Anil bonde on Rahul Gandhi: 'फ्लाइंग किसची परंपरा भारताची नसून इटलीची'; भाजप खासदाराचं राहुल गांधींवर टीकास्त्र

कथित फ्लाइंग किस प्रकरणावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Anil bonde on Rahul Gandhi
Anil bonde on Rahul GandhiSaam tv
Published On

अमर घटारे

Anil Bonde News: संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना फ्लाइंग किस दिल्याच्या कथित आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावरून भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या फ्लाइंग किस प्रकरणावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'फ्लाइंग किस' केल्याचा आरोपावरून भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर टीका केली. 'राहुल गांधींनी केलेला प्रकार हा विचित्र प्रकार आहे. जो नेता एका पक्षाच नेतृत्व करतो, त्याचं अस वर्तवणूक अपरिपक्व आहे. फ्लाइंग किसची परंपरा ही भारताची नाही, ती इटलीची. लोकसभा हे पवित्र मंदिर आहे, इथं कस वागायचं बोलायचं, त्याची प्रथा आहे, असा घणाघात अनिल बोंडे यांनी केला.

Anil bonde on Rahul Gandhi
Pune Traffic Jam and Pollution: पुण्यात चांदणी चौकाचं उद्घाटन, पण चर्चा मात्र वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचीच; कोण काय म्हणालं ?

मणिपूर मुद्द्यावरून टीका करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी घातक आहे, अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देत प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. (Anil Bonde Latest News)

Anil bonde on Rahul Gandhi
Pune Traffic Jam and Pollution: पुण्यात चांदणी चौकाचं उद्घाटन, पण चर्चा मात्र वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचीच; कोण काय म्हणालं ?

'प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य ऐकलं पाहिजे, मणिपूरमध्ये झालेली हिंसा प्रकरणावर मोदींनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर काही लोकांना भारताची प्रगती पाहवत नाही, तर प्रकाश आंबेडकर हे प्रसिद्धीसाठी असं वक्तव्य करतात. मोदींवर बोललं तर टीव्हीवाले दाखवतात, असा घणाघात बोंडे यांनी केला. (Maharashtra Political Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com