Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचाय का? प्रकाश आंबेडकर शिंदे गटातील नेत्याला काय म्हणाले, पाहा VIDEO

Prakash Ambedkar met Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांना बघून प्रकाश आंबेडकर त्यांना हसत-हसत उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचाय का?, असं म्हणाले.
Prakash Ambedkar met Deepak Kesarkar
Prakash Ambedkar met Deepak KesarkarSaam TV
Published On

Prakash Ambedkar met Deepak Kesarkar: शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची दिल्लीत भेट झाली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. या दोन्ही नेत्यांमधील संवाद ठाकरे गटाची चिंता वाढवू शकतं, असं मानलं जात आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ही भेट कॅमेऱ्यात टिपली गेली. त्याचबरोबर केसरकर आणि आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यातील संभाषणही रेकॉर्ड झालं. केसरकर येत असतानाच समोरून प्रकाश आंबेडकर आले. त्यांनी केसरकरांना नमस्कार केला आणि हस्तांदोलन केलं.

Prakash Ambedkar met Deepak Kesarkar
Uddhav Thackeray News: कुटुंबावर आलात तर, फक्त शवासन करावं लागेल; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना बघून प्रकाश आंबेडकर त्यांना हसत-हसत उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचाय का?, असं म्हणाले. यावर दीपक केसरकर यांना हसू आवरलं नाही. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकारपरिषद घेत राजकीय युतीची घोषणा केली.

Prakash Ambedkar met Deepak Kesarkar
Maharashtra Politics: बीआरएस पक्षाने पंकजा मुंडेंना दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'खडे टाकून...'

आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गट आणि वंचितची युती गेमचेंजर ठरू शकते. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याने शिंदे गट आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वंचित ठाकरे गट युती तुटणार?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी केली असली, तरी वंचित बहुजन आघाडीची एकला चलोची मानसिकता आहे. कारण, उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं मनोमिलन कायम राहिलं, तर आम्ही पुन्हा एकटे राहणार असं सूचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याची वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com