करूणा मुंडेंच्या 'शिवशक्ती' पक्षाची राज्यातील पहिली शाखा नगरमध्ये SaamTvNews
महाराष्ट्र

करूणा मुंडेंच्या 'शिवशक्ती' पक्षाची राज्यातील पहिली शाखा नगरमध्ये (VIDEO)

पाथर्डीच्या वडगांवमध्ये शिवशक्ती सेनेच्या राज्यातील पहिल्या शाखेचे करूणा मुंडे यांच्या हस्ते धुमधडाक्यात उद्धाटन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आणि राज्यात राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या आरोपानंतर करुणा मुंडे सतत चर्चेत राहिल्या. करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी २३ डिसेंबर २०२१ रोजी परळीत पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. वेळ पडलीच तर पती धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचीही तयारी असल्याचे करुणा मुंडेंनी सांगितले होते. The first branch of Karuna Munde's 'Shiv Shakti' party in the state in AhmedNagar

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गोरगरिबांवर होणारे अन्याय-अत्याचार दूर करण्यासाठी तसेच महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून 'शिवशक्ती सेना' (Shivshakti sena) या नव्या पक्षाची स्थापना करुणा मुंडेंनी केली होती. याच शिवशक्ती सेना पक्षाची महाराष्ट्रातील पहिली शाखा पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील वडगावमध्ये (Vadgaon) सुरु झाली आहे. शिवशक्ती पक्षाच्या अध्यक्षा करूणा धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात शाखा उद्धाटन झाले. यावेळी शिवशक्ती पक्षाचे युवा नेते बाबुराव बडे आणि वडगावमधील तरूण मंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या पक्ष बांधणीसाठी करूणा मुंडे यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. याच अनुषंगाने वडगावमध्ये शिवशक्ती पक्षाच्या पहिल्या शाखेचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी शाखाध्यक्ष संतोष बडे, उपाध्यक्ष परेमश्वर गरड, सचिव सतिश सातपुते, सल्लागार अशोक नागरगोजे, खजिनदार पै. बाळासाहेब गरड, कोषाध्यक्ष राजेंद्र शेळके यांची उपस्थिती होती. तसेच गावातील दिंगबर बडे, आजिनाथ बडे, कांता पाटील गरड, सतिष पांगरे, दत्तात्रय पांगरे आणि गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सामाजिक कार्यकर्ते सतिश भोसले यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच शिवशक्ती पक्षाचे युवा नेते बाबुराव बडे यांनी गावातील ग्रामस्थांसाठी कै. महादेव उत्तमराव बडे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन यानिमित्ताने केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT