Maharashtra Live News Update साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Maharashtra Live News : साताऱ्यात मुबलक पेट्रोल-डीझेल, अफवांवर विश्वास ठेवू नका - देसाई

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे अपडेट्स, नरहरी झिरवाळ अडचणीत, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, सातारा राडा प्रकरण, एकनाथ शिंदे, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Raigad ZP : रायगड जिल्हा परिषदेचा पावणे दोनशे कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर

रायगड जिल्हा परिषदेचा 2026 - 27 या वर्षासाठीचा पावणे दोनशे कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर

रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सादर केला अर्थसंकल्प

गतवर्षीपेक्षा 90 कोटींचा वाढीव आणि 10 लाख 90 हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प

Satara Petrol Update : साताऱ्यात मुबलक पेट्रोल-डीझेल, अफवांवर विश्वास ठेवू नका - देसाई

साताऱ्यात पुरेसा इंधनसाठा असल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सातारा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा आहे. कुठेही टंचाईची परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी पंपांवर गर्दी करून 'पॅनिक' स्थिती निर्माण करू नये, असे आवाहनही त्यांनी केलं.

Hingoli News : हिंगोलीत अवकाळी पावसाला सुरुवात; औंढा, कळमनुरीला झोडपलं

हिंगोलीत अवकाळी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील औंढा शहरात व कळमनुरी तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत गेलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.

Sangli Rain :  सांगलीच्या तासगाव, मिरज तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं

सांगलीच्या तासगाव आणि मिरज तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

मिरज उत्तरेकडील परिसर आणि तासगावच्या मनेराजुरी परिसरामध्ये जोरदार पाऊस

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष बागांना मोठा फटका

Beed Protest : रामनवमीच्या मिरवणुकीला परवानगी न मिळाल्यानं राम भक्तांचं आंदोलन

रामनवमीच्या मिरवणुकीला परवानगी न मिळाल्याने बीडमध्ये राम भक्तांचे ठिय्या आंदोलन

सिरसाळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी

नागरिकांनी आमदार महेश लांडगे, संग्राम जगताप यांच्याकडे मांडली व्यथा

एलपीजी तुटवड्यामुळे ठाणे जिल्ह्यात केरोसीनचे वितरण,  प्रति कुटुंब ३ लिटरचा कोटा निश्चित

सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या १२ मार्च २०२६ च्या आदेशानुसार, एलपीजीला तात्पुरता पर्याय म्हणून केरोसीनचे (घासलेट) वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ३७ लक्ष ४४ हजार लिटर (३ हजार ७४४ KL) केरोसीनचा साठा मंजूर करण्यात आला असून, त्यातील ४८,००० लिटरचा (४८ KL) वाटा ठाणे जिल्ह्याला मिळाला आहे.

Mumbai Fire : मुंबईमध्ये भीषण आग, ८ बंब दाखल

मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातील महाकाली केव्ह्ज रोडवर असलेल्या 'नंद भवन इंडस्ट्रियल इस्टेट' या औद्योगिक इमारतीला भीषण आग लागली. जी+२ इमारतीच्या तळमजल्यासह पहिल्या मजल्यावर आगीने रौद्र रूप धारण केले आहे. या घटनेमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ८ बंब आणि अनेक विशेष वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.

Pune Crime : रहाटनी परिसरात टोळक्याने एका तरुणाला केली फ्री स्टाईल हाणामारी

पिंपरी चिंचवड शहरातील रहाटनी परिसरात एका टोळक्याने एका तरुणाला लाथा बुक्याने जोरदार फ्री स्टाईल हाणामारी केली आहे. रहाटणी परिसरातील राज रतन डेंटल क्लिनिक समोर टोळक्याने एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी आणि दगडाने जोरदार फ्री स्टाईल हाणामारी केली.

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वळीव पावसाला सुरुवात

कोल्हापूर शहरात वीजेच्या तारांना स्पार्क झाल्याने इमारतीच्या गच्चीवरील पाल्याला आग

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Kalyan News :  कल्याण कर्णिक रोड परिसरात गाडीच्या बॅटरी चोरांचा सुळसुळाट, बॅटरी चोरीची घटना cctv कॅमेऱ्यात कैद

कल्याण शहरातील कर्णिक रोड परिसरात गाडींच्या बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरात या भागात उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असूनही चोरटे अद्याप फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्णिक रोड परिसरातील निवासी इमारतींच्या बाहेर पार्क केलेल्या वाहनांना चोरट्यांनी लक्ष्य केले. रात्रीच्या सुमारास येऊन काही मिनिटांतच गाडीची बॅटरी काढून ते पसार होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. या चोरट्यांचा पद्धतशीर आणि सराईतपणा पाहता ते व्यावसायिक टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये मोठी नाराजी असून, गाड्या घरासमोर सुरक्षित नाहीत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

जुन्नर-आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिक यांना ५० हजार रुपयांची लाच प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयात कारवाई करण्यात आलीय प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिकाला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन लाच कुठल्या कारणासाठी स्विकारली याबाबत अद्याप स्पष्ट नसुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे

ऋषी वैद्य वर जादूटोणा कायद्याचे कलम लावा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

  • ऋषी वैद्य वर जादूटोणा कायद्याचे कलम लावा..

  • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

  • पुण्यात मांजरी पोलीस स्टेशनला दिले पत्र

  • ऋषी वैद्यने स्वतः महादेवाचा अवतार आहे असं सांगून महिलेवर अत्याचार केले आहेत..

  • लोकाची फसवणूक करणे,अवतारी बाबा आहे असे सांगून महिलांचे शोषण करणे हे जादूटोणा अंतर्गत कायद्यानुसार गुन्हा आहे

धाराशिव जिल्हापरिषदच्या चुरशीच्या सभापती पदाच्या लढतीत महायुतीचा विजय

धाराशिव जिल्हा परिषद सभापती निवडीत मोठ्या खबरदारीत मतदान पार पडले. साताऱ्यातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर तैनात करण्यात आले होते. भाजपचे नेते मल्हार पाटील यांनी दगाफटका टाळण्यासाठी ही व्यवस्था केली. पुणे व सोलापूरहून बाऊन्सर मागवण्यात आले होते. चुरशीच्या लढतीत महायुतीने बाजी मारत चारही सभापती पदांवर विजय मिळवला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदांचे वाटप करण्यात आले.

अहिल्यानगर महापालिका सभेत गोंधळ; श्रीपाद छिंदम यांना बाहेर काढले

अहिल्यानगर महापालिकेच्या बजेट बैठकीत मोठा गोंधळ उडाला. श्रीपाद चिंदम प्रश्न मांडत असताना नगरसेवक आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला. “शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही” अशी भूमिका घेत अखेर संतप्त नगरसेवकांनी छिंदम यांना सभागृहाबाहेर काढले. या घटनेमुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हमीभावासाठी बच्चू कडूंचा एल्गार; ९ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा

अमरावतीत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. कर्जमुक्ती मोहिमेला काही प्रमाणात यश मिळाल्याचे सांगत, आता हमीभावासाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “जय श्रीराम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम” अशी घोषणा देत शेतमालाला योग्य दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. ९ ऑगस्ट रोजी शिवराज सिंग चव्हाण यांच्या मध्यप्रदेशातील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

चाकणकर-केसरकरांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी व्हावी - सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी चाकणकर आणि दिपक केसरकर यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच चाकणकर MIDCच्या अध्यक्ष होत्या का, असा सवालही त्यांनी केला. २०१२ मध्ये अशोक खरात याला बंदुकीचा परवाना कोणी दिला, याबाबतही त्यांनी स्पष्टता मागितली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाला भीषण आग

  • पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाला भीषण आग

  • आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोण

  • पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ठिकाणी आग लागल्याने मोठा धूर

  • आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

Pune: रामनवमीची मिरवणूक पाहायला गेलेल्या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

मिरवणूक पाहायला गेलेल्या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

श्रीराम जन्मोत्सवाची डीजेच्या तालावरील मिरवणूक पाहायला गेलेल्या एका महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

रंजना रवींद्र जाधव (वय ६५, रा. लेन नंबर १२, ससाणेनगर) असे या महिलेचे नाव असून ससाणेनगर येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पातळी ओलांडून सुरू असलेल्या डीजेच्या अति आवाजामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप संबंधीत महिलेच्या मुलाने केला आहे.

ससाणेनगर येथील मुख्य रस्त्यावर काल सहा मंडळांनी राम जन्मोत्सव सोहळा मिरवणुकीचे आयोजन केले होते.

मिरवणुकीसाठी ध्वनीवर्धक म्हणून डीजेचा वापर करण्यात आला होता.

लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार-देवेंद्र फडणवीस

राज्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा, लॉकडाउन होणार नाही. लॉकडाउन होणार अशा अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

Khed: खेड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा

उन्हाचा तीव्र कडाका सुरू असतानाच वातावरणात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला आणि दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सध्या कांदा आणि गहू काढणीचा हंगाम सुरू असताना या अनपेक्षित पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आपला माल वाचवण्यासाठी शेतात धाव घेत आहेत

Weather Update: महाराष्ट्रात ३० मार्चनंतर वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीट, पुणे वेधशाळेने दिला इशारा

अकोल्यात ४१ अंश तापमान तर परभणी मध्ये ४० अंशापर्यंत तापमान पोहचलं. सध्या उष्णतेची लाट नाही मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये ३० मार्च नंतर पुढील २ दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग, मराठवाडा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काढणीला आलेला आंबा यासह सगळे पिकं आणि फळं शेतकऱ्यांनी काढून घ्या आणि जी पिकं लावली आहे त्यांची काळजी घ्या असे आवाहन वेधशाळेने केलं आहे.

Ashok Kharat: अशोक खरातच्या संस्थांना मंत्री रावल यांनी दिलेल्या निधीवरून गोटे यांनी साधला निशाणा

राज्याचे मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भोंदू बाबा अशोक खरातच्या संस्थेला मंत्री जयकुमार रावल 2018 मध्ये पर्यटनमंत्री असताना कोट्यावधी रुपये निधी दिल्याच्या कारणावरून माजी आमदार तथा ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे यांनी चांगलाच निशाणा साधला आहे, कोणत्या आधारावर मंत्री रावल यांनी हा निधी दिला आणि अशा किती भोंदू बाबांच्या संस्थांना मंत्री रावल यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात निधी दिला आहे याचा खुलासा करण्यात यावा, त्याचबरोबर भोंदू बाबा अशोक खरात यांनी बनवलेले तीर्थ मंत्री रावल यांनी देखील घेतले आहे का याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे,

Pandharpur: पंढरपुरात चैत्री यात्रेची तयारी पूर्ण

येत्या रविवारी चैत्री एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. दर्शन रांगेसाठी मंदिर समितीच्या वतीने दहा पत्राशेड तयार करण्यात आले आहेत. उन्हापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी दर्शन रांगेत पंखे,कुलरची सोय केली आहे. भाविकांसाठी थंड पाणी लिंबू सरबत ही देण्यात येणार आहे. दर्शन रांगेत सुरक्षा आणि वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी’ मिनी टॉय ट्रेन पुन्हा बंद, पर्यटकांचा हिरमोड

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड

इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याने सेवा तीन दिवसांपासून तात्पुरती बंद

वनराणीची सफर करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना परत जावे लागत असल्याने नाराजी

शुक्रवारपासून सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता –

6 जानेवारी 2026 पासून पुन्हा पर्यटकांसाठी सुरू

14 मार्च रोजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन

आता डिझेलऐवजी बॅटरीवर धावणारी वनराणी

जानेवारीपासून आतापर्यंत 40 ते 50 हजार पर्यटकांनी घेतला वनराणीचा आनंद 1974 पासून राष्ट्रीय उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणून वनराणीची ओळख

Vasai: ऋषिकेश वैद्य याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे विविध पथक रवाना

ऋषिकेश वैद्य याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे विविध पथकं रवाना

गुन्हे शाखेचे पथकं तसेच स्थानिक पोलिस ठाण्याच्या वतीने पथकं घेत आहे वैद्य चा शोध

वैद्य विरोधात काही तक्रार असल्यास पोलिसांकडे या, पुणे पोलिसांचे आवाहन

पिढीत महिलेला "मी महादेवाचा अवतार आहे," असं सांगून तिच्यावर अत्याचार केले आहेत

पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे

Amravati : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; रक्तदान करून सुरू केलं आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; रक्तदान करून बच्चू कडू यांनी सुरू केलं आंदोलन

बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी नेत्यांची हजेरी.

शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांच्या बच्चू कडू यांच्या कडून सत्कार.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी पुन्हा आक्रमक झाले आहे.

Pune : पुण्यातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, डिसेंबर मध्ये होणार भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामना

पुण्यातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी

डिसेंबर मध्ये होणारा भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामना पुण्यात होणार

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेचा तिसरा टी २० सामना पुण्यात

पुण्यातील MCA च्या मैदानावर रंगणार सामना

Vasai : वसईतील स्वघोषित भोंदू बाबावर गुन्हा दाखल

वसईतील स्वंघोषित भोंदू बाबा ऋषिकेष वैद्य याच्यावर माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मात्र गुन्हा दाखल होताच भोंदूबाबाने वसईतून पळ काढला आहे.

वसईतील लॉजमध्ये या बाबाने महिलेवर अत्याचार केला होता

India Locdown : देशात लोकडाऊन लागणार नाही, केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलं

Buldhana : ग्रामीण भागात इंधनाचा तुटवडा तीव्र

ग्रामीण भागात इंधनाचा तुटवडा तीव्र...

डिझेल-पेट्रोलसाठी हाहाकार, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा!..

डिझेलच्या टंचाईमुळे शाळेच्या बसही रांगेत

Thane : ठाण्यात गोळीबाराची घटना; दोघांना अटक

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात गोळीबार

अंतर्गत वादातून दुचाकी वरून आलेल्या दोन व्यक्तींनी एकावर गोळी झाडली

या प्रकरणी दोघांना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर पेट्रोल पंप काही वेळापुरता बंद ठेवण्यात आला आहे.

Hingoli : प्रशासनाने पेट्रोल डिझेल वरती लावलेले निर्बंध मागे घेतले

प्रशासनाने पेट्रोल डिझेल वरती लावलेले निर्बंध मागे घेतले

परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे 24 तासानंतर पुन्हा आदेश

हिंगोलीत इंधन परिस्थिती पूर्वपदावर आली

Wardha : पेट्रोलचे दर ५ रुपयांनी वाढले

- नायरा कंपनीने वाढविले पेट्रोल आणी डिजलचे दर

- पेट्रोल पाच रुपयाने वाढविले तर डिजल तीन रुपयांनी वाढविले

- युद्धचा फटका आता डिजल पेट्रोलवर

- एकीकडे पुरेसा साठा नाहीय तर दुसरीकडे दर वाढीचा फटका

Pune: शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे आज नाशिक दौऱ्यावर

पुणे -

शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे आज नाशिक दौऱ्यावर

आज दुपारी एक वाजता नाशिक पोलीस अधीक्षक यांची घेणार भेट

त्यानंतर सुषमा अंधारे घेणार SIT प्रमुख यांची भेट

अशोक खरात प्रकरणी सुषमा अंधारे काय नवीन खुलासा करणार याकडे लक्ष

Solapur: अवकाळी पावसाने मोहोळ तालुक्याला झोडापलं ; कोण्हेरी भागातील पीक झाली आडवी

सोलापूर -

अवकाळी पावसाने पुन्हा एकदा मोहोळ तालुक्याला झोडापलं ; कोण्हेरी भागातील पीक झाली आडवी

हवामान खात्याने वार्तावलेल्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झाला अवकाळी पाऊस

या अवकाळी पावसाने कोण्हेरी गावातील मका पीक आडवी झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

भर उन्हाळ्यात जनावरांसाठी खाद्य म्हणून शेतकऱ्याने पिकावलेलं मका अवकाळीमुळे मातीमोल झालाय..

Buldhana: पेट्रोल पंपावर चक्क पाण्याची टाकी घेऊन पोहचला ग्राहक

बुलडाणा -

पेट्रोल पंपावर चक्क पाण्याची टाकी घेऊन पोहचला ग्राहक.

पंप कर्मचाऱ्याने सुद्धा दिली डिझेल ने टाकी भरून ..

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांच्या ऐशीतैशी .

इंधन टंचाईच्या अफवांमुळे पंपावर प्लास्टिक डब्बे घेऊन ग्राहकांची गर्दी ..

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षा चालक आक्रमक

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षा चालक आक्रमक

गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालकांनी जालना महामार्ग केला बंद

दोन दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालक आक्रमक

गॅस चालकांनी आक्रमक होत रास्ता रोको सुरू केला

चिखलठाणा येथील जालना महामार्ग बंद केला

Pune: सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे घेणार नाशिक पोलिस अधीक्षकांची भेट

पुणे -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे पाटील आणि संगीता तिवारी

नाशिकला पोलीस अधीक्षक आणि एसआयटी प्रमुखांना भेटणार आहेत..

Buldhana: जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी

बुलडाणा -

जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी.

चांदीच्या भावातील चढउतारामुळे गुंतवणूकदारांची चांदी खरेदीकडे पाठ.

... तर व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे चार दिवसांपासून चांदीची दागिने बनवणारे कारखाने ठप्प.

Nashik: भोंदू अशोक खरात आता ED, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर

नाशिक -

- भोंदू अशोक खरात आता ED, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर

- कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे ED कडे पाठवण्याची तयारी

- विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार

- २१ देशांतील दौऱ्यांचा खर्च, फॉरेक्स अँगल तपासात

- तुर्कस्थानसह विदेशातून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का? चौकशी सुरू

Nashik: अशोक खरातची करण्यात आली एचआयव्ही टेस्ट

नाशिक -

- अशोक खरात झाली एचआयव्ही टेस्ट

- नाशिक पोलिसांनी केली एचआयव्ही टेस्ट

- भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात करत होता महिलांवर अत्याचार

- अशोक खरात याची एचआयव्ही टेस्ट आली निगेटिव्ह

- पोलिस कोठडीत करण्यात आली टेस्ट

Nashik: भोंदूबाबा खरातचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

नाशिक -

- सातपूर पोलिस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

- ‘सिडको आणि सातपूर वॉलमन’ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट

- खरात प्रकरणातील एकूण ८ अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे उघड

- पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याप्रकरणी गुन्हा

- इतर ॲडमिन्सनीही व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केल्याचा आरोप

- सिद्धार्थ रामोशेसह रमीज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे, साहिल सय्यद यांचा समावेश

Jalna: जालन्यातील पीरकल्याण गावात रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमाला मनोज जरांगे यांची हजेरी

जालना -

जालन्यातील पीरकल्याण गावात रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमाला मनोज जरांगे यांची हजेरी

मराठ्यांच्या वेदना जाणून घ्यायला विखेंना वेळ नाही, मराठा उपस्थिती बरखास्त करा मनोज जरांगेंची मागणी..

साधे अधिकारी विखे पाटलांना वेड्यात काढायला लागले, गॅझेटनुसार किती अर्ज आले व्हॅलिडीटी किती झाल्या हे पण सांगता येत नाही.

मराठ्यांचा रोष विखे पाटलांनी अंगावर घेऊ नये मनोज जरांगेंचा इशारा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या पाटलांची मंत्रिपदावर वर्णी लागणार?

ठाकरे गटात फूट; महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून नेत्यांमध्ये मतभेद

LPG Gas: LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

लव्ह जिहादची स्पर्धा, मित्रानेच फोडलं बिंग, अमरावतीतील लैंगिक शोषणात विकृतीची परिसीमा

महाराष्ट्रात 'अघोरी' नंगानाच, मोबाईलमुळे भोंदूच्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT