Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांना सकाळी चहा- कॉफी पिण्याची सवय असते. मात्र सकाळी चहा- कॉफी प्यायल्याने शरीरावर परिणाम होतो. गॅस, अॅसिडीटी यासारख्या समस्या उद्भवतात.
या समस्यांमुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. एकाग्रता कमी होते. तुम्हालाही मेंदू तल्लख करायचा असेल तर सकाळच्या ४ हेल्दी ड्रिंक्स पिणे महत्वाचे आहे. मात्र असे ड्रिंक्स कोणते ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
ब्लॅक कॉफी मेंदूच्या कार्यासाठी प्रभावी मानली जाते. कॉफीने मेंदूतील हिप्पोकॅम्पस सक्रिय होतात त्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
ग्रीन टीमधील एल- थिएनाइन आणि ईजीसीजी हे घटक मेंदूसाठी फायदेशीर आहे. एल- थिएनाईन मेंदूला शांत आणि सक्रिय करते ज्यामुळे एकाग्रता वाढते.
जास्वंदीच्या चहामध्ये अँथोसायनिन्स हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात जे मेंदूच्या पेशींना अॅक्टिव्ह करतात.
हळदीमध्ये कर्क्यूमिन हे घटक असल्याने मेंदूच्या पेशींचे कार्य सुधारते. मेंदूची स्मरणशक्ती वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.