मनमाड येथील नगरपालिका निवडणुकीला अवघा एक दिवसाचा प्रचार राहिला असून त्यानिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांनी बुधलवाडी परिसरात चौक सभा चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाडला एमआयडीसी मंजूर असून येत्या काही दिवसातच मनमाडच्या तरुणी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे मनमाडला स्वच्छ मनमाड सुंदर मनमाड करण्यासाठी संकल्प असून शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून द्यावे अशी मागणी यावेळेस केली, याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यादेखील उपस्थित होत्या.
बदलापुरात तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी मशाल चिन्ह घेऊन भाजपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झालीय. तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांविरोधात ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केलाय.
बदलापुरात तिसऱ्या आघाडीने महाविकास आघाडीत प्रवेश करत आपले उमेदवार जाहीर केले होते. या उमेदवारांना चिन्ह नसल्यामुळे त्यांनी ठाकरे गटाकडे मशाल चिन्हाची मागणी केली होती. मात्र तिसऱ्या आघाडीच्या पाच उमेदवारांनी अचानकपणे भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. कविता सकट ,वैभव सदाफुले, मंगेश इंगळे, रुपेश साळवी ,प्रफुल कांबळे, असे हे पाच उमेदवार आहेत. त्यामुळे बदलापुरात ठाकरे गटाबाबत संभ्रम निर्माण झालाय. मात्र मशालचिन्ह घेणारे हे उमेदवार ठाकरे गटाचे नसून ते तिसऱ्या आघाडीचे आहेत आणि त्यांनी आमचा विश्वासघात केल्याचा आरोप ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांनी या उमेदवारांना शिवसेना स्टाईल उत्तर देण्याचा इशारा दिलाय.
- हिराववाडीतील रहिवासी असलेले तेजस व्यास आपल्या कारमध्ये ओझरहून आडगाव नाक्याकडे येत असताना कारला लागली अचानक आग
- प्रसंगावधान राखत कारचालक वेळीच बाहेर पडल्याने जिवितहानी टळली
- घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून विझवली आग
- बर्निंग कारच्या थरारमुळे काही काळ निर्माण झाली होती वाहतूक कोंडी
- कारला लागलेल्या आधीच कारण अस्पष्ट, मात्र आहोत संपूर्ण कार जळून खाक
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्वाती राजेश पाठक,शिवसेना ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोटकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कल्पना मारोटकर व काँग्रेसच्या विना जाधव यांच्यात चौरंगी लढत आहे.मात्र भारतीय जनता पक्षाने नांदगाव खंडेश्वर ची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनवली असून या ठिकाणी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्वच मोठे नेते ठाण मांडून बसलेले आहेत.भाजप आमदार प्रताप अडसड,तुषार भारतीय,प्रशांत शेगोकार, माजी मंत्री प्रवीण पोटे हे नेते स्वाती पाठक या निवडून यावा यासाठी सूक्ष्म प्लॅनिंग करत असून नांदगाव खंडेश्वर मध्ये ठाण मांडून बसलेले आहेत..
जालन्यातील अंबड ,परतुर आणि भोकरदन येथील नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता संपणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तिन्ही शहरांमध्ये प्रचाराच्या जोरदार फेरी सुरू असून रात्री प्रचाराचा तोफा थंडावणार आहे.निवडणूक जाहीर झाली तेव्हा 30 नोव्हेंबर रोजी प्रचार थांबणार होता मात्र निवडणूक आयोगाने एक दिवसाची मुदत दिल्याने एक दिवसाचा अधिक प्रचार उमेदवारांना करता येतोय. तिन्ही नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे.घरोघरी जाऊन उमेदवारांसह स्थानिक आमदार नागरिकांच्या भेटी गाठी घेत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्याप्रमाणेच पैठण, गंगापूर आणि वैजापूर या नगर परिषदेमध्ये काही वार्डातील निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली. निवडणूक निर्णय तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. सायंकाळपर्यंत आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नव्हत्या. त्यामुळे वरिष्ठांकडून काही अभिप्रायासह विचारणा केल्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्यानुसार काही निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यानुसारच फुलंब्रीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ४ तारखेला नव्याने फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. वैजापूर नगर परिषदेत नगर परिषदेच्या २ जागांसाठीची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली. प्रभाग क्र. १, १ अ आणि २ ब या जागांची निवडणूक स्थगित झाली. गंगापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील जागा क्रमांक 'ब' व प्रभाग क्रमांक ४ मधील जागा क्रमांक 'ब' येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे २ डिसेंबरला या दोन्ही प्रभागांत फक्त अध्यक्ष पदासाठी आणि जागा क्रमांक 'अ' साठीच मतदान होणार आहे. पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधील २ नगरसेवकांच्या जागा, प्रभाग क्रमांक ३ मधील १ जागा, तर प्रभाग क्र. ११ मधील १ अशा चार नगरसेवकांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.
नगर पालिकेप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक देखील रायगड जिल्ह्यात महायुती म्हणून लढली जाण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी यापूर्वी वारंवार राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी वक्तव्य केली होती याची तटकरे यांनी आठवण करून दिली. त्याचवेळी भाजप बरोबर युती करून आगामी निवडणुका लढवण्याची राष्ट्रवादीची मानसिकता असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील एकूण 9 नगरपालिकांपैकी फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपरिषदांचा काही तांत्रिक कारणांमुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करून नव्याने जाहीर करण्यात आला आहे.उर्वरित 7 नगरपालिकांचे मतदान प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडत आहे आणि 3 डिसेंबरला याचा निकाल जाहीर होणार आहे.मात्र उर्वरित महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिका निवडणुकीचे मतदान हे 20 डिसेंबर मध्ये पार पडत असून याचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे... याबाबत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुक निकालाप्रमाणे 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारा निकाल आणि पुढे ढकललेल्या 2 नगरपालिकांचा एकत्र जाहीर करावा अशी मागणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोरमध्ये सभा तर एकनाथ शिंदे यांची चाकण आणि जुन्नर येथे सभा घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर,चाकण,आळंदी येथे सभा घेणार
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणार चुरशीच्या लढती होत आहेत
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच आता पुण्यात फडणवीस,शिंदे यांच्या सभा होत आहे.
मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यातील अनेक नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याबाबत नोटीस निवडणूक आयोग जाहीर करत आहे.मुळात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणे एवढी मोठी चूक निवडणूक आयोग कशी करू शकते..?
बरं ही चूक लक्षात आल्यानंतर तातडीने निवडणुक प्रक्रिया थांबवण्याची गरज होती पण सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आणि ऐन निवडणुकीच्या एक दिवस अगोदर निवडणुका स्थगित करणे हे व्यवहार्य आहे का.. ?
एखादा कार्यकर्ता आपल्या आयुष्याची जमा पुंजी लावून निवडणुक लढत असतो, समाजाचं चांगलं व्हावं या भावनेने निवडणूक लढत असताना त्याने आपले सर्वस्व पणाला लावलेलं असतं आणि अचानकपणे अशा पद्धतीने निवडणूक रद्द करणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्यायकारक आहे.
राज्य निवडणूक आयोगाचा देखील मोठ्या प्रमाणात खर्च निवडणूक नोटिफिकेशन निघाल्यानंतर निवडणूक होईपर्यंत होत असतो हा खर्च राज्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या पगारातून वसूल करण्यात का येऊ नये...? कारण ही सर्वस्वी आयोगाची चूक आहे याचा भुर्दंड करदात्यांच्या पैशावर का...?
दर वेळेला कोर्टाने तुम्हाला झापणे आवश्यक आहे का...? तुमच्या मतदार याद्यांमध्ये घोळ, तुमच्या आरक्षणात घोळ, निवडणूक प्रक्रियेत घोळ.तुम्ही स्वतःहून चांगले काम नाही करू शकत का...?
पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत देखील अशाच प्रकारच्या चुका, प्रभाग रचनेत आणि प्रभाग आरक्षण यामध्ये देखील चुका झालेल्या आहेत.वरवर 50% ची मर्यादा पाळल्याच दिसत असलं तरी जेव्हा प्रभागानुरूप आपण बघतो त्यावेळेस अशा प्रकारची मर्यादा पाळण्यात आलेली नाही.
राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी तातडीने या गोष्टीची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा आणि शासनाच्या निवडणूक प्रक्रियेचा झालेला सर्व खर्च त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा.
खून प्रकरणातील साक्षीदार हा या प्रकरणात सामील पोलिसांनी तिघांना अटक केली. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी आरोपीने साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे.
कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, सध्या रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत (वय ३५, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती. १७ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली होती
पुण्यात चौथ्या दिवशी 40 पेक्षा जास्त उड्डाणांना उशीर उत्तरेतील दाट धुके आणि एअरलाइन कडून विमानाची देखभाल दुरुस्तीचा विमानसेवेवर परिणाम
पुण्यातून कोलकत्ता दिल्ली नागपूर जयपूर अमृतसर बेंगलुरु या शहरातून येणाऱ्या जाणाऱ्या चाळीसहून अधिक विमानांना दीड ते दोन तास उशीर
विमानाला उशीर होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे
शनिवारपासून विमाना उड्डाणांना उशीर होत आहे मध्यरात्री 12 ते सकाळी सहा या दरम्यान येणाऱ्या विमानांना उशीर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.