ahilyanagar Railway Station update  Saam tv
महाराष्ट्र

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

ahilyanagar Railway Station update : अहमदनगर रेल्वे स्थानकाचं बदलण्यात आलं आहे. आता रेल्वे स्थानकाचे नाव हे अहिल्यानगर ठेवण्यात आलं आहे.

Saam Tv

अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामकरण आता ‘अहिल्यानगर’ असे करण्यात आलंय

नामकरण अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ करण्यात आलंय

महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेनुसार हे बदल करण्यात आलेत

बीड-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार

नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय रेल्वेने लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'अहिल्यानगर' असे करण्यात आलं आहे.

भारतीय रेल्वेने मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर असे ठेवले आहे.महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा घेतलेल्या निर्णयानुसारही करण्यात आले आहे.

यापूर्वी अहमदनगर म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे अहिल्यानगर असे नामांतरित करण्यात आलंय. त्याअनुषंगाने, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व सर्व्हेअर जनरल ऑफ इंडियाच्या पत्रानुसार, स्थानकाचे नवे नाव खालीलप्रमाणे वाचले आणि लिहिले जाईल

देवनागरी लिपी (मराठी): अहिल्यानगर

देवनागरी लिपी (हिंदी): अहिल्यानगर

रोमन लिपी (इंग्रजी): AHILYANAGAR

अमळनेर (भां) आणि अहिल्यानगर दरम्यान रेल्वे सेवा आधीच सुरू आहेत. अमळनेर (भां) - बीड नवीन रेल्वे मार्गिकेचे उद्घाटन केले जाईल आणि बीड आणि अहिल्यानगर दरम्यानच्या पहिल्या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते १७.९.२०२५ रोजी हिरवा झेंडा दाखवला जाईल.

बीड - अमळनेर (भां) खंडामध्ये ६ स्थानके आहेत. बीड, राजुरी (नवगण), रायमोहा, विघनवाडी, जाटनंदूर आणि अमळनेर (भां) प्रवासी व सर्वसामान्य जनतेने या बदलाची नोंद घ्यावी, अशी विनंती करण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT