Boy Died Due To Airbag  Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai: एअरबॅगने घेतला मुलाचा जीव; एअरबॅग तोंडावर आपटल्यानं मुलाचा मृत्यू

Boy Died Due To Airbag : अपघात झाल्यानंतर चालक आणि इतरांना वाचवणारी एअरबॅगनेच एका मुलाचा जीव घेतलाय. प्रवास सुरक्षित होण्यासाठी एअरबॅग महत्वाचं आहे, पण त्याच एअरबॅन चिमुरड्याचा जीव गेला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाहनाचा अपघात घडल्यास जीवदान देणारी एअरबॅगच एका सहा वर्षीय मुलाच्या मृत्युला कारणीभूत ठरलेय. नवी मुंबईतील वाशी येथील विचित्र अपघात घडलाय. नक्की काय घडलंय ?आणि काय काळजी घेतली पाहिजे यावरचा एक रिपोर्ट पाहूया. आपला प्रवास सुरक्षित होण्यासाठी कारमधील एअरबॅग महत्वाचा घटक आहे.

मात्र जीवदान देणारी हीच एअरबॅग एका चिमुरड्याच्या जीवावर उठली आहे. नवी मुंबईतील एका विचित्र अपघाताची ही घटना आहे. वाशी सेक्टर 15 मध्ये राहणारे मावजी अरेठीया सहा वर्षाचा मुलगा हर्ष आणि तीन पुतण्यांना घेऊन रात्री फेरफटका मारण्यासाठी गेले होते. वाशीच्या ब्लू डायमंड चौकात त्यांच्या पुढील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. या धडकेत कारचे मागील चाक उडून मावजी यांच्या कारच्या बोनेटवर आदळले.

मोठा धक्का बसल्याने मावजी यांच्या कारचे दोन्ही एअरबॅग उघडले गेले. त्याचा जोरदार झटका पुढील सीटवर बसलेल्या हर्षला बसला. बेशुद्ध पडलेल्या हर्षला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एअरबॅग उघडताच माने जवळ झटका बसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

लहान मुलं प्रवास करत असतील तर कार मध्ये चाईल्ड रिस्ट्राईन्ट सिस्टिम अथवा बेबी कार चेयर बसवून घ्यावी, अशी सूचना आरटीओ अधिकाऱ्यांनी केली आहे. लहान मुलांना कारमध्ये पुढे बसवताना काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी याबाबत वाहनचालकांना काही सुचना केल्यात.

या अपघात प्रकरणी कारचालक विनोद पाचडे यांच्या विरोधात बेदरकारपणे गाडी चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कारमध्ये लहान मुलं असतील तर पालकांनी सतर्क राहणं गरजेचे आहे. तज्ञांनी सांगितलेल्या सुचना तुम्ही पाळल्यात तर तुमचा प्रवास आनंदाचा आणि सुरक्षित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT