Grieving parents of air hostess Pinky Mali mourn her untimely death after the tragic Baramati plane crash. Saam Tv
महाराष्ट्र

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

Air Hostess Pinky Mali Death: अजित पवारांसोबत बारामती विमान अपघातात एअर होस्टेस पिंकी मालीचाही मृत्यू झालाय. पिंकीचं तिच्या वडिलांसोबत शेवटचं काय बोलणं झालं होतं. ? पिंकीचं कोणतं स्वप्न अपूर्ण राहिलंय.

Bharat Mohalkar

अजितदादांसोबत विमान अपघातात पिंकी माळीचा मृत्यू झाला... आणि तिच्या आई वडिलांनी टाहो फोडला.... पिंकी माली एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती... बुधवारी ती ड्यूटीवर जाण्यासाठी घराबाहेर पडली...तिच्या आई-वडीलांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की आपली लेक आता पुन्हा कधीही भेटणार नाही. पिंकी ऐवजी तिचं पार्थिव घरी आलं... मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार आहे हे तिचे वडीलांसोबत शेवटचे शब्द ठरलेत...

पिंकी 9 वर्षांपासून विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करायची... तिनं आतापर्यंत देशातील अनेक दिग्गजांसोबत विमान प्रवास केल्याचं वडील शिवकुमार माली सांगतात... खरंतर पिंकी आणि सोमकुमार सैनी यांच्या लग्नाला वर्षही लोटलं नाही... तोच पिंकीचा विमान अपघातात मृत्यू झालाय.. या अपघातामुळे नवऱ्यासोबतच तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय... त्यामुळे आता सरकारनेच तिच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केलीय..

माली कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे आहेत. मात्र काही वर्षांपासून हे कुटुंब मुंबईत स्थायीक झालंय. विशेष म्हणजे पिंकीचे वडील शिवकुमार माली हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.आपल्या भावाला पायलट बनवण्याचं स्वप्न मनाशी घेऊन पिंकी कुटुंबाचा आधार बनली होती...मात्र पिंकीच्या जाण्यानं तिच्या भावाचं पायलट बनवण्याचं, नवऱ्याला आयुष्यभर साथ देण्याचं आणि आई वडिलांची आधार बनण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT