Sujay Vikhe vs Nilesh Lanke Saam TV
महाराष्ट्र

Nilesh Lanke News: पराभवानंतर सुजय विखेंना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका! खासदार निलेश लंकेंनी डिवचले; म्हणाले...

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. २० जून २०२४

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विखेंना पराभवाची धुळ चारली. मात्र आता या निकालावर सुजय विखेंनी शंका उपस्थित केली असून एव्हीएम आणि व्हिव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे. यावर निलेश लंकेंनीही विखेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश लंके?

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हिव्हीपॅट मोजणीची मागणी केली आहे. या संदर्भात महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार निलेश लंके यांनी विखेवर निशाणा साधला आहे. निवडणूक कुठलीही असो ती पारदर्शक पद्धतीने पार पडली जाते, असा टोला खासदार निलेश लंके यांनी लगावला आहे.

"माझ्या मतदारसंघाचा विचार केला तर माझा निकाल रात्री साडे दहा वाजता जाहीर करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक गोष्ट चार ते पाच वेळा व्हेरिफाय करण्यात आलेली आहे. मात्र सत्तेत असणारे माणसं निवडणूक आयोगावर आक्षेप घेत असेल तर ही चुकीची बाब आहे.तुम्हाला पराभव मान्यच होत नसल्याने ही चुकीची बाब आहे," असेही खासदार लंके म्हणाले.

"शेवटी राजकारणामध्ये पराभव देखील मान्य करायला शिकलं पाहिजे. अनेक निवडणुकांमध्ये आक्षेप घेतला गेला, मात्र नंतर एकही मताचा फरक पडत नाही. त्यामुळे पराभव झाला असल्याच आतातरी मान्य करा, असा सल्ला निलेश लंकेंनी दिला. दरम्यान, सुजय विखे यांच्या मागणीनंतर आता नगर दक्षिणमधील निकाल कोर्टात जाणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan : दिवसाला २०० सिगारेट ओढायचे 'बिग बी'; मुंबईत येताच सुटलं व्यसन, कसं? स्वतःच केला खुलासा

Arbaz- Nikki: बाईsss काय हा प्रकार!, अरबाजने निक्कीला चक्क उचलून घेतलं

Marathi News Live Updates : PM मोदींच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न

ज्येष्ठ नागरिकांनी 'या' आरोग्याच्या चाचण्या केल्याच पाहिजेत; वेळीच जाणून घ्या

Viral Video: क्षणभर विश्रांती घेत जवानांनी नेपाळी गाण्यावर धरला ठेका, धमाकेदार डान्सचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT