कल्याण-डोंबिवली परिसरात मांसविक्रीवरील बंदीमुळे तणाव निर्माण झाला आहे. मांसविक्री सुरू ठेवण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलीये.
- वर्धेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात प्रयत्न
- पोलिसांनी कंत्राटदाराला घेतले ताब्यात
- कार्यकारी अभियंता अंभोरे हे बिल काढत नसल्याचा आरोप
- आंदोलनामुळे एकच धावपळ
- दोन वर्षांपासून विविध विभागाचे देयक प्रलंबित
लातूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे, जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. लातूर बार्शी महामार्गावरच्या बोरगाव काळे येथे महामार्गावरील पर्यायी पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.., दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे
सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. भारतीय स्वतंत्र दिनाचा 79 स्वातंत्र्य दिन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री यांनी प्रशासनातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान केला. यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदार, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदीजन उपस्थित होते.
नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री माणिकराव कोकाटेनी केलं ध्वजारोहण...
खाते बदलून क्रीडा मंत्री झाल्यानंतर प्रथमच कोकाटेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न....
ध्वजारोहणासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींचे उपस्थिती...
भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ आज कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मुख्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भर पावसामध्ये ध्वजारोहण करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वच अधिकारी हे पावसामुळे भिजल्याचे पाहायला मिळालं.
नागपूरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्याय…
या कार्यक्रमात नागपूरातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजाहरणाचा कार्यक्रम पार पडला,भारतीय स्वतंत्र दिनाचा 79 स्वातंत्र्य दिन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी पालकमंत्री यांनी प्रशासनातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान केला यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदारांची उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्वा वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी ९ वाजता वाशिमचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी वीर सैनिकांच्या पत्नी,पोलिस अधीक्षक, अधिकारी,कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्रशासनात काम करणाऱ्या विविध अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
राज्याचे जलसंधारण व मृद तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी विविध क्षेत्रातील कर्तव्य बजावणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच जिल्ह्यातील सर्व विभागात तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीने शपथ देण्यात आली.
79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शालेय मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले.. यावेळी खासदार अनिल बोंडे,यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सगळ्या विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.. यावेळी दादा भुसे यांनी केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचन्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अस आवाहन केलं..
नाशिकला अद्याप पालकमंत्री लाभलेले नसतांना मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज स्वातंत्र्यदिन निमित्ताने शासकीय ध्वजारोहन सोहळा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी संपन्न होणार आहे. 26 जानेवारी, 1 मे नंतर तिसऱ्यांदा पालकमंत्री नसताना गिरीश महाजन यांना नाशिकला ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे..
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचे धरण अशी ओळख असलेल्या जायकवाडी धरणाला तिरंगा रोशनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे धरण अधिकच खुलून दिसतंय. जायकवाडी धरणावर छत्रपती संभाजीनगर जालना यासह 300 पेक्षा अधिक खेड्याची तहान अवलंबून आहे. आणि यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या बारा तासापासून संततधार पाऊस असल्यामुळे पाणी पातळी अधिक वाढणार आहे सोबतच गोदावरी नदीलाही पाणी येणार आहे.
- आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा
- तर आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर आंदोलकांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी
- मागील ३७ दिवसांपासून आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर सुरू आहे रोजंदारीवरील शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन
महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
ध्वजारोहन पूर्वी भारत मातेचे प्रतिमेच पूजन होईल. त्यानंतर ध्वजारोहण होईल...
मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरले आहे. 79 वा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा विद्युत रोषणाई करत धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. या पाणी विसर्गावर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करून जणू तिरंगा आमची जान, तिरंगा आमची शान, तिरंगा आमचा अभिमान असे सांगत तिरंग्याला सलाम केल्याची भावना व्यक्त होत आहे...
दरम्यान हे मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी पवनानगर वासियासह परिसरातील नागरिक गर्दी करत आहे...
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित राहिले असून त्यांच्या हस्ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते
५० वर्षांपूर्वीची आणीबाणी लावली, संविधानाची हत्या झाली
आणीबाणीच्या आठवणी आपण कधीच विसरु नयेत
मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला
सांस्कृतिव वैविध्य ही आमची कादद
आपल्याला भारतीय भाषांचा अभिमान असायला हवा
३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दीष्ट
२ कोटी महिला या लखपती दीदी झाल्या- पीएम मोदी
जगात मस्त्योददपान दुसऱ्या स्थानी
अन्नधान्य, भाजीपाला उत्पादनातदेखील दुसऱ्या स्थानी
चार लाख कोटींची शेतकरी उत्पादने निर्याद- पीएम मोदी
युवकांनाही गिफ्ट
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजन
आजपासून युवकांसाठी १ लाख कोटींची नवीन योजना लागू होणार
दिवाळीत सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार
हीच ती वेळ इतिहास घडवण्याची
समृद्ध भारत हाच न्यायाचा मंत्र
स्वावलंबी होण्यासाठी सर्वोत्तम व्हायला हवे- पीएम मोदी
भारताची प्रगती हा राजकीय अजेंडा नाही
पंतप्रधान मोंदीचा स्वदेशी मंत्र
पीएम मोदी -
देशातील विविध क्षेत्रात लाखो स्टार्टअप उदयाला
११ वर्षात उद्यमशीलता भारताची ताकद बनवली आहे
तरुणांना मोदींचे पुढे येणाचं आव्हान
नव्या कल्पना आणुया
कल्पना घेऊन या मी तुमच्यासोबत आहे
मोठी स्वप्न पाहा, एक क्षणही फुकट घालवू नका
पीएम मोदी -
अवकाश संशोधनातही भारत आत्मनिर्भर
खतांसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही
ईव्ही बॅटरी देशात निर्माण व्हावी
पीएम मोदी -
देशातल्या तरुणांच्या सामर्थ्यावर मला विश्वास
मेड इन लढाऊ विमानांसाठी भारतीय जेट इंजिन हवंय
भारतीय जेट इंजिनसाठी युवा संशोधकांनी संशोधन करावं
नाशिक -
- नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा
- आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा
- तर आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर आंदोलकांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी
- मागील ३७ दिवसांपासून आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर सुरू आहे रोजंदारीवरील शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन
पीएम मोदी -
न्यूक्लिअर ऊर्जा क्षेत्रामध्ये वेगाने काम सुरू
वर्षअखेरपर्यंत मेड इन इंडिया चीप बाजारात येईल
समुद्रातील तेल आणि गॅसचा शोध घेतला जात आहे
पीएम मोदी -
अणूऊर्जा दहापटीने वाढवण्याचा विचार
सौरऊर्जा ३० पटीने वाढली आहे
ऊर्जाक्षेत्रात आत्मनिर्भर होणं महत्वाचे आहे
पीएम मोदी -
भारत आता आत्मनिर्भर झाला आहे.
दुसऱ्या देशावर निर्भर राहल्यामुळे देशाचे मोठे
संरक्षण क्षेत्रात आपण आत्मनिर्भर बनतोय
तंत्रज्ञानाची कास धरणारे देश विकासाच्या शिखरावर पोहचले
पीएम मोदी -
पहलगाम हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश संतापला
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली.
देशात गेली कित्येक वर्षे झाली नाही अशी कारवाई सैन्यदलाने
आम्ही सैन्य दलाला पूर्ण मुभा दिली
दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे सारखेच
पीएम मोदी -
सिंधू पाणीवाटप करार हा अन्यायकारक होता हे आता देशाला समजले
रक्त आणि पाणी यापुढे एकत्र वाहणार नाही
अन्यायकारक सिंधू पाणी करार स्थगित केला
भारताच्या हक्काचे पाणी आतापर्यंत पाकिस्तानला दिले
पीएम मोदी -
पहलगाम हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश संतापला
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली.
देशात गेली कित्येक वर्षे झाली नाही अशी कारवाई सैन्यदाने केली
दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे सारखेच
पीएम मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या शूरविरांना सलाम केले
अणुबॉम्बच्या धमक्यांना आता आम्ही भीक घालत नाही
अणुबॉम्बच्या धमक्यांना आता सहन करणार नाही
पाकिस्तानानातले नुकसान एवढं मोठं की रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे वेगळे आहेत
दहशतवाद्यांना मदत कराल तर कारवाई होईल
पीएम मोदी -
ऑपरेशन सिंदूरच्या वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली
आज देशातील १४० कोटी नागरिक तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. देश एकतेची भावना बळकट करत आहे. हा सामूहिक कामगिरी आणि अभिमानाचा क्षण आहे. आज आपण तिरंग्याच्या रंगात रंगलो आहोत.
नागपूर -
- नागपूर शहर पोलीस दलातील चार अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर
- विशिष्ट सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवा पदक जाहीर
- नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना विशिष्ट सेवा पदक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना उल्लेखनीय सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे
- यासोबतच पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, महिला पोलीस शिपाई वैशाली कुकडे,लक्ष्मी गोखले,शीतल खडसे,शिला बडोले यांनाही विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे
पीएम मोदींनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण
सलग १२ व्यांदा पीएम मोदींनी केलं ध्वजारोहण
थोड्याच वेळात देशवासियांना संबोधित करणार
पीएम मोदी लाल किल्ल्यावर दाखल
सलग १२ व्यांदा करणार ध्वजारोहण
देशवासियांना संबोधित करणार
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर मोठी गर्दी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.