Raj Thackeray Speech
Raj Thackeray Speech  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Speech : छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो...! राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा 'तो' किस्सा

Chandrakant Jagtap

Raj Thackeray On Uddhav Thackeray : गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना फुटीवर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यासाठी पक्षातील नेत्यांना संपवत गेले असा थेट आरोप राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केला आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या संवादाचा किस्सा सांगितला. महाबाळेश्वरचा किस्सा सांगितला जातो, पण त्यापूर्वी काय झालं हे सांगणं गरजेचं आहे असे म्हणत राज ठाकरे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, मी एके दिवशी उद्धव ठाकरेंकडे गेलो. त्याला बाहेर जायचं आहे सांगून आम्ही दोघं हाॅटेल आॅबेराॅयमध्ये गेलो.

राज ठाकरे म्हणाले, 'मी जे सांगतोय ते छत्रपतींची शपत घेऊन सांगतोय, तिथे मी त्याला समोर बसवलं आणि विचारलं बोल तुला काय हवंय? तुला पक्षाचा अध्यक्ष व्हायचंय? तो म्हणाला हो... उद्या सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय? म्हणाला हो... मी म्हणाले तुला जे व्हायचंय ते हो फक्त मला सांग माझं काम काय? मला फक्त प्रचालाराला बाहेर काढू नका, म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही. मी विचारलं मग ठरलं ना... म्हणाला हो, मी विचारलं नक्की ना... म्हणाला नक्की...'

'त्यानंतर मी घरी आलो, बाळासाहेब झोपलेले होते. मी त्यांना उठवलं आणि सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सोडवला. बाळासाहेब म्हणाले काय झालं? मी सांगितलं उद्धवशी बोललो. बाळासाहेब म्हणाले सर्व मिटलं? मी म्हणालो हो सर्व मिटलं. त्यानंतर बाळासाहेबांनी मला मीठी मारली. त्यानतंर ते म्हणाले उद्धव कुठे, त्यांला बोलंवलं, तो आला नाही म्हणून मी पहायला गेलो, तर मला सांगितलं गेलं ते निघून गेले आहे. हे सर्व यासाठी सुरू होतं की मी बाहेर कधी पडतो.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT