Rohit Pawar - Sujay Vikhe Patil Banner at khed village in Karjat Taluka saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Politics : चर्चा तर होणारच! रोहित पवार-सुजय विखे पाटील यांच्या बॅनरनं कर्जत तालुका ढवळून निघाला

Rohit Pawar - Sujay Vikhe Patil Banner : आमदार रोहित पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेला बॅनर झळकला आहे.

Nandkumar Joshi

सुशील थोरात, अहमदनगर

Rohit Pawar-Sujay Vikhe Patil Banner at Khed Village : आघाडी, युतीच्या राजकारणात अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाच, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या खेड गावातील एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकदा एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे राजकारणातील दोन युवा नेते आमदार रोहित पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेला बॅनर झळकला आहे. या बॅनरची सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा सुरू आहे. (Maharashtra News)

राज्याच्या राजकारणात (Political News) रोज नवीन घडामोडी घडत आहेत. कालचे विरोधक आज एकत्र येत असल्याचे चित्र आहे. आघाडीत किंवा युतीत असणारे नेते एका रात्रीत विरोधात गेल्याचे मतदार बघत आहेत. कोणता नेता कुणासोबत जाईल याचा काही नेम राहिला नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र आले तरी, अनेकांच्या भुवया उंचावतात. अशात आता राजकीय विरोधक असलेल्या दोन नेत्यांचा फोटो एकत्रित झळकलेल्या बॅनरची चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि पवार या घराण्यांचं शत्रुत्व राजकारणाच्या माध्यमातून नेहमीच समोर येत असतं. सुजय विखे पाटील हे भाजपकडून खासदार झाल्यानंतर त्यांनी जामखेड मतदारसंघात येऊन रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. रोहित पवारही वेळोवेळी भाजपवर निशाणा साधत असताना खासदार या नात्याने सुजय विखे पाटील यांच्यावर टीका करत असतात. मात्र या राजकीय टीकाटिप्पणीमध्ये सध्या कर्जत तालुक्यातील खेड या गावात एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

खेड गावात झळकलेल्या फलकावर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे छायाचित्र आहे. खेड या गावासाठी आमदार रोहित पवार यांच्या निधीतून दहा लाख रुपये, तर खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीतून बारा लाख रुपये गावाच्या विकासासाठी मिळाले. त्यामुळे खेड ग्रामस्थांनी या दोघांचेही अभिनंदन करणारे फलक लावले आहे. दोघांचेही फोटो एकाच फलकावर आल्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT