Ahmednagar News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar News: हृदयद्रावक! ३ भावंडाचा तलावात बुडून मृत्यू, आईचा जीव वाचला; मन सुन्न करणाऱ्या घटनेने नगर हळहळलं

Ahmednagar Khed News: घटनेनंतर एकाच चितेवर तिन्ही भावंडांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी

Ahmednagar News:

अहमदनगर जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील खर्डा येथे तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मन सुन्न करणाऱ्याा या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि मुलीचा समावेश आहे.

तीन भावंडांवर काळाचा घाला...

याबाबत अधिक माहिती अशी की, खर्डा (Ahmednagar) येथून भुमकडे जाणाऱ्या शिर्डी- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा लगत पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने एका वाटसरूच्या धाडसामुळे यातील मुलांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

तिघांचा बुडून मृत्यू....

दहावीत शिकणारा कृष्णा परमेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे), दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४ वर्षे) अशी या मृत मुलांची नावे आहेत. यामध्ये सानिया आणि दिपक हे सख्खे भाऊ- बहिण आहेत.

बहिणीला वाचवायला भाऊ धावले अन् विपरित घडलं...

सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दोन्ही मुले पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिही बुडू लागली. त्या तिघांना वाचवण्यासाठी मुलांची आई रुपाली ज्ञानेश्वर सुरवसे पाण्यात उतरली.

आईचा जीव वाचला..

मात्र तिही बुडत असताना आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे सरपंच बिबिषन वाघमोडे, चांद पठाण, भाऊसाहेब दिगंबर वाळुंजकर यांच्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेनंतर एकाच चितेवर तिन्ही भावंडांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी केलेला आक्रोश काळीज चिरडुन टाकणारा होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT