नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश ५ ट्रिलीयन इकॉनोमीकडे वाटचाल करत असताना हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. याक्षेत्रातील बारीक बारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे.
सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करा. शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवा. जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा. पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या १० बंदरापैकी एक हे बंदर असणार आहे. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे.याभागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार आहे. याठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे. यासाठी वाढवण येथे तात्काळ नवीन विमानतळाचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असून अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवी मुंबई विमानतळ ८५% पूर्ण झाले आहे. मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट क्षमता असणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा सुचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.राज्यातील ११ विमानतळांचा आढावा घेतला ३४ प्रशिक्षण विमान/अमरावतीत एअर इंडियाची फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार. ही आशियातील सर्वात मोठी अकादमी असणार आहे.
ज्या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा आहे. तेथेही काही अडचणी येत असल्याचे समजले आहे.काही विमानतळाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे.उशीर का होत याचे कारणे शोधून लवकरात लवकर मार्ग काढून कामे पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी नवी मुंबई, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांचा सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये झालेले काम , उर्वरित कामासाठी लागणारा कालावधी, प्रलंबित परवानग्या,आर्थिक बाजू, जमीन संपादन अशा विविध भागांचा आढावा घेतला. याबरोबरराज्यातील सर्व विमानतळांचा सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.