Student Drowned  Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: पोहण्याच्या मोहापायी गेला जीव; मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, पवनाधरण परिसरातील घटना

Student Drowned In Water: पवना धरण परिसरातील ठाकूरसई येथे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू झालाय. तर त्याच्या मित्राला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आलंय. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Student Drowned In Water Ahmednagar

सुट्टी असली की आपण बाहेर जायचं, फिरायला जायचं नियोजन करतो. पण अनेकदा जिथे फिरण्यासाठी जातोय, त्या ठिकाणाची सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकशी करत नाही. नीट माहिती घेत नाही, मग अनेकदा ही गोष्ट आपल्या जीवावर बेतते. अशीच एक घटना पवना धरण परिसरात घडली आहे.  (Latest Marathi News)

26 जानेवारीच्या सुट्टीमुळे अनेकांनी बाहेर फिरण्यासाठी जाण्याचं नियोजन केलं होतं, असंच नियोजन अहमदनगरमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील केलं होतं. सुमारे 15 विद्यार्थी फिरण्यासाठी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पवना धरण (Pavna Dam) परिसरात आले होते. पण, हेच त्यांच्या जीवावर बेतलंय. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पवना धरणात बुडून मृत्यू

मावळच्या पवना धरण परिसरातील ठाकुरसाई गावाच्या हद्दीमध्ये टेंट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवारा कॉलेजमधील मेडिकलच्या विद्यार्थ्याचा (Pravara Medical College Student) पवना धरणात बुडून मृत्यू झालाय. मनिष शंकर शर्मा असं त्या बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

26 जानेवारीची घटना

26 जानेवारीला पंधरा वर्गमित्र (Ahmednagar News) पर्यटनासाठी मावळ तालुक्यातील पवनाधरणाच्या परिसरात आले होते. पंरतु त्यामधील चार विद्यार्थी पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात गेले. परंतु त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही.

पाण्याच्या खोलीचा अंदाज नाही आला

पाण्यात उतरल्यानंतर त्यांच्यातील दोनजण पाण्यात बुडू (Student Drowned In Water) लागले. तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यामुळं स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आदित्य सचिन बुंदले याला वाचविण्यात यश आलं. मात्र, मनिष शंकर शर्मा याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा लोणावळा ग्रामीण पोलीस तिथे पोहोचले. आता पोलीस अधिक तपास करीत आहे.

पाण्याच्या ठिकाणी फिरायला जाताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटनेस सामोरं जावं लागू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी

SCROLL FOR NEXT