काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी एक्सवर पोस्ट करत धमकी आल्याची माहिती दिलीय.
राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली. बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याच्या आरोपाखाली वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे याला एप्रिल महिन्यात निलंबित करण्यात आले होते.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील दोन वर्षांपासून आंदोलन उपोषण करत आहे.आता पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले असून ते येणाऱ्या 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे. यासाठी जालना जिल्ह्यातील गावागावात मराठा समाजाच्या बैठका होत असून मुंबईला जाण्याची तयारी सध्या मराठा समाज करत आहे.
वांद्रेकडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी
अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान वाहनाच्या लांबच लांब रांगा
25 मिनिटाच्या अंतरासाठी लागतोय साधारणपणे एक तास
डबेवाल्यांना 25 लाख 20 हजारांत 500 चौरस फुटांचं घर मिळणार आहे.
नाशिकच्या मालेगाव शहरासह परिसरात संध्याकाळच्या सुमारास 1 तास पावसाने हजेरी लावली,गेल्या काही दिवसांपासून मालेगावचे तापमान 30 ते 33 अंशावर पोहचले होते त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत होत्या,मात्र आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला तर तापमानामुळे कोमेजून जात असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
मतचोरी विरोधात पुण्यात काँग्रेसचा मशाल मोर्चा काढण्यात आलाय.
उद्या साजरा होत असलेल्या स्वतंत्र दिवसाचा जल्लोष आज पासूनच सर्वत्र साजरा करण्यास सुरुवात झाली असून नाशिकच्या मालेगाव शहरात नाशिक ग्रामीण पोलीस दला तर्फे व्यसनमुक्त अभियान तसेच जनाधिकार मंच व राष्ट्रभक्त नागरिकां तर्फे 2100 फूट ध्वजाची तिरंगा रॅली काढण्यात आली,रामसेतू पूल ते मोसमपुलावरील शिवतीर्थ स्मारक पर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात येऊन तेथे राष्ट्रगीत होऊन रॅली समाप्त करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिलाय. तसेच मतदार यादीत वगळण्यात आलेल्यांची नावे संकेतस्थळावर शेअर करा, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
भोसरीतील छावा चौकातील उड्डाणपुलावर टेम्पो उलटला. या अपघातात टेम्पोतील लोखंडी जॉब खाली जात असलेल्या दुचाकीस्वारावर पडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. २०२४ मधील खरीप हंगामातील २ लाख ४४ हजार २६२ एवढे शेतकरी आजही पिक विमा पासून वंचित आहेत. तसेच हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीचे आणि मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटीमुळे झालेल्या जमिनीच्या व पिकांच्या नुकसानीची कोणतीच मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. जी मिळाली अत्यल्प आहे.. शेतकरी प्रचंड संकटात असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. वारंवार शासनाकडे मागणी करूनही मदत मिळत नाही, पिक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता आम्ही मेल्यावर देता का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला.
आम्ही नियमबाह्य नाही, २५ वर्षे आम्ही सेवा दिली तेव्हा झोपले होते का ?
आंदोलकांनी विचारला सरकारला जाब
आदिवासी कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तब्येत खालावली.
आदिवासी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करतांना आंदोलक महिलेची तब्येत बिघडली.
आंदोलक महिलेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार
यवतमाळच्या पुसद ताुक्यातील इसापूर रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली असून हा रस्ता नागरिकांसाठी त्रासदायक ठरला आहे. 1 कोटी 80 लाख रु खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता पाच महिन्यापूर्वीच तयार करण्यात आला मात्र दुसऱ्याच पावसात रस्ता वाहून गेला. रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबर हाताने निघत आहे. या बाबत गावकऱ्यांनी तक्रार दिली मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. नव्याने रस्ता करून देण्यात यावा आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.
- बिऱ्हाड आंदोलक पुन्हा आक्रमक
- आदिवासी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
- पोलिसांनी आंदोलकांना रोखलं
- पोलिसांचा मोठा बंदोबस्त आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या परिसरात तैनात
- सरकारविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
- नारायणगाव पुणे एसटी बस मधे तुंबळ हाणामारी
- हाणामारीचे घटना कॅमेरात कैद
- एसटी बस मध्ये गर्दी असल्याने जागेच्या वादातून हाणामारी
- MH १४ BT ३१६६ या एसटी बस मधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
इम्तियाज जलील यांच्याकडून उद्या दुपारी १ वाजता चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टीचे आयोजन
महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना सोशल मीडियावरून चिकन बिर्याणी आणि मटन कुरमा खाण्यासाठी निमंत्रण
मुख्यमंत्र्यांना टॅग करीत, मुख्यमंत्री ही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी उपरोधक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.
मतदारयादीतील घोटाळा चंद्रपूर जिल्ह्यातही समोर आला आहे. घुग्गुस या गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद सापडली आहे. मुळात या घरी केवळ दोन मतदार आहेत. घुग्गुस हे ग्रामपंचायत असलेले औद्योगिक गाव आहे. याच गावात सचिन बांदुरकर यांचे 350 क्रमांकाचे घर आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल 119 जणांची नोंदणी झाली आहे. या मतदारांचा घर क्रमांक हा 350 आहे. एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जिजामाता हॉस्टेल गैर प्रकारसंदर्भात ऑल इंडिया पँथरसेना धुळ्यात आक्रमक झाल्याच्या बघावयास मिळाले आहे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी दीपक केदार यांनी पीडित मुलीची दवाखान्यात जाऊन भेट घेतली आहे, आणि त्यानंतर या प्रकरणाला 48 तास उलटून देखील अद्यापही आरोपी महिलेवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्यामुळे, संपूर्ण राज्यभर जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी पॅंथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे, तसेच पीडित मुलीला भरपाई मिळवून देण्यात यावी आणि सदर हॉस्टेलची मान्यता रद्द करण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे,
छत्रपती संभाजीनगर उपमुख्यमंत्री अजित पवार संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आहे. त्यानंतर रात्री ते बीडला मुक्कामाला जाणार आहेत.
जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जालना शहरात एका सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जालना शहरामध्ये खळबळ उडालीय.नवीन जालना भागात एका 7 वर्षाच्या बालिकेवर तिच्याच 14 वर्षीय सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
अनिलकुमार पवार यांच्यास नगररचना उपसंचालक (निलंबित) वाय एस रेड्डी आणि
नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता तसेच बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता यांना सहा दिवसांची ईडी कोठडी
दहा दिवसांच्या कोठडीची होती ईडी ची मागणी
वसई-विरारमधील ४१ अनधिकृत इमारतींच्या बांधकामातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक
याप्रकरणातील आरोपींच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींच घबाड करण्यात आलं आहे जप्त
अनिलकुमार पवार हे शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या अतंर्गत वादातून कारवाई झाल्याचा गंभीर आरोप अनिलकुमार पवार यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर शहरात 21 वर्षीय तरुण सुलेमान खान याची अत्यंत अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर आज पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंच व मास मूव्हमेंट संघटनेचे वतीने आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांकडून राज्य सरकार आणि गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी. सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा व्हावी याकरिता हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार ने जर तात्काळ या आरोपींना अटक केली नाही तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयावर घेराव घालू असा इशारा यावेळी देण्यात आला.
वसई विरार केसमधील आरोपींना २० तारखेपर्यंत ईडी कोठडी.
माजी आयुक्त अनिलकुमार पवार, सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता आणि वाय एस रेड्डी या चारही जणांना २० तारखेपर्यंत ईडी कोठडी.
कोठडीत असताना आवश्यक औषधे देण्यास परवानगी
पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच आंदोलन
कैरी ऑन संदर्भात विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात आंदोलन केले होते
तरीही अद्याप विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दाखल घेतली नाही
म्हणून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत
कुलगुरू यांच्या विरोधात घोषणाबाजी
वॉइस ऑफ देवेंद्र या स्पर्धेसाठी परिपत्रक काढायला विद्यापीठाला वेळ आहे मात्र कैरी ऑन साठी वेळ नाही असा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे
* आदिवासी आंदोलन पुन्हा आक्रमक
* खाजगी निर्णयाची केली होळी
* आदिवासी कार्यालयात जाण्यावर आंदोलक ठाम
* पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची
- राज्यसरकारची प्रतिकात्मक तिरडी काढली
इचलकरंजीत बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद
कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
2 लाख 24 हजार 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त
बनावट नोटांसह एकूण 2 लाख 94 हजार 900 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना केली अटक
100 रुपयांच्या 282 बनावट नोटा आणि 500 रुपयांच्या 392 बनावट नोटा जप्त
इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाची कारवाई
नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.
यास्तव १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपासून ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत 'आय-सरीता' प्रणाली अंतर्गत दस्त नोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.
संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे उदयराज चव्हाण यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस उपयुक्त ऋषिकेश रावले यांनी आज पाहणी दौरा केला. यावेळी कसबा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये जाऊन या तिघांनी पाहणी केली. नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या आणि सूचना यावेळी तिघांनी समजून घेतल्या आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आलं. शहरातील विविध ठिकाणची पाहणी करण्यासाठी या तिन्ही जणांनी स्वतःची गाडी न वापरता थेट रिक्षा निवडली. भाजप आमदार हेमंत रासने तसेच पालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले यांनी यावेळी रिक्षातून प्रवास करत नागरिकांशी संवाद साधला.
वनतारा माधुरी हत्तीणीबाबतची सुनावणी आज होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ती २५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूरमध्ये सुरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. घाडगे पाटील यांना मारून झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते.छावा संघटनेने सुरज चव्हाण यांची राष्ट्रवादी मधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. परंतु सुरज चव्हाण यांची हकालपट्टी न करता राष्ट्रवादीने चव्हाण यांना सरचिटणीस पद देऊन त्यांचा प्रमोशन केल्याने छावा संघटना आक्रमक झाली आहे. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर छावा संघटनेने आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुनील तटकरे,अजित पवार, सुरज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्यभरात फिरू देणार नसल्याचा इशाराच यावेळी छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात छावा संघटना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाशिम इथ शाश्वत शेती दिनाच्या कार्यक्रमात जेवणावरून वाशिम कृषी विभागातील आत्माच्या संचालिका अनिसा महाबळे या महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर अरेरावी करत शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता.या घटनेचा व्हिडिओ समोर आल्या नंतर या घटनेने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त व्यक्त होत होता. त्यानंतर आता कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असल्यास कारवाई करू असे आश्वासन दिले.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात पोहचले...
डिग्रस गावात बुवाजी बाबा यात्रा निमीत्ताने संजय राऊत दर्शनाला पोहचले...
संत बुवाजी बाबा हजारो भाविकांचे आराध्य...
आज गावात यात्रोत्सव असल्याने मोठा उत्साह...
शिवसेना नेते संजय राऊत आणी काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे गावात आगमन...
गावक-यांकडून दोघांचे मोठ्या उत्साहात स्वागत...
गल्ली पासून दिल्ली पर्यंत डोलाने फडकवला जाणाऱ्या तिरंगा झेंड्याची निर्मिती नांदेड येथे केली जाते.1993 पासून नांदेड येथे खादी ग्राम उद्योग केंद्र उभारण्यात आले आहे. ग्राम पंचायत कार्यालय ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून फडकवला जाणारा हा तिरंगा नांदेड येथील खादी ग्राम उद्योग केंद्रातून पुरवला जातो. तिरंगा ध्वजाच्या निर्मिती मधून कोट्यवधी रुपयाची उलाढाल देखील या केंद्रातून केली जाते.नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्रात आजपर्यंत 12 हजारांहून अधिक विविध आकाराचे राष्ट्रध्वज तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथे तयार होणारा तिरंगा थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावरही फडकतो हे नांदेडकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.यंदाच्या वर्षी एकूण 1 कोटी 60 लाख रुपयांहून अधिक किमतीचे राष्ट्रध्वज शिवून तयार करण्यात आले आहेत. भारतात चारच ठिकाणी ध्वज निर्मिती केली जाते.राष्ट्रध्वज तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत काटेकोर असून ती शासनमान्य नियमांनुसार होते.नांदेडच्या मातीतून तयार होणारा हा तिरंगा देशभरात, विशेषतः दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डोलाने फडकतो ही बाब नांदेडकरांसाठी अभिमानास्पद आहे.
आज पालघर येथे मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला . 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चाले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता . या गोळीबारात पालघर मधील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येेेथील काशिनाथ हरी पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्या दिवसापासून 14 ऑगस्ट हा पालघर मध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या दिवशी पालघर मधील बाजारपेठा कडकडीत बंद पाळून पाच बत्ती येथे श्रद्धांजली वाहिण्यात आली .
नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांनी अंमली पदार्थ मोहीम राबविण्यास सुरवात केली असून त्यानुसार येवला तालुका पोलिसांनी मोहीम सुरू केली असता गुप्त माहिती च्या आधारे येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील ऐका वस्तीवर मोठ्या प्रमाणात गांजा आल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा मारत प्लास्टिक गोणीत पॅकिंग केलेला 4 लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली तर दोघे मात्र फरार झाले आहे,पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सरसकट ‘कॅरी ऑन’ मान्य न करण्याचा निर्णय घेतला असून, सर्व विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी सांगितले. “सर्व विद्यार्थी पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे पुढील एका तासात विशेष संधीचा जीआर काढण्यात येईल,” अशी माहिती देसाई यांनी दिली. मात्र, जोपर्यंत अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यंत विद्यापीठाच्या गेटसमोर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव च्या तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महाल येथील नर-मादी धबधबे आज दुपारी सुरू झाले आहेत.यामुळे पर्यटकांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यातील विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.कमी उंचीवरील मादी धबधबा यापुर्वी ३० मे रोजी प्रवाहित झाला होता. मात्र नंतरच्या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे तब्बल अडीच महिन्यानंतर दोन्ही धबधबे सुरू झाले. गुरूवारी रात्री दमदार पाऊस झाल्यामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून वाहून बोरी नदीमार्गे किल्ल्यातील धबदधब्यातून वाहू लागले आहे.यामुळे पर्यटकांना नयनरम्य धबधबे पाहण्याचा आनंद घेता येत आहे.
आज बीडीडी इमारतीच्या चाव्या वाटप करण्यात आले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांना भाषणाची संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वरुण सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- नाराजीचा विषय नाही आदित्य ठाकरे यांनी यासाठी खूप प्रयत्न केले होते
- नवीन सरकार निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री स्वतः बोलले होते विरोधकांचा मान राखणार
- तरी देखील असे होते नाही
- गेल्या अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता
- आदित्य ठाकरे यांनी याचा पाठपुरावा करून काम करून घेतला
- चांगल्या कंत्राटदाराला सांगून काम करून घेतले
- आज प्रकल्प पूर्ण होऊन चावी वाटप करण्यात येत आहे
- स्थानिक लोकप्रतिनिधी असतात त्यांना अजून काही सांगायचे असेल
- ते देखील एक सिस्टीमचे भाग असतात पण त्यांना आज भाषणाची संधी दिली नाही
- माझ्या देखील मतदारसंघात दोन पुलाचे उद्घाटन होणार आहे
- पत्रिकेत माझं साधं नाव देखील छापण्यात आले नाही
- मी गेल्या तीन महिन्यापासून याकामासाठी पाठपुरावा करत आहे
- सभागृहात या कामासाठी मी मुद्दा मांडला होता
- पूल तयार होऊन देखील मंत्र्यांचे वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटन थांबवला
- आगामी महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे आम्हीच काम केले आणि क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे
- आम्ही विरोधक आहे म्हणून आम्हाला डावलण्यात येत आहे
- मी असतो तर अजून काही मुद्दे मांडले असते
- वाहूतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे यावर देखील उपाययोजना केले पाहिजे
जामनेर तालुक्यातील बेटावद येथील युवकाच्या खुनानंतर पोलिस व नगर परिषद प्रशासनाने शहरातील आठ कॅफेवर संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, शहरातील कॅफे सेंटरमध्ये अश्लील प्रकार होत असल्याचा आरोप होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक वाद
60 गणपती मंडळ सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार
विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून वाद निर्माण होणार
आम्ही सगळे एकत्रित आलो आहे
वर्षानुवर्षे होणारी खदखद
लक्ष्मी रोड काही मंडळ ताब्यात घेते
त्यामुळे आमची मंडळ नाराज आहेत
या मंडळाची अरेरावी होते
यावर्षी आम्ही निर्णय घेतली आहे की आम्ही 60 गणपती मंडळ सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणुका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असं गणेश भोकरे यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून जालना जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. जालना शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जालना शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा रॅली निघालीचे उद्घाटन जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते करण्यात आलं तर समारोप जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं..
34 गणेश मंडळ लक्ष्मी रोडवर विसर्जन मिरवणुकीला सकाळी सात वाजता सहभागी होणार
गणेश मंडळांना ज्या सकाळी विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायचे त्यांनी संपर्क करावा गणेश मंडळाकडून संपर्क नंबर जाहीर
पुणे पोलीस आयुक्त मानाचे गणपती आणि सगळ्या गणेश मंडळाच्या बैठकीनंतर सुद्धा विसर्जन मिरवणुकीचा वाद चिघळला
श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर दिनांक 11 आणि 12 ऑगस्ट रोजी दोन दिवस पुरातत्व विभागाच्या वतीने संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतर काल दिवसभर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने गर्भगृह तसेच मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे. आज सकाळपासून पुन्हा सर्व भाविकांसाठी आई अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडके आणि जिल्हा परिषदेचे सीईओ के. कार्तिकीयन यांनी आईच दर्शन घेतलं. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगांवकर यांनी.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ द्यावा, धान खरेदीची लिमिट वाढवावी या मागण्यांना घेऊन भंडाऱ्याचे शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार होते. आज एक ट्रॅव्हल्स भरून भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेकडो शेतकरी नागपूरच्या दिशेनं रवाना होत असताना दिघोरी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं. त्यांना दिघोरी पोलीस ठाण्यात आणलं असता या संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातचं आता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दिघोरीचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्यांना घेऊन उपोषणावर ठाम आहेत. चक्क पोलीस ठाण्यातचं आता आमरण उपोषण सुरू केल्यानं पोलिसांसमोर आता पेच निर्माण झाला आहे.
भुयारी अंडरपास मध्ये वरपर्यंत साचले पावसाचे पाणी...
अंडरपास मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांचा मार्ग बंद
तर अनेक विद्यार्थी शाळेविना परतले घरी
कालरात्री अनेक नागरिकांच्या दुचाकी या रेल्वेच्या अंडरपासचा पुलाखाली पावसाच्या पाण्यात पडल्या...
स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊनही अजून पर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नाही
नाशिकच्या मनमाड जवळील घाट माथ्यावर असलेल्या माळेगाव कार्यात,नारायणगाव,घडगेवाडी या परिसरात उभ्या असलेल्या मका पिकावर रानडुकरे कळपाने शेतात घुसून पिकांचे नुकसान करत असल्याच्या घटना घडत असून नारायणगाव येथील देविदास उगले-पाटील यांच्या मक्याच्या शेतात रात्रीच्या सुमारास रानडुकरांच्या कळपाने नासधूस केल्याने त्यांचे नुकसान झाले असून वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करून नुकसान भारपाईची मागणी केलीय
ठाण्यातील शुभ निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन...
सिंधुदुर्ग भागात रुग्णांच्या सेवेकरिता धावणार या रुग्णवाहिका..
रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सप्लाय, गँनोस्टिक टूल्स व इतर सोयी सुविधा रुग्णवाहिकांमध्ये उपलब्ध..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यात १६ तारीख पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात काल दुपारपासून काही भागात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळीही सुद्धा पावसाची रिपरिप कायम होती. आजही सकाळपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मागील २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी
68 मिमी पाऊस झाला आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 127 मिमी पाऊस कोसळला. सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची रीपरीप सुरूच आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरात मागील चार ते पाच दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामातील तुर,मूग,उडीद,सोयाबीन,कांदा आणि भाजीपाला यांचे अमाप नुकसान झालेले आहे.
एवढा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ही प्रशासनाकडून याची दखल घेतली नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
- नागपूरच्या सक्करदरा चौकात सामूहिक वंदे मातरम गाण्याचा कार्यक्रमात शेकडो शालेय विद्यार्थी एकाच सुरात वंदे मातरमच गायन केलं...
- यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिग्दर्शन अभिनेता शरद पोंक्षे सुद्धा यावेळी उपस्थित होते...
- राष्ट्र निर्माण समितीच्या वतीने सामूहिक वंदे मातरम गायनाचे आयोजन करण्यात आले होते..
- एवढी वंदे मातरम गायनाच्या व्यतिरिक्त शाळेत त स्पर्धा घेण्यात आलेल्या त्यामध्ये उत्कृष्ट गायन करणारा शाळांचा गौरवही करण्यात आलाय..
- रात्रभर पाऊस झाल्यानंतर पहाटे पावसा घेतोय उसंत
- सलग सुरु असलेल्या पावसामुळे नदी,नाले,तलाव,ओढे ओसंडून वाहू लागले आहेत.
- उत्तर सोलापुरातील हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर शहरातील ओढा देखील ओव्हरफ्लो
- सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरात पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशभरात सुरू आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नांदेडच्या विष्णुपुरी धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आली.
तिरंगा ध्वज साकारण्यात आलेल्या या विद्युत रोषणाईचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपले आहे.
धरणावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरत आहे
राज्याचे कृषीमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे १४ व १५ ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समिती व जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीला ते अध्यक्षस्थान भूषवतील. सायंकाळी ५ वाजता नगारा भवन येथे पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेतील. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करतील.
गेली 15 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत यावा आणि कोकण
वासियांचा प्रवास सुखकर, विनाअपघात व्हावा यासाठी पेणमधील चैतन्य पाटील या तरुणाने रस्ता सत्याग्रह सुरू केला आहे.
तो महामार्गावर पळस्पे ते सिंधुदुर्गातील झाराप असा सुमारे 500 किलो मिटरचा पायी पाहणी दौरा त्याने सुरु केला आहे.
आपल्या पदयात्रेत चैतन्य महामार्गावरील प्रवासात येणारे अडथळे, कामातील त्रुटी, त्यांचा होणारा त्रास, अपघाताची ठिकाणे, त्याची कारणे याचा अभ्यास करून छायाचित्रांसह सविस्तर अहवाल संबंधित यंत्रणांना सादर करणार आहे.
मागील काही वर्षांपासून चैतन्य याच विषयावर काम करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवतो आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आज लातूर येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ते लातूर येथे विमानाने येणार आहे, दरम्यान अचानक मंत्री प्रताप सरनाईक हे जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्यामुळे , नेमकं या भेटी दरम्यान कोणती चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे.राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून घोषित करण्यात आल्याने, उत्सव अधिक भव्य व उत्साहात साजरा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पाहणी करणार
आमदार हेमंत रासने,नवल किशोर राम आयुक्त याच्यासोबत अधिकारी पदाधिकारी उपस्थितीत..
मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर फिरताना बिबट्या कॅमेरात कैद . स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीच वातावरण . मागील अनेक महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याचं वारंवार समोर येत असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली. बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश . बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी . बिबट्याच्या वावरामुळे पर्यटनावर देखील परिणाम
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.
दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर आणि परिसर उजळून निघाला आहे.
मंदिरावरील शिखर, मंदिरातील सभा मंडपासह विविध ठिकाणी तिरंग्यामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाई पाहण्यासाठी शहरातील नागरिक गर्दी करत आहेत.
पुणे -
पुण्यात गणेशोत्सव तयारीचा आढावा पाहणी
येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे.राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून घोषित करण्यात आल्याने, उत्सव अधिक भव्य व उत्साहात साजरा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पाहणी करणार
आमदार हेमंत रासने, नवल किशोर राम आयुक्त याच्यासोबत अधिकारी पदाधिकारी उपस्थितीत..
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्याल आज यलो अलर्टचा इशारा
रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी
कालपासून पावसाची बँटींग रत्नागिरीत सुरुच
सलग दुस-यादिवशीही पावसाची रिपरीप रत्नागिरीत
आज दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
अमरावती -
अमली पदार्थाविरोधात अमरावती शहर पोलीस ॲक्शन मोडवर
अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थविरोधात जनजागृती साठी सायकल रॅली
सायकल रॅलीमध्ये अमरावती शहरातील पोलिसासह अनेक नागरिक सहभागी
अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावरून या सायकल रॅलीला सुरुवात
शहराच्या मुख्य चौकातून जाणार अमली पदार्थ विरोधात काढलेली सायकलची रॅली
सायकल रॅलीच्या माध्यमातून सांगितले जात आहे अमली पदार्थांनी होणारे शरीरावर दुष्परिणाम
पुणे -
पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई
पुण्यातील कोंढवा आणि बिबवेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेचा हातोडा
पुणे महानगरपालिके कडून अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथक
परवानगी नसतानाही बांधण्यात आलेल्या इमारतींवर महापालिकेकडून कारवाई
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.