Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : सरकारच्या फसव्या दुध दरा विरोधात रास्तारोको; अंगावर दूध ओतून सरकारचा निषेध

Ahmednagar News सरकारच्या फसव्या दुध दरा विरोधात रास्तारोको; अंगावर दूध ओतून सरकारचा निषेध

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहुरी (अहमदनगर) : राज्य सरकारने दुधाला किमान ३४ दुपये दर देण्याची केलेली घोषणा हवेतच विरली आहे. प्रत्यक्षात दुध संघांकडून (Milk Price) दूध उत्पादकांची आर्थिक लूट होत असून या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला. (Maharashtra News)

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने किमान ३४ रूपये दर देण्याचा आदेश जारी केला. मात्र सरकारच्या आदेशाला दुध संघांनी केराची टोपली दाखवली असून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २८ ते ३० रूपये दुधाला भाव दिला जातोय. या विरोधात आज राहुरी बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेने नगर मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको केला. सरकारने केलेली घोषणा फसवी असून जर आठ दिवसांत यावर ठोस निर्णय घेतला नाही; तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यासोबतच शहरांकडे जाणारे दूध बंद करण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

निषेध म्हणून दुधाने अंघोळ 

यावेळी सरकारचा निषेध करत जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी रस्त्यावरच स्वतःला दुधाचा अभिषेक घालत राज्य सरकारचा निषेध केला. तसेच दुधाच्या ३:२ या गुणप्रतीस ३४ रुपये भाव मिळावा. एसएनएफचा २० पैसे तर फँटचा ३० पैसे दर निश्चित करावा. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान द्यावे;  पशुधनाला मोफत विमा सरंक्षण मिळावे. डबल टोन्ड दुधावर बंदी आणावी; अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT