Onion Theft Saam tv
महाराष्ट्र

Onion Theft: चोरट्यांचा कांद्यावर डल्ला; शेडमधून ८५ कांदा गोण्यांची चोरी

Kopargaon News : चोरट्यांचा कांद्यावर डल्ला; शेडमधून ८५ कांदा गोण्यांची चोरी

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

कोपरगाव (अहमदनगर) : कांद्याचा भाव गगनाला भिडला असून चोरट्यांनी नजर आता कांद्यावर पडली आहे. (Kopargaon News) कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात एका व्यापाऱ्याच्या शेडमधून ८५ गोण्या कांदा (Onion) चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे आता कांदा देखील बंद खोलीत सुरक्षिततेच्या कठड्यात ठिवावा लागणार. (Latest Marathi News)

कांद्याचे किरकोळ बाजारातील दर ६० रे ६५ रुपये किलो झाले आहेत. यामुळे कांदा सर्वसामान्यांना रडवत आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा साठवणूक केली आहे. या साठवणूक केलेल्या कांद्याला देखील सुरक्षा रक्षकाच्या निगराणीत ठेवायची वेळ आली आहे. अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली असून गोडाऊनमध्ये ठेवलेला कांदा चोरीला गेला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८५ गोण्या चोरीला 

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी बाबासाहेब खैरनार यांनी येसगाव शिवारातील शेडमध्ये १ हजार ७० गोणी कांदा ठेवला होता. मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ८५ गोणी कांदा घेऊन पोबारा केला. इतर २० ते २२ गोण्या शेडजवळ रस्त्याच्या पलीकडे सोडून चोरांनी धूम ठोकली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी कांदा व्यापारी बाबासाहेब खैरनार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT