केडीएमसीत सत्ता हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना
कल्याण–डोंबिवली महापालिकेतील भाजपचे ५० निवडून आलेले नगरसेवक करणार एकत्र प्रवास
डोंबिवलीतील जिमखाना परिसरातून कोकण भवनाकडे करणार कूच
महापालिकेत अधिकृत गट स्थापन गट अध्यक्ष पदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती
महापौर महायुतीचा असणार इतर पदासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेचे नेते एकत्र बसून चर्चा करणार
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि गटनेते शशिकांत कांबळे यांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिघे हे राजकीय गुरू असून शिंदे व असंख्य शिवसैनिक आज दिघेंना अभिवादन करण्याकरिता शक्तिस्थळावर येणार आहेत..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे व असंख्य UBT मधील कार्यकर्ते देखील आज दिघेंना अभिवादन करण्याकरिता त्यांच्या ठाण्यातील शक्ती स्थळावर येणार आहेत..
त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे..
दिघेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या ठाणे येथील शक्तिस्थळावर मोठ्या प्रमाणात फुलांची आरस करण्यात आली असून भजन स्पर्धा ठेवण्यात आली आहे...
आनंद दिघे यांची जुनी आरमाडा चार चाकी वाहन देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना व नागरिकांना पाहण्याकरिता प्रमुख आकर्षण म्हणून ठेवण्यात आले आहे..
वसंत मोरे यांनी पुणे कोर्टात याचिका केली दाखल
निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नाही
निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल
सगळ्यांनी संगनमत करून मशीन बदलल्या आहेत आणि आकडेवारी मध्ये तफावत आहे
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वसंत मोरे यांची याचिका दाखल
मुंबई हाय कोर्ट ऐवजी केली पुणे कोर्टात याचिका दाखल
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धुरळा पाहायला मिळणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सभा..
एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवस सोलापूर शहरात असणार मुक्कामी..
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाची अनेक तालुक्यात वेगवेगळ्या आघाड्या..
बार्शी आणि माढा तालुक्यातील शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे पक्षांमध्ये आघाडी केल्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे..
एकनाथ शिंदे उद्या सोलापुरात असणार मुक्कामी..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्ष लागून राहिलेल्या पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदेची शिवसेना व ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांमध्ये थेट लढत होत असून दोन्ही पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत व शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा सचिव असलेले दादा साईल यांच्यात एकासएक लढत होत असून या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे शिवसेनेकडून पावशी मतदारसंघात डोअर टू डोअर प्रचारावर भर देण्यात आला असून शिंदेच्या शिवसेनेकडून खळा बैठकांवर जोर देण्यात आला आहे. गेल्या जिल्हा परिषदेत याठीकाणी ठाकरे शिवसेनेचे अमरसेन सावंत विजयी झाले होते. यावेळी मात्र शिवसेना फुटीनंतर दोन शिवसेनेतच लढत होत असून दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी विजयाचा चंग बांधला आहे.
जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील शेलगाव गावाजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ट्रॅव्हल्सच्या टायरचे घर्षण झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये 27 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पुण्यावरून खाजगी बस यवतमाळच्या दिशेने जात असतानी ही घटना घडली आहे. दरम्यान अग्निशामक दलाने दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली होती...
रब्बी हंगामात कमी खर्चात पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या चिया पिकाकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल मोठ्याप्रमाणात वाढला आहे. नव्या हंगामातील चिया पिकाची वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक सुरू झाली असून चियाला कमाल २१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत.हा दर दिलासा देणारा असून शेतकरी समाधानी आहेत.. सध्या मर्यादित प्रमाणात आवक होत असली तरी येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे..
पोटाची खळगी भरण्यासाठी शेत शिवारात काम शोधत भटकंती करणाऱ्या वनमजुरांनी झोपडी मध्ये लख्ख प्रकाश आणि मोबाईल मध्ये चार्जिंग करण्यासाठी भन्नाट जुगाड केले आहे, हिंगोली तालुक्यातील ईसापुर रमण्याच्या जंगलात या मजुरांनी सोलार प्लेटच्या मदतीने झोपडी मध्ये प्रकाशाची व्यवस्था केली आहे, दिवसभर पोट भरण्यासाठी कष्ट करून आल्यानंतर रात्र झोपडी मधील अंधारात काढणाऱ्या या मजुरांनी जुगाड केल्याने आता मात्र त्यांना प्रकाश मिळू लागला आहे.
कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक इंटरप्राईजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईपस व इतर सामान जळून खाक झाले. दुकानाला लागलेली आग एवढी मोठी होती की, लोखंडी पाईप्स, अँगल पूर्णतः वाकून गेले. तर या आगीत टाटा कंपनीच्या डीआय वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील दारापूर व खेलनागवे परिसरात सन फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शासकीय निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप दारापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जमील पटेल यांनी केला आहे. संबंधित कामे ठेकेदार विलास बननोटे यांनी केली असून,या कामांचा दर्जा अत्यंत निष्कृष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत.
- नाशिकहून निघालेलं आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ थोड्याच वेळात घाटनदेवीहून मुंबईकडे कूच करणार
- रात्री घाटनदेवी परिसरात कडाक्याच्या थंडीत आदिवासी शेतकऱ्यांचा मुक्काम
- सध्या आदिवासी आंदोलकांची चहा, नाश्ता बनवण्याची लगबग
- नाश्ता झाल्यावर आदिवासी आंदोलक थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणार
दहावी- बारावीची परीक्षा उंबरड्यावर आली आहे.या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून यंदा दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियान राबवले जाते यंदाही हे अभियान राबवले जाणार आहे.सध्या सरावा तसेच प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहे.लेखी परीक्षेसाठी मोजके दिवस शिल्लक असल्याने शिक्षकांकडून परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
नगर पालिकेप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील रायगड जिल्ह्यात महायुती होण्याची शक्यता मावळली आहे. आणि याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुनील तटकरे यांनीच केलं आहे कारण त्यांना शिवसेना आणि भाजपची जी पारंपारिक युती आहे ती होऊ द्यायची नव्हती, असा गंभीर आरोप आमदार दळवी यांनी केलाय.
कर्जत येथील भाजपचे युवा पदाधिकारी सागर शेळके यांनी अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फायदा होणार आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का आहे अनेक पदाधिकाऱ्यांनी युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार गटांमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय
भाजपच्या सर्व नगरसेवकांची उपस्थितीत बैठक
पुणे महानगरपालिकेत गटनेता ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक
पुण्यात भाजपच्या 119 नगरसेवकांचा झाला विजय
निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत स्थानिक नेते घेणार बैठक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.