Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई, आयुक्तांनी काढले आदेश; काय आहे कारण?

Ahmednagar news : राज्यात सगळीकडेच पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून पाण्याची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहमदनगर
: पाण्याची समस्या सर्वत्र जाणवत आहे. अहमदनगर शहरात देखील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून आता पाणी पुरवठ्याचे सर्व गणित पावसावर अवलंबून आहे. यामुळे  पावसाळा सुरु होण्यापूर्वी नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश काढले आहेत. 

राज्यात सगळीकडेच पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून पाण्याची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर शहरी भागात पाणी कपात करण्यात आली आहे. दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे (Mula Dam) मुळा धरणाची पाणी पातळी खालवल्याने याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे धरणातून पाण्यासाठी आवर्तनाची मागणी वाढत असल्याने पाटबंधारे विभागाने पाणी वितरण (Water supply) काटकसरीने सुरु केले आहे. 

तोपर्यंत नळ कनेक्शनसाठी प्रतीक्षा 

अहमदनगर (Ahmednagar) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. यामुळे धरणात पाण्याची नवीन आवक होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन न देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. अर्थात ज्यांना नळ कनेक्शन घ्यायचे आहे. त्यांना चांगल्या (Rain) पावसाची वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT