मुंबई -गोवा महामार्गावर दुचाकीसह कारला भीषण आग
मुंबई गोवा महामार्गावर महाड येथे कॅनमध्ये पेट्रोल घेऊन जाणाऱ्या एका दुचाकीला अचानक आग लागली.
या आगीच्या झळा शेजारी उभ्या असलेल्या वॅगनर कारला लागल्या आणि कारने देखील पेट घेतला.
बचाव पथकाने दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीत दोन्ही वाहनांच मोठे नुकसान झाले
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अलीकडील उपाययोजनांमुळे भारतीय रुपयाला बळकटी मिळण्याची शक्यता असल्याचा दावा एसबीआयच्या अहवालात करण्यात आला आहे. या उपायांमुळे भारतात 55 ते 65 अब्ज अमेरिकी डॉलर्सची परकीय गुंतवणूक येऊ शकते. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 92 च्या पातळीवर स्थिर राहण्यास मदत होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. परकीय भांडवलाचा ओघ वाढल्यास चलनबाजारातही सकारात्मक परिणाम दिसू शकतात.
विरारच्या नारंगी बायपास उड्डाणपुलावर होंडा सिटी आणि एर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला. विरार पूर्वेकडून पश्चिमेकडे भरधाव वेगाने जात असलेल्या होंडा सिटी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुसऱ्या लेनमध्ये जाऊन एर्टिगा कारला धडकले. आज सायंकाळी घडलेल्या या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील 2 हजार 94.39 हेक्टर शासकीय जमीन पीएमआरडीएकडे विनामूल्य हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला जिल्हा परिषदेने विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर हवेली, मुळशी, दौंड, भोर, मावळ, पुरंदर, शिरूर आणि खेड तालुक्यांतील ग्रामसभांमध्ये विरोधाचे ठराव मंजूर करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गायरान आणि सार्वजनिक वापराच्या जमिनी हस्तांतरणातून वगळाव्यात, अशी मागणी करण्यात येत असून शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चंदन उटी पूजेची आज भक्तिभावात सांगता करण्यात आली. उन्हाळ्यात विठ्ठल-रुक्मिणीला उष्णतेपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने गुढीपाडवा ते मृग नक्षत्रापर्यंत ही पारंपरिक पूजा केली जाते. मृग नक्षत्र सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे पूजेची सांगता करण्यात आली. यंदा या पूजेसाठी सुमारे 94 किलो चंदनाचा वापर करण्यात आला असून, विठ्ठल मंदिर समितीला 14 लाख 64 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
अहिल्यानगरमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत.
वर्ध्यातील पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत पावसाची हजेरी
मेघगर्जनेसह पावसाची हजेरी
दिवसभर ढगाळ वातावरण जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी
रत्नागिरीला दोन दिवस यलो अलर्टचा इशारा
निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांच्या विक्रीबाबत साम टीव्हीने वृत्त प्रसारित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक शिर्डीत दाखल झाले. प्रसाद विक्री करणाऱ्या अनेक दुकानांची कसून तपासणी करत पेढ्यांचे नमुने जप्त करण्यात आले.
माजी आमदार विप्लव बाजोरिया यांना सर्वोच्च न्यायालयात देखील दिलासा नाही
विप्लव बाजोरिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रतिज्ञा पत्रावरील त्रुटी च्या आरोपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने विप्लव बाजोरिया यांचा अर्ज केला होता रद्द
नागपूर खंडपीठाने सुद्धा यावर अंतरिम दिलासा देण्यास नकार देत 17 जूनला सुनामी ठेवली होती त्यानंतर बाजोरीया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायालयाने वाघमारेचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला आहे. वाघमारे व्यायसायाने शैक्षणिक समुपदेशक आहेत, तसेच त्यांच्या बँकेतील ३.५ लाख रुपयांचा एक व्यवहार हा एका गिफ्टचा भाग होता, असा वाघमारे यांच्या वकिलांचा युक्तिवाद केला. वाघमारे यांनी तिन्ही विषयांचे पेपर फोडून त्यातून पैसे कमावले असल्याचा आरोप सीबीआयने कायम ठेवत, जामीन देऊ नये अशी न्यायालयाला विनंती केली.
विठ्ठल ढेबे हे आपली जनावरे चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेले होते..यावेळी गाई चरत असताना शेजारील विजेच्या खांबावरील तार अचानक तुटून गाईच्या अंगावर पडली. गाईला वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या विठ्ठल ढेबे यांनाही विजेचा जोरदार शॉक बसला. या दुर्घटनेत शेतकरी आणि गाय दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषिमंत्री स्वतः इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतानाही येथील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने १० जून २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता आंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे येथे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या निवासस्थानावर शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रीबाबत प्राप्त तक्रारीची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विक्रेत्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आला असून परवानाधारकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीअंती आवश्यक असल्यास परवाना रद्द करण्याची कारवाईही करण्यात येणार आहे.
राज्यभरामध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग वेगवेगळ्या अन्न भेसळ करणाऱ्या आस्थापनाविरोधात कार्यवाही करत असताना आता मराठवाड्याच्या हिंगोली मध्ये देखील अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे ,अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बाळापुर परिसरात तीन ट्रक मधून दोन कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीची सुपारी जप्त केली आहे , अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये मानवी शरीराला घातक रंगमिश्रित आणि कीड लागलेली सुपारी या ट्रकमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल माध्यमांवर ती सध्या व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये थेट लक्ष्मण हाके मंत्री छगन भुजबळ यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करताना पाहायला मिळत असून छगन भुजबळ यांनी जे काही सांगितले मी ते ऐकलं अशा आशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मेहेकर पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीला तडे गेल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल घेत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मेहेकर दौऱ्यादरम्यान पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या स्थितीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली तसेच बांधकामातील त्रुटींची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
उल्हासनगर पवई चौक जिओ पेट्रोल पंप जवळ भर रस्त्यात दोन तरुणांना टोळीने केली मारहाण ,
जुन्या वादातून मारहाण केल्याची माहीती ,घटना CCTV मध्ये कैद ,सेंट्रल पोलीस ठाण्यात NC दाखल,
मारहाण करणारे टोळी खडेगोलवली मधील कथित "दही" गॅंग शी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती
आंदेकर टोळीतील ०८ महिन्यापासुन फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस लोखंडी कोयत्यासह पोलिसांनी घेतले ताब्यात
शहरातील सुर्यकांत उर्फ बंडु राणोजी आंदेकर,सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे यांचे टोळीतील सक्रिय/असक्रिय सदस्य आणखी गंभीर गुन्हे करण्याची शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मोहीम सुरू आहे
पिंपरी चिंचवड शहरातील तमारा सदनिकाधारकां नी बिल्डर विरोधात आंदोलन.
गेल्या दहा वर्षांपासून सोसायटीमध्ये सांगितलेल्या सुविधा देऊ करूनही न दिल्यामुळे पिंपरी चिंचवड मधील रहाटणी या ठिकाणी असलेल्या तमारा सोसायटी मधील सदनिका धारकांनी बिल्डर विरोधात रस्त्यावर उतरले आहे
गेल्या 21 दिवसापासून सदनिका धारक सोसायटीच्या गेटवर बिल्डर विरोधात आंदोलनाला बसले आहेत
ऑनलाइन खत वाटपाचा निर्णय ४८ तासात मागे घ्या
अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार
सरपंच मंगेश साबळे यांचा कृषी अधिकाऱ्यांना इशारा
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला असून, त्या अनुषंगाने शासन आदेश निर्गमित केला आहे. परंतु, सरसकट कर्जमाफीसाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला ठीकठिकाणी आंदोलने केली जात आहे. दरम्यान, बुलढाण्यातही जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील जयस्तंभ चौक येथे सरकार विरोधी निदर्शने करत, कर्जमाफी संदर्भातील शासन आदेशाची होळी केली. सरकारने दिलेला शब्द पाळून जाचक अटी रद्द कराव्यात आणि सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांनी केले. आंदोलनात अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.
मोटार वाहन विभागातील रखडलेली पदोन्नती, सेवा प्रवेश नियम तसेच आर्थिक लाभांच्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने आज एकदिवसीय संप पुकारला आहे.
आंदोलनाची दखल न घेतल्यास 16 जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा मशीद, मंदिरांसह अकरा अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आलीत. महापालिकेने मध्यरात्री पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन ही कारवाई केली. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष झाल्याची ही चर्चा आहे. आता तसा व्हिडीओ ही समोर आलाय.
कॉकरोच जनता पार्टी ने पुण्यात होणाऱ्या आंदोलनासाठी मागितली परवानगी
सी जे पी च्या स्थानिक कार्यकर्त्याने काल पोलिसांकडे मागितली आंदोलनासाठी परवानगी
पुण्यातील चतुशृंगी पोलिस ठाण्यात कार्यकर्त्याने दिले पत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनाबाबत पोलिसांना केला अर्ज
पुण्यात येत्या गुरुवारी होणार कॉकरोच जनता पार्टीच आंदोलन
अवघ्या सहा महिन्यांत ६४ हजार ३१० वाहनांवर दंडात्मक कारवाई
सर्वाधिक कारवाई विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर
पुणे आरटीओकडे ८ इंटरसेप्टर वाहने कार्यरत
इंटरसेप्टर वाहनांच्या छतावर अत्याधुनिक ‘रडार’ यंत्रणा
१ डिसेंबर २०२५ पासून ‘रडार’द्वारे कारवाईला सुरुवात
१ डिसेंबर २०२५ ते ८ जून २०२६ या कालावधीत मोठी मोहीम
- आज सकाळी नागपूरच्या पारडी पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत भंडारा-नागपूर महामार्गावरील जोगेंद्रसिंग ढाब्यासमोर 150 किलो 520 ग्रॅम गांजा जप्त केला.
- या कारवाईत गांजा, ट्रक, स्टील कॉईल आणि मोबाईल असा एकूण 1.49 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात ओडिशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
जिल्हा कारागृहात एका कैद्याने ऑन-ड्यूटी पोलिस रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली. बाहेर थांबण्याची वेळ संपल्याने बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याच्या रागातून या कैद्याने रक्षकाची कॉलर पकडून त्यांना बेदम मारहाण केली.
पुणे शहरातील पूर्व भागात होणारी पाणीपुरवठा दुर्गंधीयुक्त, पिवळसर असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. शिवाय या भागातील पाणीपुरवठा अनियमित असल्याच्याही तक्रारी महापालिकेकडे दिल्या आहेत.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाविरोधात लोकप्रतिनिधींनी घेतलेली आंदोलनाची भूमिका घेतली होती.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल गावात ढगफुटी सदृश्य पाऊस
मुसळधार पावसामुळे संपूर्ण रस्ते झाले जन्मये
रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहिल्याने अनेक वाहने गेली वाहून
वाहन वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड
फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे मेथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारू प्यायल्याने झालेल्या नागरिकांच्या मृत्यूनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांविरुद्ध मोठी धडक मोहीम राबवली आहे. २९ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत विभागाने तब्बल १४२ गुन्हे दाखल करून ११६ आरोपींना अटक केली आहे.
जालना शहरात मागच्या काही दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून त्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंबर कसली, जालना शहरालगत असलेल्या चंदनझिरा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून दोन लाख 25 हजारांच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून समोर आलेल्या वर्धा नदीत पाच युवक बुडाल्याची माहिती समोर येत आहे. घुग्गुस येथील इंदिरा नगर परिसरातील पाच युवक पोहण्यासाठी चांदूर गावाजवळील वर्धा नदीकाठी गेले होते.
मात्र ते घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. नदीकाठी कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने ते बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या शोध मोहीमेदरम्यान बचाव पथकाला एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
पाथर्डी तालुक्यातील अकोला गावचा ग्रामपंचायत अधिकाऱ्याला गावातील तरुण बबन गर्जे याने माहिती मागितली असता ग्रामपंचायत अधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने तरुणाला चक्क चपलेने मारहाण केल्याचे व्हिडिओमधे दिसत आहे. तसंच लेखी अर्ज सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी फाडून टाकल्याचा आरोप तरुणाने केलाय
माननीय अजितदादा पवार हयात असते, तर पुण्यातील जलसंपदा विभागाची मुख्य कार्यालये कोल्हापूर-सोलापूरला हलवण्याची हिम्मत कोणाचीही झाली नसती. अजित पवारांच्या पश्चात पुण्याचे प्रशासकीय महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहेत. ही पवार कुटुंबाच्या ओसरत्या राजकीय प्रभावाची नांदी आहे का असा प्रश्न आप ने उपस्थित करत पुण्यातील सिंचन भवनच्या स्थलांतराला विरोध केला आहे. कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा न करता प्रशासकीय पातळीवर परस्पर निर्णय काढून पुण्यातील महत्त्वाचे प्रशासकीय मुख्यालय पळवले जात आहे असा आरोप आप ने केलाय. हा निर्णय तात्काळ रद्द करून पुण्यातील जलसंपदा मुख्य अभियंता कार्यालये जशीच्या तशी पुण्यात कायम ठेवा अशी मागणी आता पुढे आली आहे.
पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथील ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाची पार्टी एका चित्रपटाच्या धर्तीवर नियोजित केल्याचा संशय व्यक्त होतोय. पार्टीच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर वापरलेले पोस्टर हे २०१२ मधील वादग्रस्त ‘प्रोजेक्ट एक्स’ चित्रपटाशी साधर्म्य असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पार्टीही त्या चित्रपटाच्या धर्तीवर आयोजित केली होती का असा सवाल उपस्थित झाला आहे.
‘प्रोजेक्ट एक्स’ या नावाचा वादग्रस्त चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाल. चित्रपटात वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, हुक्का, मोठ्या आवाजातील संगीत आणि नियंत्रणाबाहेर गेलेला धिंगाणा दाखवला आहे. पुण्यात झालेल्या पार्टीचे नाव, त्याचे प्रमोशन व शेवटच्या क्षणी जाहीर केलेले लोकेशन यामुळे या चित्रपटाशी तुलना केली जातेय.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या या आघाडीने सर्व १४ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.
दहा वर्षांनंतर झालेल्या या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर सोमवारी जाहीर करण्यात आला. निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या नेतृत्वाखालील ‘चित्रकर्मी’ पॅनेल आणि अपक्ष आघाडी असे तीन पॅनेल रिंगणात होते. महामंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ‘समर्थ’ पॅनेलच्या उमेदवारांनी सर्व १४ जागांवर विजय मिळवत ही लढाई एकतर्फी जिंकली.
पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन
गुरुवारी दुपारी चार वाजता आंदोलन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करणारा आंदोलन
अभिजीत दिपके यांनी ट्विट करून दिली माहिती
सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय व आयुर्वेदिक सुपर मार्टवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
- ४४ हजार ७८१ रुपयांचा औषधांचा साठा जप्त
- औषधांच्या लेबलवर कायद्याचे उल्लंघन करणारे दावे व मजकूर आढळल्याने कारवाई
- महिला आश्रम परिसरातील प्रतिष्ठानात तपासणी
- प्राथमिक चौकशीत जप्त औषधे दिव्य फार्मसी व पतंजली आयुर्वेद प्रा. लि. यांच्या उत्पादनांची असल्याचे निष्पन्न
- औषध व जादूटोणा विरोधी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा संशय
- प्रतिष्ठानाचे मालक संदीप पनपालिया, तर व्यवस्थापक सुमित साहू कारवाईवेळी उपस्थित
- अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू
- सहाय्यक आयुक्त निरंजन लोहकरे व औषध निरीक्षक नालंदा उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
- प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू; अहवालानंतर पुढील निर्णय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.