे पूर्व जर निवडणुकीला उभा राहिलं तू कारखानदार तुझा मालक शरद चंद्र पवार तू जहागीरदार मेंढपाळाचे पोरग आहे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आम्ही जर बीडमध्ये आलो तर तू काय करायचे ते ठरव.
-- बेझे धरणातून पाईपलाईनने आणणार पाणी
- त्र्यंबकेश्वरमधील अरुंद कुशावर्तातील गर्दी विकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न
- बेझे धरणातून पाईपलाईनने पाणी उचलून गौतमी, गोदावरी, गंगासागर, इंद्र आणि कुशावर्त कुंडात आणलं जाणार
- गोदावरी नदी बारमाही वाहण्यासाठी ३३० कोटींचा प्रकल्प
- त्र्यंबकेश्वरसह नाशिकमधील घाट देखील आकर्षक करण्याचा निर्णय
- नाशिक शहरात आज शनिवारी पाणीबाणी
- संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा आज राहणार बंद
- तर उद्या रविवारी देखील होणार कमी दाबाने पाणी पुरवठा
- शहरातील विविध जलकुंभ, जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरुस्ती आणि तांत्रिक कामानिमित्त आज दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद
- नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन
साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकाने एक खास शैक्षणिक ऍप्लिकेशन तयार केले आहे, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲप चे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आले..
पहिलीपासून ते अगदी कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ऍप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार असून. शाळा आणि महाविद्यालयांना या ऍपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. महत्त्वाचे म्हणजे, मुलांमध्ये दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती आणि शैक्षणिक माहिती यामुळे पालकांना लगेच मिळणार असल्याची माहिती सोमनाथ जाधव यांनी दिलीये.
- प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला आळा बसणार
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुरक्षितता आणि पारदर्शकपणासाठी निर्णय
- विद्यापीठातील विविध प्रमाणपत्रे आणि श्रेयांकपत्रकांची छपाई इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार
- पूर्वीच्या प्रमाणपत्रांमध्ये केवळ ६ सुरक्षा मानके, आता वाढून ती १६ सुरक्षा मानकांपर्यंत जाणार
- या निर्णयामुळे प्रमाणपत्रांची विश्वासार्हता आणखी मजबूत होणार
एक दिवसाच्या उघडीप नंतर पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव ,सिंधगी, सेनगाव सह हिंगोलीत मुसळधार पाऊस कोसळला आहे,या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड पाणी जमा झाले असल्याने पुन्हा एकदा पिके पाण्याखाली गेली आहेत.
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करत असताना दाम्पत्याचा मृत्यू प्रकरण
त्या प्रकरणी राज्य सरकारने नेमली चौकशी समिती
मात्र त्या समितीचा अहवाल अजूनही आरोग्य विभागाला दिला नाही
या प्रकरणात सह्याद्री रुग्णालयाला क्लीनचिट देणार की ठपका ठेवणार हे पाहावे लागेल
१५ ऑगस्टला बापू कोमकर यांना यकृत दान करणारी पत्नी आणि बापू या दोघांचाही मृत्यू झाला
या प्रकरणात रुग्णालयावर आरोप करण्यात आला आहे यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे.
नातेवाईकांनी केली होती कारवाईची मागणी
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द गावात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे, सर तुम्ही आमच्या शाळेतून जाऊ नका असे म्हणत विद्यार्थ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली, गेल्या पाच वर्षापासून या जिल्हा परिषदेच्या शाळेत गणेश उजाडे हे शिक्षक विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनाचे धडे द्यायचे, त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत मायेचा ओलावा द्यायचे मात्र प्रशासकीय कारणास्तव आता त्यांची बदली दुसऱ्या शाळेत झाल्याने त्यांनी या शाळेचा निरोप घेतला यावेळी शिक्षक गणेश उजाडे यांना देखील अश्रू अनावर झाले होते.
धाराशिव च्या उमरगा तालुक्यात गेली दोन दिवसात झालेल्या पावसाने नाईचाकूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा तोडणीस आलेले ऊस आडवा झाला आहे.वर्षभर काबाडकष्ट करून उसाचे पीक शेतकऱ्यांनी कसेबसे जगवले होते.पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकातील तूर,सोयाबीन,या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे होऊन आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.
धाराशिव च्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात दररोज कमी अधिक प्रमाणात दमदार पाऊस पडत असल्याने सिना कोळेगाव प्रकल्पाच्या 13 दरवाजातून 21 हजार 700 क्युसेकने सिना नदीपाञात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.परंडा तालुक्यातील पाच टिएमसी क्षमता असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्पासह खासापुरी चांदणी साकत मध्यम प्रकल्प व निम्म खैरी मागील महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहेत.तर सिना कोळेगाव प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अधिक केला जात आहे.
रस्त्यातील अडथळे,अतिक्रमण दूर करा, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डे मुक्त करा असे आदेश महापालिका आयुक्त यांनी प्रशासनाला दिले. पण त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांतर्फे शहरातील तब्बल ५५० किलोमीटरचे रस्ते सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणार आहे. याची सुरुवात नवी पेठेतील राजेंद्रनगरमधून झाली आहे. त्यामुळे पुणे खड्डे मुक्त कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला असून, महापालिकाही संभ्रमित झाली आहे.
अकोल्यात 'किसान ब्रिगेड'च्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडलीय. ही सभा गाजलीय ती 'प्रहार'चे नेते बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वादग्रस्त विधानांनी... या सभेसाठी देश आणि राज्यातील शेतकरी नेते अकोल्यात आले होतेय. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, बच्चू कडू, रविकांत तूपकर, प्रकाश पोहरे, अजित नवले, विश्वास उटगी आदी नेते या सभेला उपस्थित होतेय.
या सभेत बोलताना 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केलाय. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलंंय. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
उद्धव ठाकरे यांचा ४ ऑक्टोबर रोजी पुणे दौरा
शिवसैनिकांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
आगामी महापालिका निवडणुकीची पायभरणीला होणार सुरुवात
स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्ष संघटना मजबूत करणे याविषयी उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
एक दिवसीय मार्गदर्शनाला पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक राहणार उपस्थितीत
बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता
Rain Alert: आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
अहिल्यानगर : अनेकदा राज्य आणि देश पातळीवरील विविध विषयांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे आमदार रोहित पवार आज त्यांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले दिसले. जामखेडमध्ये आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या. यावर अधिकारी मोघम उत्तरे देत असल्याचे पाहून आमदार पवार संतापले. "आतापर्यंत गोट्या खेळत होतात का?" अशा शब्दात अधिकाऱ्यांना फटकारले.
नगरपरिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या... नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट... कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.