दिग्वजीय पाटील यांची जवळपास 9 तास झाली चौकशी
बावधन पोलिसांनी दिग्विजय पाटील याचा जवाब नोंदवून केला जवळपास नऊ तास चौकशी
बावधन पोलीस उद्या पुन्हा दिग्वजीय पाटील याला पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्याची शक्यता
वनविभाग जो पर्यंत बिबट्या जेरबंद करणार नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही
जिल्हा परिषदेची शाळा गावातील जंगलाला लागून असल्याने धोका असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले
अमरावतीच्या खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भाजी बाजार परिसरात तरुणाचा खून...
शरीरावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून,हत्येचं कारण अस्पष्ट...
पवन वानखडे असं मृताच नावं..
खोलापुरी गेट पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल....
अधिकचा तपास सुरू
शेतशिवारातील कामे सोडून शेकडोंच्या संख्येने गावकरी शेकोट्या करून बसले
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा गावात ग्रामस्थ रात्र काढत आहेत जागून
वनविभागाने बिबटे बाहेर जिल्ह्यातून आणून सोडल्याचा गावकऱ्यांचा आरोप
महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता मिळवून भाजपचाच महापौर धुळे महानगरपालिके वरती बसवणार असा विश्वास व्यक्त केला आहे, मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे उदाहरण देत, ज्याप्रकारे दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेवरती बिनविरोध सत्ता मिळविली त्याच प्रकारे धुळे महानगरपालिकेवर देखील एक हाती सत्ता मिळवत धुळे महानगर पालिका काबीज करणार असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या वेवजी येथे मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट . ग्रामपंचायत सर्व कागदपत्र सादर करत असताना देखील प्रशासनाच दुर्लक्ष असल्याचा जाधव यांचा आरोप . महाराष्ट्राचा नकाशा घालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप. ग्रामपंचायत महाराष्ट्राची मात्र परवानगी गुजरात देते . महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार मग तोडगा का निघत नाही . अविनाश जाधव यांचा सवाल.
धुळ्यात माजी महापौर कल्पना महाले यांचा भाजपा प्रवेश
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी महापौर कल्पना महाले यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्ष प्रवेश
पुणे शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
बंडगार्डन पाणीपुरवठा विभागांतर्गत देखभाल आणि दुरुस्तीचे काम
पुणे शहरातील विविध भागात त्यामुळे येत्या गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
मुंबई उच्च न्यायालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला
प्रकाश सावंत नावाच्या इसमाने पेट्रोल ओतून स्वतःला घेतलं जळून
प्रकाश सावंत ५०-६० टक्के भाजल्याची माहिती
जीटी रुग्णालयात उपचार सुरू
वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून स्वतःला जाळून घेतल्याची माहिती
आझाद मैदान पोलिसांकडून तपास सुरू
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार. आमची लढत मैत्रीपूर्ण नसेल. आम्ही आमचे मुद्दे घेऊन निवडणूक लढणार असल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.
आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणूक कार्यक्रमाचं स्वागत केलंय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महापालिकेत तिन्ही पक्षांनी महायुती म्हणूनच लढावं, अशी अपेक्षा व्यक्त केलीय.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
विरोधकांच्या पागडी गुल होऊ लागल्या आहेत. कारण पागडी संदर्भात आम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्याची आज शक्यता वर्तवली जात असून या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग काय घोषणा करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
हिंगोलीत बिबट्यामुळे शेतकरी दहशतीत सापडले आहेत हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, पोतरा, तेलंगवाडी, या परिसरात बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला आहे, तर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दोन वेळा बिबटे कैद झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतशिवारात बिबट्यांचा दररोज वावर सुरू असल्याचं आता पुढे आल आहे, दरम्यान वन विभागाने केलेल्या निरीक्षणात नर मादी असलेले दोन बिबटे आणि दोन बछडे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट सज्ज झाला आहे, याच अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे अमरावती दौऱ्यावर आहेत, अमरावतीच्या शासकीय विश्राम भवनात निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक घेण्यात आली, महाविकास आघाडी म्हणूनचं ही निवडणूक लढवल्या जाईल अशी घोषणा देखील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अमरावतीत केली होती, अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणकोणत्या प्रभागांमध्ये पक्षाची ताकद आहे याचा आढावा घेण्यात आला,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
१४ फुटी अश्वरुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
६० वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन
ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेच्या तब्बल ३ हजार कोटींच्या ६० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकात पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ कार्यक्रमाला उपस्थितीत
पुण्यात गणेश कला क्रीडा येथे होतोय कार्यक्रम
ऊस उत्पादक शेतकऱ्याचे रस्ता रोको आंदोलन,
गंगाखेडच्या G7 आणि परभणीच्या अमडापूर येथील लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याने अद्यापही एफआरपी जाहीर केला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको
परभणी गंगाखेड महामार्गावरील खळीपाटी या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन
सांगली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेत्यांची बंद दार आड चर्चा
जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्यात गुप्त चर्चा
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांच्या मध्ये चर्चा सुरू असल्याची
महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित लढण्या बाबत चर्चा !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थितती लावल्यानंतर तिन्ही नेत्यां मध्ये झाली चर्चा.
धुळे शहरातील मोहाडी परिसरात 70 वर्षीय वृद्ध महिलेचा खून...
मोहाडी परिसरातील वाल्मीक वसाहतीत राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून...
घरातून दोन सिलेंडर सह वृद्धेच्या अंगावरील सोन लंपास झाल्याची प्राथमिक माहिती...
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस घटनास्थळी...
खुनाचे कारण अस्पष्ट...
या खळबळ जनक घटनेमुळे परिसरात उडाली खळबळ...
- कालिदास नाट्यगृहात ई भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 669 कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची प्रमुख उपस्थिती
- आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेचा कामांचा धडाका
- 227 कोटीचे अमृत 2 योजनेंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन
- 225 कोटी खर्च असलेले नाशिक म्युनिसिपल बाँड अंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था विकसित करणे
- 237 कोटींचे कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील प्रमुख 7 रस्त्यांचे विकासकामे
- रामकालपद निर्मिती प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या 63 रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिका वाटपाचे पत्र वितरण
पुणे -
पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अपडेट
शितल तेजवानीला आज न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता
शितल तेजवानीची येरवडा कारागृहात रवानगी होणार?
दुसऱ्या बाजूला आजच शितल तेजवानीच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता
त्यामुळे आज शितल तेजवानी ला जामीन मिळतो का न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं
पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुद्धा मागितला आहे तेजवानीचा ताबा
न्यायालयाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलं प्रोडक्शन वॉरंट सादर
पुणे -
जुन्नर पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्या मुलाचा मृत्यू
शेतमजूरचा मुलगा शेतालगत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला
बाबु नारायण कापरे वय ८ असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या मुलाचे नाव
बिबट्याच्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये दहशत अजुन किती बळी जाणार असा प्रश्न
पुणे -
दिग्विजय पाटील आज किंवा उद्या पुणे पोलिसांकडे जबाब नोंदवण्याची शक्यता
मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील आज किंवा उद्या पुणे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याच्या शक्यता
मुंढवा जमीन प्रकरणात अमेडिया कंपनीचा सहभाग असल्यामुळे दिग्विजय पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार
खडक पोलिस ठाण्यात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे
जबाब नोंदवण्यासाठी दिग्विजय पाटील यांनी पुणे पोलिसांकडे वेळ मागून घेतली होती
पुणे -
पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार
भाजपला पराजित करण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली
आज महाविकास आघाडीचे बैठक झाली .
महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर कोणीही एबी फॉर्म दिला जाणार नाही . जो कोणी बंडखोरी करेल त्याची बंडखोरी तिन्ही पक्ष एकत्र बसून थांबवतील
महाविकास आघाडीतील एकमेकांचे उमेदवार पळवायचे नाही
सांगली -
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे लोकार्पण सोहळा
सांगली शहरातील शिंदेमळा येथील लव्हली सर्कल येथे अहिल्यादेवी होळकर यांचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा अश्वारुढ पुतळा साकारण्यात आला आहे.
अहिल्यादेवी यांची त्रिजन्म शताब्दी साजरी होत असून यानिमित्ताने हा पुतळा उभारण्यात आला आहे.
मालेगाव -
- मालेगाव मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला
- मनमाड इंदोर रेल्वे मार्गांच्या अधिग्रहित केली जात असल्याने शेतकरी संतप्त..
- मनमाड - इंदोर रेल्वे मार्गांच्या अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध
- शासनाकडून मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
- रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या अधिग्रहण दर कमी लावण्यात आला असल्याने शेतकरी आक्रमक..
- शासनाने मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू केल्याचा शेतकरी संतप्त..
पुणे -
पुण्यातील ई-स्क्वेअर थिएटर जवळ वाहतूक कोंडी
या ठिकाणी रात्री एक खासगी बस मेट्रो स्टेशनच्या खांबाला धडकल्यामुळे झाला अपघात
अपघातामुळे या ठिकाणची एक लेन बंद ठेवण्यात आली असल्याची पोलिसांची माहिती
आज सोमवार आणि सकाळच्या सत्रात ऑफिस महाविद्यालयांना जाणारा नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन
औंध पिंपरी चिंचवड कडून येणाऱ्या नागरिकांनी खडकी अंडरपास द्वारे शिवाजीनगर च्या दिशेने प्रवास करावा, वाहतूक पोलिसांचे आवाहन
बाणेर कडून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या नागरिकांनी एबीला ऊस येथून डावीकडे वळून घेऊन रेंजल मार्गे पुढे जावे
पुणे -
पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा अपघात
पहाटे ४ वाजता स्वामीनारायण मंदिराच्या जवळ अपघात
ब्रेक फेल झाल्याने ट्रकला अपघात
कात्रज येथील बोगद्यातून बाहेर आल्यावर अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला
सुदैवाने यात इतर कुठल्याही वाहनांना धडक बसलेली नाही मात्र ट्रकचं मोठा नुकसान झालं
अपघातात ट्रक चालक झाला जखमी
पुण्यात आज महाविकास आघाडीची बैठक
युतीची चर्चा करण्यासाठी आज पहिली बैठक
कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांची बैठक
सगळे शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत
पुण्यासाठी प्रत्येक पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे
- इच्छुक असणाऱ्या विजय यादव यांनी गाईला चारा भरवत बैलगाडीतून उमेदवार अर्ज खरेदी करण्यासाठी भाजप कार्यालय गाठले
- भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री करण्यात आली
- यावेळी इच्छुक उमेदवार विजय यादव यांनी गाईला चारा भरवून बैलगाडीतून उमेदवारी आज खरेदी केला.
- या अनोख्या अर्ज खरेदीची चांगलीच चर्चा रंगलीय
अमरावती जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्याच्या कालावधीत तब्बल 22 हजार 661 नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला आहे, कुत्र्याने चावल्या नन्तर शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची ही आकडेवारी आता समोर आली आहे... यामध्ये एका नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद सुद्धा झाली आहे.जिल्ह्यात दररोज सरासरी 68 नागरिकांना कुत्र्याच्या चाव्याला बळी पळावे लागत आहे.अमरावती शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्याचा त्रास वाढत चालला आहे.शहरात अनेक चौकात, वस्तीसह आणि मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वारांचा पाठलाग करून कुत्रे चावत असल्याचा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे.
क्लासमध्येच मुलांवर चाकु हल्ला
क्लासमेट मुलानेच केला हल्ला
शिक्षक शिकवत असतानाच मुलाचा गळा चिरला
हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरुन फरार..
हल्ल्याचे कारण मात्र अस्पष्ट..
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल प्रकृती चिंताजनक
आता खाजगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय
राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल
गेल्या सहा महिन्यापासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे, 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापात निर्मित खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरात मागील काळात मासे आढळून आली त्यावर बरीच चर्चा झाली तसेच सरोवरात आत चारही बाजून असंख्य हेमांडपंथी मंदिरे आहेत .. त्यात कमळजा देवीचं मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे हे मंदिर कधीच पाण्याखाली गेले नाही मात्र यावेळे हे मंदिर 15 फुट पाण्यात गेले आहे.. त्यामुळे लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर पुन्हा चर्चेत आले आहे.. सरोवरातील पाण्याच्या पातळीत का वाढ होत आहे याचा अद्याप पर्यंत शोध लागला नाही विदेशातून असंख्य पर्यटक, शास्त्रज्ञ अभ्यासासाठी लोणार येथे येत असतात मात्र खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे का आढळत आहे व पाण्याच्या पातळीत का व कुठून वाढ होत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.. यावर संशोधन होने गरजेचे आहे याकडे संबधित पुरातत्व विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे....
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला असून आज 6.2°c तापमानाची नोंद करण्यात आली आहे, या वाढत्या थंडीचा परिणाम धुळेकर नागरिकांच्या जनजीवनावर देखील होताना दिसून येत असून, सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे, तर सकाळी थंडीमध्ये बाहेर पडलेले नागरिक गरम गरम चहाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत,
शिवसेनेतील सहकारी शिवसैनिकांना उद्देशून भावनिक पत्र लिहित तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पती अभिषेक घोसाळकर यांच्या निर्घृण हत्येनंतर आयुष्यात मोठे बदल झाले असून दोन लहान मुलांची जबाबदारी, जनतेचा विश्वास आणि सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
घोसाळकर कुटुंबावर आलेल्या दु:खद प्रसंगानंतर शिवसैनिकांनी दिलेल्या प्रेम, आधार आणि विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत केवळ पद किंवा पक्ष नव्हे, तर मनापासून साथ देणाऱ्या ताकदीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुळशी परिसरात कुंपणाच्या तारेत अडकलेल्या बिबट्याला वन विभाग व RESQ चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त पथकाने सुरक्षितपणे वाचवले.
बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होत RESQ चे वन्यजीव पशुवैद्य डॉ. सात्विक पाठक यांनी बिबट्याला सुरक्षितरीत्या बेशुद्ध करून पिंजऱ्यात ठेवले.
त्यानंतर बिबट्याला बावधन येथील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले.
सध्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
सकाळपासूनच पुणेकरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरातील किमान तापमान ९.४°C ते १०°C च्या दरम्यान नोंदवले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण शहरात गारठा पसरला आहे.
- मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं, हिवाळी अधिवेशन संपताच निवडणूक हालचालींना वेग.
- ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेमुळे रखडलेल्या निवडणुका आता मार्गी लागण्याची चिन्हे...
- न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंधनकारक.
- नागपूर मनपाची प्रभागरचना पूर्ण; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.
- अचानक वाढलेले राजकीय कार्यक्रम म्हणजे आचारसंहितेची चाहूल, नागपूर मनपेत ३८ प्रभाग, १५१ नगरसेवक निवडले जाणार, शहरातील मतदारसंख्या २४.४२ लाखांहून अधिक.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी कारणाचे उर्वरित काम तातडीने करावे यासाठी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. गोगावले यांनी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिलंय. महामार्गावरील रखडलेले पूल, आवश्यक असलेले अंडर पास आणि सर्विस रोड या कामांबाबत त्यांनी काही बदल सुचवले आहेत. याची पूर्तता केल्यास महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊन नागरिकांची देखील गैरसोय होणार नाही असेही या पत्रात सूचित करण्यात आले आहे.
धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त दक्षिण जेवळी गावाचे पुनर्वसन झाले मात्र वाडी विभाजन न झाल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.गेली अनेक वर्षापासून ग्रामपंचायतचा निधी खर्च करण्यास अडथळे निर्माण होत आहेत तसेच गावातील ग्रामस्थांना विविध कागदपत्रांसाठी अडचणी निर्माण झाले आहेत यामुळे दक्षिण जेवळी गावाचे वाडी विभाजन करावे अन्यथा येणाऱ्या 1 जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटरदरम्यान नव्याने उभारलेला उड्डाणपूल नियोजित मेट्रो मार्गासाठी तब्बल ६६ ठिकाणी फोडला जाणार आहे. येत्या काही महिन्यांत हे काम सुरू होणार असतानाही पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने या उनणपुलाच्या आकर्षक विद्युतरोषणाईसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. यापूर्वीही या पुलावर दिवे बसविण्यासाठी मोठा खर्च केला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आता पासूनच कसली कंबर
आज ३ हजार कोटीच्या कामाच करणार उद्घाटन
तर उद्धव ठाकरे १९ तारखेला पुणे दौऱ्यावर येणार
राज ठाकरे यांचा पण पुढील आठवड्यात पुणे दौरा असणार आहे
सगळ्याच महत्वाच्या नेत्यांचे पुणे दौरा आहे
आतापासून मुंबई नंतर पुण्यावर सगळ्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केल आहे
आता पर्यंत १ हजर ४४६ वाहनांची केली तपासणी
या मध्ये जवळपास २२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे
२४९ बसवर आर्ट टी ओ विभागाने कारवाई केली आहे
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याच आवाहन
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डीजेमुक्तीचा आवाज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बुलंद झाला.प्रामुख्याने सकाळ या दैनिकाने यासाठी अतिशय चांगला प्रयोग केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी केला.डीजेमुक्त महाराष्ट्रचा सहा महिन्यांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याची मागणी केली.यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गृहमंत्रालयासोबत संयुक्त समिती स्थापन करू,असे सांगितले.त्यामुळे सोलापूर सकाळने राबवलेला डिजे मुक्तीचा पॅटर्न आता राज्यभर लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यवतमाळमध्ये थंडी वाढताना दिसत आहे. आज सकाळी सकाळी तापमान १० अंशावर आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीचा खूप त्रास होत आहे.
यवतमाळच्या महागांव तालुक्यातील मुडाणा येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून लाखो रुपयांचे सजावट व घरगुती साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही मात्र आग तब्बल दोन तास धगधगत राहिल्याने परिसरातील नागरिक घाबरून गेले होते.अविनाश चेडके असे नुकसानग्रस्ताचे नाव आहे
जालन्यात आयोजित दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचा उत्साहात समारोप झाला. दोन दिवसांत साहित्यप्रेमींनी विविध कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतला. शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ तसेच जे.ई.एस. महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात या दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलनानिमित्त परिसंवाद, अभंगवाणी, टॉक शो, वारकऱ्यांचे कीर्तन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी व रसिकांनी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतला. आज मोठ्या उत्साहात या दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचा समारोप झाला असून, यावेळीही मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी व रसिक उपस्थित होते.
उच्चभ्रु सोसायटीच्या गेटसमोर या टपोरी गँगकडुन दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली दरम्यान यापुर्वी या सोसायटी लगत टपोरी गँगकडुन गोंधळ घालत दहशत पसवली जात असुन आता थेट हाणामारीच केली या गँगच्या दहशतीने मारहाण झालेल्या तरुणांनी दहशतीमुळे पोलीसांत तक्रारही केली नाही सध्या या टपोरी गँगची दहशत मोडीत काढण्याची मागणी या परिसरातील महिलांनी केलीय.
सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.सांगली शहरातील शिंदेमळा येथील लव्हली सर्कल येथे अहिल्यादेवी होळकर यांचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा अश्वारुढ पुतळा साकारण्यात आला आहे.अहिल्यादेवी यांची त्रिजन्म शताब्दी साजरी होत असून यानिमित्ताने हा पुतळा उभारण्यात आला असून आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दिमाखदार सोहळयात लोकार्पण पार पडणार असून मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार गोपीचंद पडळकरांसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.