AIMIM Offer on Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde Offer: बीआरएस नंतर आता पंकजा मुंडेंना AIMIM ची ऑफर; असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले, वाचा...

AIMIM Offer on Pankaja Munde: केसीआर यांच्या ऑफरनंतर आता एमआयएमने सुद्धा पंकजा मुंडेंना ऑफर दिल्याची चर्चा रंगली आहे.

डॉ. माधव सावरगावे

AIMIM Offer on Pankaja Munde: राज्याचा राजकारणात आज मोठी राजकीय घडमोड घडली. बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, केसीआर यांच्या ऑफरनंतर आता एमआयएमने सुद्धा पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) ऑफर दिल्याची चर्चा रंगली आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी तसा दावा केला आहे. आम्ही दोन वर्षांपासून पंकजा मुंडे यांना आमच्या पक्षात या असं सांगतोय, एकदा आमची भेट आणि बैठक झाली आहे, असा खळबळजनक दावा सुद्धा ओवेसी यांनी केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आता लवकरच भाजपची साथ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

असदुद्दीन ओवेसी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी एमआयएमच्या (AIMIM) कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले, आम्ही दोन वर्षांपासून त्यांना आमच्या पक्षात या असं सांगतो आहे. दोन वर्षापूर्वी पंकजा मुंडेंना इम्तियाज जलील यांनी एमआयएममध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यांनी आता विचार करायला हवा.

'एमआयएमला दुर्लक्षित करून चालणार नाही'

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण्यात शुक्रवारी विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. एमआयएमला मात्र, बैठकीत बोलवण्यात आलं नाही. यावर ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपला हरवण्यासाठी एमआयएमला दुर्लक्षित करून चालणार नाही. आम्हाला सुद्धा बैठकीला बोलावलं पाहिजे आम्ही येऊ असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंकडून अद्यापही प्रतिक्रिया नाही

दरम्यान, पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदासाठी बीआरएसकडून ऑफर मिळाली आहे. त्याचबरोबर एमआयएमने सुद्धा पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची मोठी ऑफर दिली आहे. मात्र, ही ऑफर मिळाली असली तरी यावर अद्याप मुंडे यांच्याकडून कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही. पण त्या या ऑफरकडे कशा प्रकारे पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

SCROLL FOR NEXT