Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar Statement : खातेवाटप म्हणजे रुसवा फुगव्‍याचा खेळ; आमदार रोहित पवार यांचा टोला

खातेवाटप म्हणजे रुसवा फुगव्यचा खेळ; आमदार रोहित पवार यांचा टोला

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : सध्या राज्यामध्ये मंत्रिमंडळाचे खातेवाटप म्हणजे रुसवा फुगव्यचा खेळ सुरू आहे. अजून काही दिवस जातील. यानंतर शिंदे गटामध्ये नाराजगी होईल, त्यानंतर भाजपमध्ये नाराजगी होईल. त्यामध्ये काहींना मंत्रिपद सोडावे लागेल. हे सर्व नाटक चालू असून या नाटकांमध्ये (NCP) समाजहित नसून स्वहित आहे. पुढील काळात सरकारला मुद्द्याचं बोला; असा प्रश्न विचारायची गरज असल्याचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. (Maharashtra News)

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कर्जत– जामखेडचे आमदार रोहित पवार आज प्रथमच कर्जत येथे आले होते. कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांचे उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. कर्जत (Karjat) जामखेडमधील जनता संघर्षाला महत्व देत असून संघर्ष कोणी केला आहे. हे सगळ्यांनीच पाहिलेले आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनता माझ्यामागे ठामपणे उभी असल्याचं यावेळी त्‍यांनी सांगितले.

फुटीर आमदारांनी विचारसरणीला बाजूला ठेवले

फुटीर आमदार स्वाहितासाठी विचारसरणीला बाजूला ठेवून गेले आहेत. जर आमदार स्वहितासाठी बाजूला गेले असतील, तर तो मतदारांच्या स्वाभिमानावर हल्ला असतो. हे सर्व मतदार पाहत असतात. त्यामुळे आमदार त्या बाजूला खुप काळ राहतील असं मला वाटत नाही; असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीवरून पुन्हा वाद, आयुक्त नगरसेवक आमने-सामने

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT