Shani Shingnapur News Saam tv
महाराष्ट्र

Shani Shingnapur News: शनैश्वर देवस्थानची ४ लाखांत फसवणूक; कळस बसवायचे काम ठेवले अपुर्ण

शनैश्वर देवस्थानची ४ लाखांत फसवणूक; कळस बसवायचे काम ठेवले अपुर्ण

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : शनी शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या दीपस्तंभावर (Shani Shingnapur) गोल्ड प्लेटिंगचा कलश बसविण्याचे काम होते. या कामासाठी गोवा येथील जगदीश भट या कारागिराने ॲडव्हान्स रक्कम घेऊन देखील काम करण्यास टाळाटाळ केल्याने देवस्थानच्यावतीने शिंगणापूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

राज्यातील सर्वाधिक ७२ फूट उंचीच्या नवग्रह दीपस्तंभाचे काम शनी शिंगणापूर येथे पूर्ण झाले आहे. त्यावर ६ फूट उंच व ८० किलो वजनाचा कलश ठेवण्यात येणार होता. या कामाचे लिलाव होऊन हे काम गोवा येथील कारागीर जगदीश भट याला मिळाले होते. दरम्यान कामास सुरवात करून काही काम केले. त्यानंतर ॲडव्हान्स पोटी ४ लाख २८ हजारांचा चेक व आरटीजीएस घेऊनही कळसाचे पुढील काम करण्यास टाळाटाळ केली.

भट विरोधात गुन्‍हा दाखल

त्यानुसार देवस्थानचा विश्वासघात करून फसवणूक केल्याने योगेश नानासाहेब वाबळे यांच्या फिर्यादीनुसार शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात जगदीश भट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात संशयित केमिकल गळती; दोन तरुणांचा मृत्यू

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यापूर्वी खात्यात येणार ₹2,000? मोठी अपडेट समोर

Latest Mangalsutra Designs: 6-7 ग्रॅममध्ये बनवा सुंदर सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स करवा चौथसाठी बेस्ट

Phlegm : गरम पाण्याच्या वाफेने खरंच छाती-फुफ्फुसांतील कफ बाहेर पडतो का?

Political News : मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT