Jayakwadi Dam Saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी सोडण्यास सर्वपक्षीय नेत्यांचा तीव्र विरोध; कोर्टात याचिका दाखल

Ahmednagar News : नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. मात्र या कायद्यालाच विरोध होत असून या कायद्याचा फेरविचार व्हावा

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर नगर जिल्ह्यातून त्याला तीव्र विरोध होत आहे. रस्त्यावरच्या लढाई बरोबरच आता न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू झाली आहे. (Ahmednagar) जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन करत (Jayakwadi Dam) जायकवाडीला पाणी देण्यास विरोध केला असून आता अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा, संजीवनी आणि शंकरराव काळे या तीन कारखान्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. (Breaking Marathi News)

२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. मात्र या कायद्यालाच विरोध होत असून या कायद्याचा फेरविचार व्हावा; अशी मागणी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून होताना दिसते. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी देऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांमधून पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा येथील पुणे- छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. कोपरगावमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी उपोषण करत विरोध केला. या पाठोपाठ आता शिंदे गटाचे शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सुद्धा जायकवाडीला पाणी देण्याचा विरोध करत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यायालयात याचिका दाखल 

कोपरगावच्या काळे कारखान्याने केलेल्या याचिकेवर २० नोव्हेंबरपर्यंत गोदावरी पाटबंधारे महामंडळाला म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून यावर ५ डिसेंबरला सुनावणी होईल. तर विखे यांच्या प्रवरा कारखान्याने केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. दरम्यान संजीवनी साखर कारखान्याने देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून २१ डिसेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयीन लढाई बरोबरच आम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा लढणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केलं. तर जायकवाडीतून सर्वांनाच एकत्र पाणी मिळत असल्याने ते नेते एकत्र येतात. मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळी धरण असल्याने नेते वेगवेगळी भूमिका घेतात ही शोकांतिका आहे. मात्र आता सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन विवेक कोल्हे यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT