Army Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar: देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या वीर माता पत्नींची हेळसांड; मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

वीर जवानांच्या पती-पत्नींना मदत मिळत नसल्याने याबाबत गंभीर्याने विचार करावा अशी मागणी वीर पत्नींनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : सीमेवर रक्षण करताना अनेक जवानांना हुतात्म्य पत्करावे लागते देशासाठी जवान आपले प्राण पणाला लावून हसत वीरमरण पत्करतो. लढताना मृत्यू आल्यानंतर त्यांच्या कुटुंबासाठी सरकार अनेक घोषणा करते. अनेक राज्यकर्ते आश्वासन देतात मात्र प्रत्यक्षात ते आश्वासन अमलात कधीच येत नसल्याचे सत्य समोर आले आहे.वर्षानुवर्षे सरकार दरबारी चकरा मारूनही वीर जवानांच्या पती-पत्नींना मदत मिळत नसल्याने याबाबत गंभीर्याने विचार करावा अशी मागणी वीर पत्नींनी केली आहे. (latest Marathi News)

अहमदनगर शहरातील प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वीर माता पत्नी आणि पित्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहीद झालेले जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांना सैनिक भरती प्रशिक्षण तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा असल्यास सैनिक कल्याण संघाकडून मदत केली जाणार आहे.

या मुलांना नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने देणार असल्याची घोषणा यावेळी प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी केली आहे. वीर जवानांच्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने वीर जवानांना मरणोत्तर मिळालेली पदके छातीला लावून वीर जवानांचे कुटुंब मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले आहे.

देशाच्या सेवेत लष्करात असणाऱ्या आपल्या मुलाला सीमेवर लढताना वीरमरण येऊन 23 वर्ष झाले. मात्र अजूनही सरकारकडून मदत मिळवण्यासाठी झगडत असल्याचं नाशिक जिल्ह्यातील येवला येथील रहिवासी असणाऱ्या सुमनबाई तनपुरे या वीर मातेने आपली व्यथा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT