medical saam tv
महाराष्ट्र

Obesity in Kids: तुमची मुलं लठ्ठ आहेत का? मुलांमधील लठ्ठपणा, धोक्याची घंटा, लठ्ठपणा म्हणजे मधुमेहाला आमंत्रण

Tackling Childhood Obesity: लहान मुलांमधील लठ्ठपणा आता पालकांची चिंता वाढवणार आहे. एम्सचा एक अहवाल लहान मुलांमधील लठ्ठपणाबद्दल नेमकं काय सांगतो? लठ्ठपणा डोकेदुखी का ठरणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

मुलांच्या लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुमची मुलं दिवसेंदिवस लठ्ठ होतायत का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे प्रौढच नाही तर लहान मुलंही लठ्ठपणाचा शिकार ठरतायत. अनेक मुलांचं वजन त्यांच्या वयापेक्षा खूप जास्त असतं. ज्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतोय. लहान मुलांमधील हा लठ्ठपणा प्रौढ वयात अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो. एम्सच्या एका अहवालात लहान मुलांच्या लठ्ठपणाबाबत काय सागण्यात आलयं, पाहूयात

मुलांमधील लठ्ठपणा, धोक्याची घंटा

अहवालासाठी 1 लाखाहून अधिक लहान मुलांचा अभ्यास

5% ते 15 % लहान मुलं लठ्ठपणाचे शिकार

शहरी भागात लठ्ठ असणाऱ्या मुलांची संख्या सर्वाधिक

लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोगासारख्या आजारांचा धोका वाढला

लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या वेगानं वाढतेय. अशात तज्ज्ञांनीही मुलांमधील लठ्ठपणाच्या समस्येवर चिंता व्यक्त केलीय. मुलांमधील लठ्ठपणा रोखण्यासाठी कुटुंब, शाळा, डॉक्टर आणि सरकारनं शक्य तितक्या लवकर एकत्र येऊन पावलं उचलायला हवीत. जेणेकरून प्रत्येकाच्या घरातील मुलं निरोगी राहतील. मुलांमधील लठ्ठपणा रोखायचा कसा? पाहूयात

मुलांमधील लठ्ठपणा रोखायचा कसा?

घरातील शिजवलेलं अन्न खाण्यास मुलांना प्रवृत्त करा

लहान मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करा

मैदानावरील खेळांसाठी मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं

मुलांची नियमित आरोग्य तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या

मुलांना जंक फूडऐवजी फळे, भाज्या आणि धान्ये खाण्यास शिकवा.

पालक आणि शिक्षकांनी लहान मुलांच्या लठ्ठपणावर लक्ष द्यावे

लहान मुलांमधील लठ्ठपणा रोखणं ही आता काळाची गरज ठरलीय, हे निश्चित. योग्य आहार, व्यायाम आणि जंक फूडला नकार... हाच लहान मुलांच्या उत्तम आरोग्याचा मंत्र आहे आणि मुलांबरोबरच पालकांनीही त्याचं पालन करणं गरजेचं आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT