Imtiaz Jaleel on Amit Shah Saam TV
महाराष्ट्र

Imtiyaz Jaleel: अमित शहांनी एकनाथ शिंदेंना दमदाटी करून शांत बसवलं; इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा

Imtiaz Jaleel on Amit Shah: निजामाला घरी पाठवा, असे म्हणत 'मजलीस को संभाजीनगर से उखाड फेको' असं अमित शहा संभाजीनगर सभेत म्हटलं. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला आहे.

Satish Daud

AIMIM Imtiaz Jaleel Criticism BJP Amit Shah

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (ता. ५) छत्रपती संभाजीनगर शहरात जंगी सभा घेतली. या सभेतून त्यांनी विरोधकांसह एमआयएमवर जोरदार प्रहार केला. निजामाला घरी पाठवा, असे म्हणत 'मजलीस को संभाजीनगर से उखाड फेको' असं आवाहन मतदारांना केलं. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"अमित शहा देशाचे गृहमंत्री असून त्यांना 'उखाड के फेक देंगे'ही भाषा शोभते का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. माझ्या मतदारसंघात येऊन धमकी देणे त्यांना शोधत नाही. मला त्यांना सांगायचं आहे की, ही लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने लोकांनी मला निवडून दिले आहे". (Latest Marathi News)

तुम्ही कितीही काहीही करा, लोकांना माहित आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे. तुम्ही माझी तुलना निजामाशी करत आहात. निजामाशी माझं काही घेणं देणं नाही. निजाम एका काळात होते, ते गेले, मेले संपले. जे काम निजाम देशाला तोडण्याचे फोडण्याचे काम करत होते. ते काम दुर्दैवाने कोणता पक्ष करत आहे ते मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, असा संताप इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी व्यक्त केला.

"सत्तेसाठी तुमची पार्टी किती खालच्या पातळीवर गेली आहे हे सर्वांना माहिती आहे. ज्या लोकांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही लढत होता, मागणी करत होता. ते लोक आज तुमच्या रांगेत बसलेले आहेत. तुम्हाला 48 पैकी 45 जागा पाहिजे मग 3 कशाला सोडता तुम्हाला माहित आहे त्यातली एक जागा माझी आहे, असा टोलाही जलील यांनी शहांना लगावला.

"शहांनी शिंदेंना दमदाटी करून शांत बसवलं"

दरम्यान, यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांनी एक खळबळजनक दावा केला. औरंगाबाद लोकसभेची जागा भाजपला मिळावी, यासाठी अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दमदाटी करून खाली बसवलं, असं जलील यांनी म्हटलं आहे.

"अमित शहा गृहमंत्री असून भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. त्यांनी आज लोकसभेचा उमेदवार जाहीर करायला हवा होता. सांगायला पाहिजे होतं की, एकनाथ शिंदेला दमदाटी करून शांत बसवलं. अजून तुमचा काहीच निर्णय झाला नाही. मात्र, त्याआधीच आम्ही कमळावर निवडणूक लढणार आहोत असं तुम्ही सांगत फिरत आहात, असा टोलाही जलील यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT